कुमार केतकर माफी मागणार का?

जेम्स लेन म्हणतो, “भांडारकर संस्था हे भारतातील माझे ज्ञानप्राप्तीचे घर आहे. संस्थेचे ग्रंथपाल वा.ल.मंजुळ यांनी त्याला शिवचरित्र लिहायला सांगितले.” संस्थेचे मानद सचिव श्रीकांत बहुलकर हे जेम्स लेनच्या “द एपिक ऑफ शिवाजी” या पुस्तकाचे सहलेखक आहेत. १४ जानेवारी २००४ रोजी जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदी घातलेली असताना सुध्दा जुन २००३ ते ६ मे २००७ पर्यंतच्या काळात भांडारकरच्या वेबसाईटवर हे वादग्रस्त पुस्तक उपलब्ध होते. पुस्तकाची बंदी उठवण्याची मागणी करणाऱ्या अॅड.रुपवते व आनंद पटवर्धन यांना तर भांडारकर संस्थेने पुस्तकाच्या डायरेक्ट फ्री लिंक्स दिल्या होत्या.

५ जानेवारी २००४ रोजी संभाजी ब्रिगेडच्या ७२ मावळ्यांनी जेम्स लेनचे ज्ञानकेंद्र असणाऱ्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर लक्षवेधी कारवाई केली. ६ जानेवारी २००४ च्या लोकसत्ता वर्तमानपत्रात कुमार केतकरांनी संभाजी ब्रिगेडला आणि ७२ मावळ्यांना गुंड, तालीबानी, रानटी अशी विशेषणे लावुन बातम्या छापली. प्रत्यक्षात भांडारकरवरील लक्षवेधी कारवाई सुद्धा अगदी किरकोळ होती.

तरीही त्याचा गवगवा करुन लोकसत्ता संपादक कुमार केतकरांनी भांडारकर संस्थेच्या पुनरुभारणीसाठी “लोकसत्ता ज्ञानसंस्कृती निधी” संकलन करण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात नुकसान झाले त्याच्या कित्येक पट निधी जमला. त्या निधीवाटपाचा कार्यक्रम १८ फेब्रुवारी २००५ रोजी घेऊन त्याची फोटोसहित मोठी बातमी दुसऱ्या दिवशी १९ फेब्रुवारी २००५ (शिवजयंती) रोजी पहिल्या पानावर ठळकपणे छापली. हा योगायोग नव्हता, त्यामागे काय इशारा होता ते समजुन घ्या.

पुढे याचा वचपा “अवतरली शिवशाही” अग्रलेखातील मांडणीमुळे तोंड काळं होऊन निघाला म्हणा. असो. कुमार केतकरांनी ज्यांना तालिबानी, गुंड, रानटी संबोधले त्या सर्व ७२ मावळ्यांची आज कोर्टाने भांडारकर प्रकरणातुन निर्दोष मुक्तता केली आहे. एखाद्याला तालिबानी, गुंड, रानटी म्हणलं म्हणुन स्वतःचा सुशिक्षितपणा, सुसंस्कृतपणा आणि सज्जनपणा सिद्ध होत नाही, हे कुमार केतकरांना माहीत नसेल तेव्हा. कदाचित आता माहीत होईल!

Leave a Reply