बाबा पुरंदरेची हरामखोरी…

“लाचार, स्वार्थी, गुलाम मराठा पुरुष मोठेपणासाठी स्वतःची आईसुद्धा विकायला कमी करणार नाहीत”
(लेखक-ब.मो.पुरंदरे, राजा शिवछत्रपती : पान-८३, जुनी आवृत्ती)

स्वतःला शिवशाहीर म्हणवून घेणार्‍या बाबा पुरंदरेने राजा शिवछत्रपती या पुस्तकात पाना-पानावर मराठयांना अपमानित केले आहे. आणि भैताड मराठे हे पुस्तक डोक्यावर घेऊन नाचत आहेत. या पुस्तकात केलेल्या मराठयांच्या बदनामीबद्दल मराठे हरामखोर पुरंदरेला कधी जाब विचारणार आहेत?

लाचार, स्वार्थी, गुलाम मराठा पुरुष मोठेपणासाठी स्वतःची आईसुद्धा विकायला कमी करणार नाहीत, अशी नीच आणि हलकटपणाचा कळस करणारी वाक्ये लिहिणार्‍या पुरंदरेला मराठयांनी त्याची जागा दाखवायला हवी.

आणि अजूनही ज्या भैताडांना त्याचा पुळका येत असेल त्यांनी स्वतःची DNA चाचणी करून घ्यावी कि ते नक्की मराठा रक्ताचेच आहेत का?

अधिक माहितीसाठी पुढील बातमी वाचा…
दै.मूलनिवासी नायक (दि.२० सप्टे.२०१०)

Real James Laine Baba Purandare

62 comments

 1. आपल्या लेखाच्या शीर्षकाचा अर्थ बाबासाहेब पुरंदरे वदले "शेवटी मी सुद्धा jain"…

  इतकाच होतो…

  1. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा…

   त्यापेक्षा "रघुपति राघव राजाराम। पतित पावन सीताराम।।" हा जप येथे योग्य वाटतो.. आणि हो तो बहुदा रामदास स्वामींनीच रचला…

  2. इथं आमच्या अस्मितेवर बलात्कार होतायत आणि तुम्हाला बाष्कळ गोष्टींची चिंता आहे…

   तो हरामखोर किंवा तो रामदास गोसावडा काही म्हणो, त्या पुरंदरेने काय लिहिलंय ते बघा…

   1. ते महत्वाचं नाही, राम हा काही इथे चर्चेचा विषय नाही. तुम्ही विषयाला भरकटवता आहात…

   2. तुम्ही हुष्षार आहात कारण लगेच प्रतिउत्तर द्यायचे बटन निर्बुद्ध करून टाकले म्हणून येथे लिहितोय कळले का..?

    आमच्च्याच एका खानदानी ९६ कुळी मित्राच्या शब्दात… "तुम्ही कितीही छक्के पंजे खेळलात तरी विजय शेवटी सत्याचाच होईल…!"

   3. म्हणजे तुम्हाला असे म्हणायचे आहे का कि बाबा पुरंदरेने पुस्तकात लिहिलंय ते सत्य आहे…

    तसं असेल तर हे तुमच्या खानदानी ९६ कुळी मित्राला जरा जाऊन सांगा, मग तो काय म्हणतो ते पहा…

   4. प्रथम विनम्रता अंगी बाणवून बाबसो पुरंदरेंना जाऊन विचारा की तुम्ही लिहिलेल्या शब्दांचा अर्थ मी असा लावला किंवा वाटतो तो बरोबर आहे का?

    म्हणजे तुम्हांस खरे उत्तर लाभेल…

   5. अर्थ मी लावला? शुद्ध मराठीत त्याने मराठयांची अब्रू काढली आहे, आणि विनम्रता कुठे दाखवायची ते आम्हाला चांगले कळते…

    "भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी…"

   6. मग घ्या काठी आणि हाणा माझ्या डोक्यात … तेही जरा अवघड वाटत असेल म्हंजे पोलीसकेस नको असेल तर प्रथम स्वतःवरच प्रयोग करून बघा…

   7. स्वतःवर प्रयोग करायला मी काही गांधी नाही…
    आणि मी तुमच्या डोक्यात का बरं काठी हाणू?

   8. आपल्या (म्हंजे तुमच्या) मनातील ब्राह्मणद्वेष ह्या "विषया"ला धरूनच लिखाण करतोय मी…

    कोणाचातरी घात करणार म्हणून चिंतेत आहे मी…

    1. त्याची चिंता तुम्हाला नसावी, आमची लढाई अश्या प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी संवैधानिक मार्गाने होणारी आहे. त्यात कुणाचा घात करण्याचा आमचा उद्देश नाही…

 2. जे काही विचार तुमचे आहेत ते मांडायचे स्वातंत्र्य आहेच..पण नाही आवडत पुरंदरेंचे विचार तर कशाला त्यांना इतके महत्व द्यायचे?

  त्यांना फार मोठे पब्लिक फॉलोईंग आहे अशी आपली समजूत आहे का? तसे नाही. त्यांचे वय आणि एकूण या विषयाचा स्कोप पाहता त्यांच्या लिखाणाने काही फार उलथणार आहे असे वाटत नाही. मग उगीच तेढ कशाला दोन समाजात?

