जिजाऊ जन्मोत्सव २०१३

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राजमाता जिजाऊ जन्मोत्सव थाटामाटात साजरा झाला. जगभरातील जिजाऊ भक्तांनी मोठया संख्येने मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे हजेरी लावली. मराठा सेवा संघाच्या वतीने मोठया प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे विविध वृत्तपत्रामधील वार्तांकन.

 

“सत्यशोधक” लाखाचा मनसबदार…

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू॥

या जगद्गुरू तुकोबारायांच्या अभंगाला सार्थ ठरवण्यासाठी १३ मे २०१० रोजी सत्यशोधक (satyashodhak.wordpress.com) हा ब्लॉग सुरु केला. भगवान महावीर, तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले, राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आद्य क्रांतिकारक उमाजी राजे नाईक, संत रविदास, लोकमाता अहिल्यादेवी होळकर, संत नामदेव यांच्या विचारसरणीला प्रमाण मानून आणि मराठा सेवा संघाचे संस्थापक मा.पुरुषोत्तम खेडेकर यांच्या प्रेरणेने ह्या ब्लॉगने आज एक लाख वाचकांचा टप्पा ओलांडला आहे.

भारतात असलेल्या विषमतावादी वैदिक ब्राम्हणी व्यवस्थेच्या विरोधात मराठा-बहुजनांच्या अनेक महापुरुषांनी कार्य केले. जैन धर्माच्या स्थापनेपासून ते शिवधर्माच्या प्रकटनापर्यंत अजूनही हा संघर्ष सुरूच आहे. त्या संघर्षात सत्यशोधक नेहमीच आपले योगदान देत राहील. बर्‍याच कडू-गोड अनुभवांना सामोरे जात प्रबोधनाचे काम सलग तिसर्‍या वर्षीही सुरु ठेवल्याचा आनंद मनात आहे. जगातील १० देशांमधून हा ब्लॉग वाचला गेला. ६३% वाचक हे सर्च इंजिनच्या माध्यमातून ब्लॉगपर्यंत पोचले. फेसबुकच्या माध्यमातून तर आमच्या हातात एक नवे माध्यमच लागले आहे. ब्राम्हणी प्रचार-प्रसार माध्यमे इथे चालणार्‍या बहुजन चळवळीचे काम हायलाईट करत नाहीत. फेसबुकच्या माध्यमातून हा ब्लॉग आणखी जास्त वाचकांपर्यंत पोचवता आला.

ब्लॉग चालवताना इथल्या ब्राम्हणी व्यवस्थेचा अधिक कटू अनुभव आला. वेळ आली कि एकजात सगळे चांगले-वाईट ब्राम्हण कसे एकत्र येतात याचा अनुभव आला. ते त्याच्या चुका मान्य करत नाहीतच पण चुका सांगणार्‍यालाच गुन्हेगार घोषित करून मोकळे होतात. सुरुवातीला ब्लॉग लोकांपर्यंत पोचण्यासाठी मराठी ब्लॉग विश्व हि साईट एकमेव माध्यम म्हणून वापरली. पण तेथील सगळ्या ब्राम्हणांनी (लोकशाहीच्या गप्पा करणार्‍या!) माझा ब्लॉग बॅन करायला साईट मालकाला भाग पाडले. जेम्स लेन प्रकरणी विचारांचा प्रतिवाद विचारांनी करायला सांगणार्‍या पंडित अटल बिहारीचे समर्थक भाऊबंद असे वागताना पाहून मजा वाटली व चीडही आली. त्यामुळे मला सर्च इंजिन ओप्टीमायजेशन शिकता आले आणि माझी वाचकसंख्या टिकून राहिली. ब्लॉगची गुगल पेजरँक ३ आहे. गुगल, वर्डप्रेस, व इतर सर्व ओपन सोर्स (बौद्धिक नियंत्रण मुक्त) साईट्सची खूप मदत झाली. त्यांच्यामुळेच व्यक्तीस्वातंत्र्य आम्हाला इंटरनेटवर उपभोगण्यास मिळते.

युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचे तर आमच्यावर अनंत उपकार आहेत. त्यांनी शेती आणि क्रिकेट याच्या पलीकडच्या जगात आम्हाला डोकावायला शिकवले. आणि कधी नव्हे ती मराठयांची पोरे विचार करायला लागली. फुकट दिलेले पुस्तक न वाचणारे पुस्तक विकत घेऊन वाचायला लागले, लिहायला लागले. आणि महाराष्ट्रात नव्हे देशात होणार्‍या दंगली बंद झाल्या. आरक्षण म्हणजे कुबड्या समजणारा समाज आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व हे समजून घेण्याइतपत प्रगल्भ झाला. गेल्या हजारो वर्षात हार न पाहिलेल्या ब्राम्हणी व्यवस्थेला दादू कोंडदेवच्या माध्यमातून थेट हादरा दिला.

हा ब्लॉग चालवताना अनेक मित्रांनी व चळवळीतील सहकार्‍यांनी मदत केली. माझा बंधुमित्र निखील देशमुख (औरंगाबाद) याने ब्लॉग satyashodhak.com करायला व स्वतंत्र सेल्फ होस्टेड ब्लॉग बनवण्यासाठी मदत केली. प्रकाश पोळ (कराड) यांनी चर्चा करून लेख आणखी चांगले होण्यास मदत केली. डॉ. बालाजी जाधव (औरंगाबाद), नितीन सावंत (परभणी), विकासराव चव्हाण (मुंबई), विशाल भोसले (लातूर), भैय्या पाटील (पुणे), अभय पाटील (बुलडाणा), अमरजित पाटील (पंढरपूर), अनिल माने (बारामती), पुरुषोत्तम जाधव (बीड), प्रदीप इंगोले (हिंगोली), संजीव भोर (अहमदनगर), संतोष गायधनी (नाशिक), सतीश काळे (पिंपरी-चिंचवड), प्रकाश पिंपळे (मुंबई), सुनील चौधरी (जळगाव) व अशा अनेक चळवळीतील हितचिंतक व सहकार्‍यांनी चर्चा करून ब्लॉग अधिक चांगला होण्यास मदत केली. इतःपर त्यांचे आभार न मानता मी सगळ्यांच्या ऋणातच राहू इच्छितो.

शेवटी या देशात फुले-शाहू-आंबेडकर यांना अभिप्रेत समाजरचना निर्माण करण्यासाठी सतत कार्यरत राहण्याचे वचन देतो. व हा छोटासा लेख पूर्ण करतो.

जय जिजाऊ!

-विनीत

जिजाऊ जन्मोत्सव २०१२

मराठा सेवा संघाच्या वतीने साजरा होणारा राजमाता जिजाऊ जन्मोत्सव यावर्षीही थाटामाटात साजरा झाला. देशाच्या तसेच जगाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या जिजाऊ भक्तांनी सिंदखेड राजा परिसर फुलून गेला होता. यावर्षी उच्चांकी २०० पुस्तक स्टॉल्सची नोंदणी झाली होती. जिजाई प्रकाशन तसेच अनेक पुरोगामी प्रकाशनांनी हजेरी लावली होती. त्याचा दै.देशोन्नती, दै.लोकमत व दै.सकाळ या प्रमुख वृत्तपत्रांमधील वृत्तांत.


 

होय! सगळे ब्राम्हण वाईट नसतात..

फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीत काम करणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांच्या समता, बंधुता व न्याय या तत्वांचा प्रचार प्रसार करताना या समाजातील प्रत्येक विषमतावादी गोष्टीवर प्रहार करावा लागतोच. आणि पर्यायाने तो इथल्या ब्राम्हणवादी व्यवस्थेवर असतो. तेंव्हा त्यांचे मित्र. स्नेही, त्यांच्या जीवनात आलेल्या एखाद्या ब्राम्हणाचे उदाहरण देऊन त्या कार्यकर्त्याला म्हणतात कि सगळेच ब्राम्हण वाईट नसतात काही चांगले पण असतात. अशा वेळी बर्‍याच कार्यकर्त्यांकडे याचे उत्तर नसते. ते काहीतरी सांगून वेळ मारून नेतात.

