Advertisements

संघाला अभिप्रेत हिंदुत्व

संघ हा मुळात चातुर्वर्ण्यावर आधारित समाजरचनेचा पुरस्कर्ता आहे. आर्यवंश सिद्धांत हा त्याचा पाया आहे. त्यामुळेच संघाच्या बौद्धिकात या सिद्धांताला अतिशय महत्वाचे स्थान आहे. स्वतःला आर्य म्हणविणारा हिटलर त्यामुळेच संघापुढील आदर्श आहे. संघसंस्थापक डॉ.हेडगेवार यांनी आपल्या अनुयायांमध्ये या विचाराची रोवणी केली आणि त्याला सैद्धांतिक स्वरूप प्राप्त करवून दिले,ते दुसरे संघचालक मा.स.गोळवलकर यांनी. त्यांच्या १९३९मधील ‘वुई ऑर अवर नेशनहूड डिफाइंड ‘ या पुस्तकात ते म्हणतात (७):

“ हिटलरने लाखो ज्यू लोकांची जी कत्तल केली,ती योग्य होती. आम्हीही तोच कित्ता गिरवू. … जर्मनीने सिद्ध केले की,भिन्न वंश व संस्कृतीचे लोक एकत्र नांदूच शकत नाहीत. त्यांचे एकजीवत्व अशक्य आहे आणि हिंदुस्थानने जर्मनीपासून हा धडा घेतलाच पाहिजे. तसेच हिंदू उदार आहेत. हिंदुस्थानात गैरहिंदूंना राहण्याची मंजुरी दिली जाईल. पण या अटीवर की त्यांनी हिंदुत्वासमक्ष समर्पण करावं. हिंदुत्वाचे गुणगान करण्याशिवाय त्यांनी काहीही करू नये. त्यांची आपली स्वतंत्र ओळख नसावी. त्यांनी स्वतःसाठी विशेषाधिकार मागू नये.नागरिक हक्क सुद्धा मागू नये. तेव्हाच गैरहिंदूंना या देशात राहण्याची मंजुरी देण्यात येईल….”

गोळवलकर गुरुजी यांच्या या विचारांचे तंतोतंत पालन आजवर संघ स्वयंसेवक करीत आले आहेत. गुजरातमधील दंगल असो की बाबरी, दादरीकांड किंवा अलीकडेच झालेले उत्तरप्रदेशातील बुलंदशहर हत्याकांड. आता केवळ गैर हिंदूंपर्यंतच हे विचार मर्यादित नाहीत,तर जे-जे संघाच्या हिताच्या आड येतील ते सर्वच हिंदूविरोधी तसेच देशद्रोही मानले जातील. याचकारणाने दाभोलकर,पानसरे,कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्या करण्यात आल्यात. या सर्व हत्त्यांचे समर्थनही संघप्रेमींनी केलेले आहे. त्यातून त्यांचा सुप्त हेतू उघड झाला आहे. त्यानुसार यापुढे ठरवून योजनाबद्धरीतीने आपल्या विरोधकांचा काटा काढणे त्यांना सोपे जाणार आहे. हा काटा काढण्याकरिता काटाच म्हणजे त्याच जाती समूहातील आपला हस्तक वापरायचा अशी त्यांची रणनीती आहे. यातून समाजाचे व पर्यायाने देशाचे विघटन होण्याची भिती निर्माण झाली आहे. याविषयी विख्यात बहुजन विचारवंत मा.नागेश चौधरी म्हणतात (८) :

“ देश तोडण्यासाठी व स्वतःचे स्थान अबाधित ठेवण्यासाठी आज देशात या वर्णवाद्यांनी अनेक आक्रमक आघाड्या उघडल्या आहेत-
१) रामजन्म-कृष्णजन्मभूमी मुक्ति आंदोलन.
२) समान नागरी कायदा मोहीम.
३) मंडल आयोग,आरक्षण विरोधी आंदोलन.
४) गाय हत्त्या विरोधी आंदोलन.
५) जुनी मंदिरे पुनरुज्जीवन मोहीम.

या सर्व आंदोलनांचा रोख ज्याप्रमाणे इथल्या मुस्लीम,शीख इ. धर्माच्या विरोधी आहे,त्याचप्रमाणे तो इथल्या दलित-आदिवासी विरुद्ध आणि मंडल आयोगात समाविष्ट असलेल्या मधल्या जाती विरुद्ध अर्थात,ज्यांच्या संख्येच्या आधारावर जे या देशाला हिंदुराष्ट्र वगैरे व्हावे असे म्हणवून घेतात,त्या तेल्या, माळ्या, कुणब्या,सुतारा, न्हाव्या, लोहारा,पवाराविरुद्ध देखील हे वर्णवादी आपले शस्त्र परजून आहेत. विराट बळीला पायाखाली ठेवण्याची या बामणांची ही चाल आहे.

प्रा. अशोक राणा

Advertisements

Leave a Reply