चाभरा चाटू – संजय राऊत..

शिवसेनेने महाराष्ट्रात जो काही बौद्धिक चाभरेपणा चालविला आहे, त्यामागे दोन कार्यकारी आहेत. शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष दादू ठाकरे आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत. कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला अपमानित करण्याचे पाप या चाभरेपणाचा एक भाग आहे. शिवरायांच्या राज्याभिषेकाची तारीख ६ जून असताना, शनिवारी २ तारखेलाच रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचे पाप या चाभर्‍या पिलावळीने केले. छत्रपतींचा इतिहास पुसून टाकून ठाकर्‍यांचा इतिहास रूढ करण्याच्या पापी हेतूने हे सगळे खेळ केले जात आहेत.

तशीही शिवसेनेची स्थापना शिवरायांची बदनामी करण्याच्या छुप्या हेतूने झालेली होती. महाराजांची बदनामी करण्याची एकही शिवसेनेने गेल्या चार दशकांत सोडलेली नाही. जेम्स लेन प्रकरण घडविण्यामागे सेनेच्या इशार्‍यावर काम करणारी पिलावळ होती, हे आता लपून राहिलेले नाही. सेनेने या संपूर्ण प्रकरणात गप्प राहून महाराजांच्या बदनामीचा आनंद लुटला. संजय राऊत यांचे वर्णन तर नुसते “चाभरा” या विशेषणाने पूर्ण होऊ शकत नाही. त्यांच्यासाठी “चाभरा चाटू” हे विस्तारित विशेषण अधिक उपयोगी ठरेल.

दै. सामनामधून वायफळ आग ओकण्याचे काम सातत्याने करणार्‍या चाटूसाहेबांची लेखणी लेन प्रकरणात लुळी पांगळी का झाली होती? आज थोरले ठाकरे विकल झाले आहेत, परंतु लेन प्रकरणाच्या काळात चाटूसाहेबांची लेखनी थोरल्या ठाकर्‍यांपेक्षाही जास्त विकल झालेली होती. चाटूसाहेब, आपल्या लेखनीला तेव्हा अचानक असे घुर्रे का बरे आले? आज छत्रपती शिवाजी महाराज हयात असते, तर त्यांनी आधी या “चाभर्‍या चाटू”ला टकमक कड्यावरून फेकले असते. त्यानंतर ठाकर्‍यांचाही बंदोबस्त केला असता.

दोन शिवजयंत्या व दोन राज्याभिषेक सोहळे घडविण्याच्या पापामागील कुजका मेंदू याच “चाभर्‍या चाटू”चा आहे. शिवसेनेचे कार्यकारी सध्या चाटूसाहेबांच्याच सल्ल्याने कारभार हाकत आहेत. शिवजयंती आणि शिवराज्याभिषेक सोहळा तारखेऐवजी तिथीनुसार साजरा व्हावा, असा युक्तीवाद चाटूसाहेब सामनामधून सातत्याने करीत आहेत. पण सर्व ठाकर्‍यांचे वाढदिवस हा तारखेनुसार साजरे होतात. खूद्द “चाभर्‍या चाटू”चा वाढदिवसही तारखेनुसारच साजरा होतो. मग महाराजांची जयंती आणि राज्याभिषेक सोहळा तिथीनुसार का हवा? याचे उत्तर चाटूसाहेबांकडे आहे का?

बाळ ठाकरे यांनी चार दशकांपेक्षाही जास्त काळ महाराष्ट्रात दादागिरी केली. ती केवळ मराठ्यांच्या बळावर..! थोरल्या ठाकर्‍यांना या उपकारांची जाणही होती. दोन्ही चाभरे कार्यकारी मात्र हे उपकार विसरले आहेत. राज्यकर्त्यांनी जनतेचे उपकार विसरायचे नसतात. कारण जनतेमुळेच राजकारण्यांना भाजी भाकरी मिळत असते. शेवटी शेतावर पाळलेले कुत्रेही खाल्ल्या भाकरीला जागते, एवढे लक्षात ठेवले तरी पुरे.

-अनिता पाटील

शिवरायांचा मावळा आहे मी!

तसं पाहायला गेलं तर,
जरा निराळा आहे मी!
लिहिण्या घेतली लेखणी,
परतण्या इतका दुबळा नाही मी!
बाबासाहेबांचे विचार जपणारा,
शिवरायांचा मावळा आहे मी!

सह्याद्रीत हर हर महादेवचा,
घुमलेला नाद आहे मी!
फुलेंच्या पोवाड्यातील,
डफावरची थाप आहे मी!
राजे पोहोचता पन्हाळगडा,
त्याच पायाची धूळ आहे मी!

अशाच दोन ओळींचा कवी आहे मी,
शंभूराजांच्या रक्ताचा एक थेंब आहे मी!
शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर,
विचारांचा पाईक आहे मी!
फक्त आणि फक्त शिवरायांचा भक्त आहे मी!

-गणेश अटकळे

मराठा आरक्षण परिषद, औरंगाबाद

मराठा आरक्षण परिषद, औरंगाबाद

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर परिषदांचे आयोजन करून मराठा समाजाचे प्रबोधनाचे कार्य सर्वच्या सर्व मराठा संघटना एकत्र येऊन करत आहेत. त्याचा एक भाग म्हणून औरंगाबादेत परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमातील भाषणांच्या चित्रफिती.

उठ मराठया जागा हो!
आरक्षणाचा धागा हो!!

१) प्रदीप सोळुंके
प्रदेश प्रवक्ता, संभाजी ब्रिगेड

२) किशोरभाऊ चव्हाण
संस्थापक अध्यक्ष, छावा मराठा संघटन, महाराष्ट्र

Religion Of Slaves and Of Those Who Made Them Slaves Can Not Be The Same..

Religion Of Slaves and Of Those Who Made Them Slaves Can Not Be The Same.. (Marathi: गुलामांचा आणि गुलाम करणार्‍यांचा धर्म एक असू शकत नाही..)

An Exposition of “Shivdharma”

by Dr. A.H.Salunkhe

(Translated from Marathi by Dr. K. Jamanadas)

Read Here : Exposition Of Shivdharma..

रायगडावरचा वाघ्या..

रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीविषयी चित्रलेखाचे संपादक ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांचा लेख..

महाराष्ट्रातील सद्य परिस्थिती हि ब्राम्हणांनी जाणून बुजून निर्माण केलेली आहे. यात मराठा व इतर बहुजनांमध्ये फुट पाडून भांडणे लावण्याचा प्रयत्न सुरु आहे. कृपया सर्व बहुजनांनी चर्चा करून हा प्रश्न सोडवावा अशी अपेक्षा, यात कुणीही भावनिक होऊ नये. ऐतिहासिक पुरावे लक्षात घेऊन सर्वांनी वाघ्या कुत्रा हटवण्यासाठी पाठींबा द्यावा. कारण यात फक्त शिवरायांचीच बदनामी होत नसून शिवप्रेमी श्रीमंत तुकोजी होळकरांची सुद्धा बदनामी करण्याचे षड्यंत्र आहे.

Raigad_Waghya

Raigad_Waghya

Raigad_Waghya