वादासाठी मान्य करू कि सगळे ब्राम्हण वाईट नसतात, पण त्या चांगल्या ब्राम्हणांनी वाईट ब्राम्हणांचा कधी साधा निषेध केल्याचे ऐकिवात नाही. जेंव्हा एखाद्या ब्राम्हणाची हरामखोरी उघडकीस आणून त्याच्या विरोधात काहीतरी करण्याची निर्णायक वेळ येते त्यावेळी सगळेच्या सगळे चांगले ब्राम्हण त्या वाईट ब्राम्हणाची बाजू घेतात. उदा. बाबा पुरंदरे ह्या ब्राम्हणाने शिवचरित्रात केलेली भेसळ जगजाहीर आहे, पण सगळे भट त्याला शिवशाहीर म्हणून त्याचा उदोउदो करतात. (त्याने आयुष्यात एकही पोवाडा लिहिला नाही तरी!)

एकाही चांगल्या ब्राम्हणाने जेम्स लेनला मदत करणार्‍या ब्राम्हणांना शिक्षा व्हावी म्हणून एक ओळ एखाद्या वृत्तपत्रात लिहिल्याचे ऐकिवात नाही. उलट अनंत देशपांडे नावाच्या भटाने सामना दैनिकात लेख लिहून एक उत्कृष्ट पुस्तक अशी भलावण केली होती. आणि बाबा पुरंदरे नावाच्या जगातील सगळ्यात मोठया शिवद्रोह्याने सोलापुरातील जनता बँकेच्या व्याख्यानमालेत त्या पुस्तकाचे “वाचनीय पुस्तक” म्हणून कौतुक केले होते. सगळे ब्राम्हण मुस्लिमांच्या विरोधात प्रचार करताना सवाल करतात कि “सगळे मुस्लीम दहशतवादी नसतात, पण सगळे दहशतवादी मुस्लीम कसे?” आणि अशा प्रचाराला आमचे भोळेभाबडे बहुजन बळी पडतात. त्याच धर्तीवर माझा सवाल आहे-

सगळे ब्राम्हण शिवद्रोही नसतात, पण सगळे शिवद्रोही ब्राम्हण कसे?

इस्लाम हा समतावादी धर्म असल्यामुळे आणि भारतात बर्‍याच शुद्रातीशुद्रांनी वैदिक ब्राम्हणी धर्माला कंटाळून इस्लामचा स्वीकार केल्यामुळे ब्राम्हण इस्लामचा द्वेष करतात. भारतातील मुस्लिमांना खरा विरोध ब्राम्हणांचा होता व अजूनही ब्राम्हण मुस्लिमांचा द्वेष करतात. या देशातील झालेले बॉम्बस्फोट भटांनी केले होते व असिमानंद याने दिलेल्या कबुलीजबाबात हे स्पष्ट झाले आहे. पांडे, पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंग या ब्राम्हणी दहशतवाद्यांचे समर्थन सगळे ब्राम्हण करतात. आणि न्यायालयात त्यांच्यावर फुले उधळतात.

ब्राम्हण सरळ सरळ मुस्लिमांचा विरोध करू शकत नाही, कारण मुस्लीम त्यांना भारी पडतील. म्हणून भट मराठयांना मुसलमानांच्या विरोधात भडकवतात. एका ब्राम्हणाने फेसबुकवर बॉम्बस्फोट केल्याची व बाबरी पाडल्याची कबुली दिली आहे किती चांगले ब्राम्हण याचा विरोध करतात बघू. आता पर्यंतचा इतिहास आहे, ब्राम्हण त्यांचे मार्ग बदलतात पण ध्येय कधीच बदलत नाही आणि त्यांचे अंतिम ध्येय आहे बहुजनांना गुलाम ठेवणे.

