Advertisements

अण्णा हजारे: द फ्रॉड गांधी

सध्या जिकडे तिकडे अण्णा हजारे यांच्या उपोषणाची चर्चा सुरु आहे. अण्णा दुसरे गांधी असल्याचा प्रचार प्रसारमाध्यमे करतायत. अण्णा हजारे हे राळेगण सिद्धी या “गावचे” समाजसेवक, गांधींच्या मार्गावर चालणारे अशी त्यांची ख्याती आहे. सध्या २६-११ नंतर मेणबत्त्या मिरवणारे अण्णांसाठी सुद्धा मेणबत्त्या परजून रस्त्यावर आलेले आहेत. अण्णांची प्रमुख मागणी आहे लोकपाल विधेयक. जे भ्रष्टाचाराविरुद्ध थेट कारवाई साठी जन लोकपाल या पदाच्या निर्मितीसाठी आहे.

ह्या विधेयकामुळे जन लोकपाल नावाचे एक स्वतंत्र संस्था निर्माण होईल, जिच्यावर कुणाचेच नियंत्रण असणार नाही. आणि हे जन लोकपाल कुणाचीही कधीही चौकशी करू शकतील पण कुणाला त्याविरोधात दाद मागता येणार नाही. एकूणच हे एक समांतर न्याय व्यवस्था असणार आहे. अण्णांच्या म्हणण्यानुसार हि समिती लोकांच्या नियंत्रणात असणार आहे, हे लोक कोणते तर  १)दोन्ही सभागृहांचे अध्यक्ष २)सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ न्यायाधीश ३)हायकोर्टाचे दोन वरिष्ठ मुख्य न्यायाधीश ३)भारतीय वंशाचे नोबेल विजेते ४)राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष ५)भारतीय वंशाचे दोन मॅगसेसे पुरस्कार विजेते ६)भारताचे महानियंत्रक आणि लेखापाल. आता हे लोक फितूर होणार नाहीत याची हमी कोण देणार?

मॅगसेसे पुरस्कार हि भारतीय राज्यकारभारात हस्तक्षेप करण्याची पात्रता होऊ शकते काय? आणि ह्यातून अनिर्बंध शक्ती मिळाल्यामुळे हुकुमशाहीचा धोका निर्माण होणार नाही याची खात्री काय? आणि गेली ४२ वर्षे हे विधेयक पडून होते, मग अण्णांना आजच एवढा आततायीपणा करण्याची गरज काय होती? अण्णांचा मूळ हेतू तपासण्याची गरज आहे. विधेयकाच्या मसुदा समितीवर जनतेचे प्रतिनिधी म्हणून अरुण केजरीवाल, अण्णा हजारे, प्रशांत भूषण, संतोष हेगडे हे आहेत. मी म्हणतो यांना जनतेने प्रतिनिधी म्हणून कुठं निवडलंय? ते संसदेत बसलेले हरामी जनतेचे प्रतिनिधीच आहेत, मग ह्या वेगळ्या ५ जणांची गरज काय? आणि हे आमच्या भल्याचाच विचार करतील कश्यावरून?

सगळ्यात कहर म्हणजे, शांती भूषण नावाचा इसम मसुदा समितीचा उपाध्यक्ष आहे. ह्याने १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील २ आरोपींचे वकील म्हणून काम केलेले आहे. आणि ह्याने २००१ मध्ये संसद हल्ल्यातील आरोपी शौकत हुसेन गुरु याला झालेल्या शिक्षेविरुद्ध अपील केले होते! मुस्लिमांच्या विरोधात विनाकारण बोंबाबोंब करणारे संघ-भाजप-सेना सगळे चूप का आहेत? एका देशद्रोही वकिलाला देशातील एका सर्वोच्च लोकसंस्थेत मसुदा तयार करण्याचे काम कसे मिळू शकते? शिवसेनाप्रमुख अण्णांना वाकडया तोंडाचा गांधी म्हटले होते, मग आता शिवसेनाप्रमुखांनी अण्णांची बाजू कशी काय घेतली? आणि हे विधेयक १९६९ पासून प्रलंबित आहे मग सेना-भाजपचे सरकार असताना त्यांनी हे विधेयक का पारित केले नाही?

