विदेशी पुस्तक, देशी मस्तक…

पेशवाई किड्यांच्या नादाला लागून विदेशी लेखक जेम्स लेनने महाराष्ट्राच्या आराध्य दैवताची जी धूळधाण उडवली, त्याविरोधात आवाज उठला नाही (अपवाद संभाजी ब्रिगेड चा). शिवरायांच्या माँसाहेबांची – जिजाऊंची अब्रू इतकी स्वस्त झाली आहे का? तिला शिवजयंतीच्या तारीख-तिथी वादाइतकीही किंमत नाही का? शिवरायांच्या पुतळ्याला कुणी विद्रूप केलं, तर प्रकरण दंगल उसळण्यापर्यंत जातं. बदल्याची भाषा केली जाते. पण शिवचरित्रच कलंकित करण्याचा डाव खेळला जातो, तरी त्याकडे थंडपणे दुर्लक्ष केलं जातं. पुतळ्याच्या दगडा इतकीही किंमत जिजाऊंच्या चारित्र्याला किंमत न देणे, हा थंडपणा नाही; तो सामाजिक आणि राजकीय षंढपणा आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मंदिरातील तीर्थकुंडात बडवा मुतताना पकडला गेला. तेव्हाही असाच थंडपणा दाखवला गेला. याउलट परदेशात कुठे चपलेवर, कमोडवर देव-देवतांची चित्रं रंगवली गेलीत, अशी ओरड होताच पेटवा-पेटवी करणारी लेखनकामाठी होते. त्याने भाविकही अस्वस्थ होतात. अशीच अस्वस्थ भावनांची प्रतिक्रिया जेम्स लेनच्या नीचपणामागच्या मस्तकांच्या विरोधात का नाही उठली? अधिक माहिती साठी रोज वाचा… जेम्स लेनच्या कुचाळक्या आणि त्यामागच्या पेशवाई किड्यांना  उघड करणारी लेखमाला… विदेशी पुस्तक देशी मस्तक…
साभार-
ज्ञानेश महाराव,
संपादक, चित्रलेखा

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.