Bramhani Terrorism

आजही या देशातील सगळे ब्राम्हण या देशातील लोकशाही व्यवस्था नष्ट करून इथे हुकुमशाही आणण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी अण्णा हजारे या बहुजन मुखवट्याचा वापर सुरु आहे. भटी माध्यमे असा प्रचार करतात कि या देशातील एकूण-एक राजकारणी भ्रष्ट आहेत. त्यांची तिथे राहण्याची लायकी नाही वगैरे. आता पर्यंत राजा हा एखाद्या महाराणीच्या पोटी जन्माला येत होता पण आता तो मतपेटीद्वारे जन्माला येतो आणि तो जर नालायक निघाला तर ५ वर्षांनी त्याला घरी बसवता येते हि ताकद लोकशाही व्यवस्थेची आहे.

पण भटांच्या डोळ्यात हे खुपत आहे. आणि म्हणून जाणीवपूर्वक ते लोकपालच्या निमित्ताने लोकशाही व्यवस्थेवरचा जनतेचा विश्वास उठेल असा प्रचार करत आहेत. मुळात लोकपाल नसतानाही भ्रष्ट लोक जेलमध्ये गेलेले आहेत. मग स्वतंत्र कायद्याची गरज काय? लोकपालची यंत्रणा उभी करण्यासाठी व चालवण्यासाठी ८०,००० कोटी रुपये खर्च दरवर्षी येणार आहे. तो कुठून येणार? पण अशा गोष्टींची चर्चा ब्राम्हणी प्रसारमाध्यमे कधीही करणार नाहीत. या देशातील सगळी ब्राम्हणी यंत्रणा ते त्यांच्या व्यवस्थेच्या समर्थनात, बहुजनांना गुलाम करून ठेवण्यासाठी वापरतात.

आमचा बहुजन समाज हा हजारो जातींमध्ये विभागून ब्राम्हणांनी त्यांची पोळी भाजून घेतली आहे. ब्राम्हण हा सर्व जगात ब्राम्हणच असतो. पण बहुजन कधी माळी, कधी मराठा, कधी धनगर, कधी चांभार असतो. काश्मीरच्या ब्राम्हण शिंकला कि कन्याकुमारीचा ब्राम्हण नाक पुसतो. एवढी एकसंध आणि क्रूर जमात अख्या जगात सापडणार नाही. म्हणून माझ्या बहुजन मित्रांनो ब्राम्हण कधीही चांगला किंवा वाईट नसतो, तो केवळ आणि केवळ ब्राम्हणच असतो.

ग्रामीण भागात एक म्हण आहे साप म्हणू नये धाकला आणि बामन म्हणू नये आपला! पण वैज्ञानिक आधारावर साप शेतकर्‍यांचा मित्र सिद्ध झालेला आहे जो उंदीर, घुशी इत्यादी उपद्रवी प्राणी खातो. म्हणून आता सुधारित म्हण ध्यानात ठेवा..

एकवेळ साप म्हणावा धाकला, पण बामन म्हणू नये आपला!

महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स – डॉ. यशवंतराव मोहिते

यशवंतराव मोहिते तथा भाऊ यांचे राजकीय कार्य, सहकार क्षेत्रातील कार्य, वैचारिक निष्ठा आणि विचारसंपदा जेवढया प्रमाणात महाराष्ट्राला परिचित असणे गरजेचे होते व आहे तेवढया प्रमाणात परिचित नाही. उलट त्यांच्यासंबंधी काही गैरसमज पसरलेले आहेत, पसरविले आहेत. यशवंतराव मोहिते यांचे स्वच्छ, सार्वजनिक जीवन, निर्मळ, पुरोगामी आणि लोक कल्याणकारी नेतृत्व, सामान्य माणसाला आर्थिक, सामाजिक न्याय मिळावा म्हणून त्यांनी केलेली विचारांची व कृतीची धडपड, फूले-शाहू-आंबेडकर या विचारप्रवाहावर त्याची असलेली अविचल निष्ठा, भारतात लोकशाही समाजवाद यावा याकरिता त्यांनी केलेले प्रयत्न या सर्वांचा महाराष्ट्रातील जनतेला परिचय झाला पाहिजे.