मुळात जनतेच्या मूळ प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे विचलित करण्यासाठी अण्णांची हि “पेड” खेळी आहे. देशातल्या ३५ कुटुंबांकडे ७९६८ अब्ज रुपये संपत्ती आहे, पौष्टिक अन्न न मिळाल्यामुळे भूकबळीमुळे ६ दिवस ते ६ महिन्याच्या आत ५०% बालकांचा मृत्यू होतो, मंदिरांची वार्षिक कमाई ८३ लाख कोटी रुपये आहे, पण अण्णा कधीच या प्रश्नांवर बोलत नाहीत. देशातील सगळ्यात भ्रष्ट व्यवस्था, न्याय व्यवस्था आहे त्याविरोधात बोलत नाहीत. अण्णा कधी अंधश्रध्दा निर्मुलन विधेयक, मंदीर अधिग्रहण कायदा या कायद्यासाठी का आंदोलन करत नाहीत? बुवाबाजी,अंधश्रद्धा,जंतर-मंतर यावर का बोलत नाहीत?

अण्णांना पाठींबा देणार्‍यांमध्ये “राज”योगी रामदेव बाबा हि आहेत. त्यांच्या करणी लवकरच एक लेख लिहून समोर आणणारच आहे. पण अण्णा मनुवाद्यांना हाताशी धरून बहुजन नेत्यांना टार्गेट करण्याचा कार्यक्रम राबवत आहेत. अण्णांनी खुशाल शरद पवारांच्या विरोधात उपोषण करावे, पण कधीतरी कलमाडी आणि शीला दीक्षित वरही बोलावे. आमच्या “एकंदरीत” सगळ्या आंबेडकरवाद्यांना साधा प्रश्न पडत नाही कि शुद्र अशोक चव्हाण आणि अतिशूद्र  दलित ए.राजा यांचे पद निव्वळ आरोपावरून जाते पण दीक्षित आणि कलमाडी या ब्रम्हसमंधांच्या पदाला धक्का लागत नाही.

अण्णांचे भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन करणे हास्यास्पद आहे. अण्णांनी मागे सुरेश जैनांविरुद्ध उपोषण सुरु केले होते, जैनांनी उलट अण्णांच्या ट्रस्टची चौकशी व्हावी म्हणून उपोषण सुरु करताच अण्णांनी आपले उपोषण गुंडाळले होते. आजही सुरेश जैन अण्णांना महाचोर म्हणतात. अण्णा यांनी आपल्या उपोषण स्थळामागे जे पोस्टर लावले होते त्यावर गांधी आणि झाशीची लक्ष्मीबाई होती. आता गांधींनी सत्यशोधक चळवळ गिळंकृत करून बहुजन समाजासोबत फ्रॉड केला, आणि आता अण्णा हे फ्रॉड गांधी आहेत म्हणजे डबल फ्रॉड आहेत.

अण्णांनी मागे राज ठाकरेंच्या परप्रांतीय विरोधी आंदोलनाचे समर्थन केले होते, अश्या संकुचित विचारांचा माणूस देशाच्या भल्याचा विचार कसा काय मांडू शकतो? अण्णा क्रिकेट मध्ये देशाची तरुणाई वेळ वाया घालवते, क्रिकेट मध्ये अफाट पैसा अफरातफर केला जातो. सध्या आय.पी.एल. सुरु आहे त्यात एका एका खेळाडूसाठी साठी करोडो रुपये लावलेले आहेत. त्याविरुद्ध बोला ना अण्णा. अण्णा, आपल्या देशात न्याय यंत्रणा असताना कोणालाही अपराधी ठरविण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला? काहीतरी बोला अण्णा, तरुण भरकटत चालले आहेत.. त्यांना दिशा द्या.. सुपारी घेऊन उपोषणे करण्याचा धंदा सोडा आता अण्णा..

Advertisements

Leave a Reply