यशवंतराव मोहिते यांच्यावर कार्ल मार्क्स, म. ज्योतिबा फुले, शाहूराजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा प्रभाव असल्याने त्यांनी पुरोगामी धोरणांचा खंबीरपणे पाठपुरावा केला. कोणत्याही धर्माच्या लोकांनी आपला देव रस्त्यात आणू नये, त्याचे प्रदर्शन करू नये. आपल्या धर्म भावनेप्रमाणे जी काही पूजा करायची असेल ती चार भिंतींच्या आतच करावी असे त्यांचे ठाम मत होते. राजकीय सत्तेसाठी धर्माचा वापर करणे ही शुद्ध फसवणूक आहे असे भाऊ म्हणत.

बहुजन समाजाच्या हितासाठी झटत असल्याने नेहमी भाऊंची बदनामी करण्याचे प्रयत्न झाले. प्र. के. अत्रे यांच्याशी झालेला त्यांचा संघर्ष फार गाजला. यावेळी तत्कालीन प्रसारमाध्यमे भाऊंच्या विरोधात गरळ ओकत होती. उच्च न्यायालयाच्या १०९ वर्षाच्या इतिहासात एकही ब्राम्हणेतर न्यायाधीश का झाला नाही असा खडा सवाल मंत्री असताना न्यायालयाला विचारणारे भाऊ खरोखर निर्भीड होते.

भाऊ जातीयवादी पक्ष-संघटनाबद्दल म्हणत- “आजही या देशातील जवळ-जवळ सर्व राजकीय पक्षांचे, प्रजासमाजवादी, संयुक्त सोशालिस्ट पक्ष, कॉंग्रेस, जनसंघ, कम्युनिस्ट धरून नेतृत्व ब्राम्हणच करत आहेत. आणि त्यात मी काही वावगे मनात नाही. नेतृत्व एका ठराविक प्रक्रियेतून वाढावे लागते. ही प्रक्रिया करण्याची आजवरची मूस वर्णश्रेष्ठत्वाची होती. त्यातून श्रेष्ठ वर्णाचे नेतृत्व आले. वावगे काही घडले नाही, मी वृथा तक्रार करणार नाही. पण आज राजकीय क्रांती झाल्यावर, स्वातंत्र्य मिळाल्यावर सामाजिक क्रांतीचा आग्रह या नेतृत्वाने धरू नये, हे खटकते.”

सामाजिक क्रांतीबद्दल भाऊ म्हणतात, “महात्मा फुले, शाहू महाराज किंवा बाबासाहेब आंबेडकर यांना जी सामाजिक क्रांती अभिप्रेत आहे ती यशस्वी झाली असे आपण कधी म्हणू शकू ? त्या क्रांतीतून निर्माण होणार्‍या नवसमाजाच्या कसाची खरी कसोटी कोणती ? तो समाज एकसंघी, एकजिनसी असला पाहिजे. म्हणजेच त्याची न चुकणारी कसोटी ठरते त्या समाजात चालणारा अनिर्बंध रोटीबेटी व्यवहार.”

भाऊनी ३०-३५ वर्षे महाराष्ट्रात अनेक मंत्रीपदे भूषवली. अनेक बहुजन, दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदे भूषवली. पदासाठी कधी लुच्चेगिरी केली नाही. राजकारणासाठी स्वतःचा गट निर्माण केला नाही. भाऊची फुले-शाहू-आंबेडकरवादावर अविचल निष्ठा होती. १९८५ साली भाउंनी राजकारणातून निवृत्ती घेतली. भाऊसारखा पुरोगामी माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव.

भाऊंच्या पुरोगामी कार्याला आणि परखड विचारांना विनम्र अभिवादन..

-प्रकाश पोळ
(साभार- http://www.sahyadribana.com)