  1. हे पुरंदरेना कळायला नको का? त्यांना public following नसले तरी भविष्यात अशी पुस्तके संदर्भग्रंथ म्हणून वापरून मराठयांचा इतिहास डागाळण्याचा प्रयत्न होऊ शकतो…

   आणि ब्राम्हणांनी जर असे धंदे बंद केले तर आम्हाला काही हौस नाही तेढ जपायला…

 3. मित्रा..
  १. संभाजी बिडीवर संभाजी महाराजांच चित्र असतं….बिडी संपल्यावर तोच कागद कचराकुंडीत किंवा गटारात सापडतो…तेव्हा अपमान नाही होत का??
  २. महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावर प्रेमवीर जेव्हा अश्लील भाषेत मजकुर लिहतात तो चालतो का???
  ३.कधी तरी सिंहगडावर संध्याकाळी चक्कर मारा…कानाकोपर्‍यातुन चाळे चाललेले असतात ….तेव्हा नाही का रक्त खवळतं???
  ४. आज काल बहुतेक गाड्यांच्या नंबर प्लेट्वर शिवरायांचा फ़ोटो आढळ्तो…त्या फ़ो्टोवर पावसाळ्यात चिखलाच ,गटारीतल पाणी उडत तेव्हा नाही का अपमान होत…

  यावर तुम्हाला काय म्हणायच आहे.

  बाबासाहेब पुरंदरेंनी जे लिहलय हे चुक की बरोबर हे समाजाला समजण्यासाठी तेवढे मजबुत पुरावे तरी ठेवा.तुम्ही तुमच म्हणण योग्य भाषेत अन योग्य पुराव्यांनिषी जनतेसमोर ठेवा मग जनता काय ते ठरवील.

  इतिहास बदलण्याअगोदर किमान आहे तो इतिहास किमान त्याच जतन तरी करा.

  अन महत्वाच महाराजांनी आम्हाला सर्व धर्म समभावाचीच शिकवण दिली आहे…तुम्हाला तुमची मत व्यकत करण्याचा पुर्ण अधिकार आहे पण योग्य भाषेत व्यक्त करा की…आरडा ओरड करुन सत्य कधी बदलु शकत नाही.

  1. मा.मुंढे साहेब आपल्या comment बद्दल धन्यवाद,

   या सर्व गोष्टी बदलण्यासाठीच आम्ही कार्यरत आहोत…
   आणि आम्ही प्रत्येक गोष्टी साठी पुरावा मांडत असतोच;
   आमचा समाज सध्या निद्रिस्त आहे, त्याच्या कानी-कपाळी ओरडून सांगितल्या शिवाय त्याला माँसाहेबांची झालेली बदनामी कळत नाही, समाजाच्या अस्मितेवर होणारे असंख्य बलात्कार दिसत नाहीत, आपल्या विरोधात होणारी षडयंत्रे कळत नाहीत…
   हे आम्ही बदलणार, कारण हि क्रांतीची सुरुवात आहे…

   "भांडारकर तो झांकी है, शनिवारवाडा अभी बाकी है…"

   1. विनित….
    समाज निद्रिस्त नाही आहे…त्यांना बरे आणि वाईट यातील फ़रक बरोबर कळतो….भावनांच राजकारण बरोबर कळत….तुमचे लेख हे एकांगी वाटतात..मला वाटत तुमचं लक्ष्य फ़क्त ब्राम्हण समाज अन बाबासाहेब पुरंदरे हेच आहेत अस जाणवत.ब्राम्हण काय किंवा मराठा काय??? दोन्ही सारखेच आहेत ना??? कशाला उगाच नको त्या भिंती उभ्या करताय.

    अन पुरावे देताना भक्क असा आधार द्यावा लागतो…तुम्ही कोणते पुरावे दिले आहेत.

    तुम्ही म्हणताय की आम्ही गोष्टी बदलण्यासाठी कार्यरत आहोत पण मला तरी कूठ आजपर्यंत निदर्शनास नाही आल.जरा त्या विषयी पोस्ट लिहल तर आम्हाला तरी कळेल आपण नक्की काय प्रयत्न केला आहे तो.

    >>भांडारकर तो झांकी ही, शनिवारवाडा अभी बाकी है..
    याने काय साध्य होणार???

    आमच्या जुन्नरमध्ये शिवजन्मभुमीत दगड्फ़ेक झाली तेव्हा तुम्ही होता का???तुम्ही त्याच पण समर्थन करणार का???

    तेवढ मनुष्यबळ गड कोट सुधारणेला द्या…महाराष्ट्र धन्य धन्य होईल.

    अजुन एक राहिलच की…
    आमचा समाज म्हणजे नक्की कोण हो????

   2. भावनांचं राजकारण आम्ही करत नाही. कारण आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत…

    आणि आमच्या कार्याविषयी लेख लिहीनच, दगडफेक असो किंवा काही असो कुठल्याच हिंसेचं समर्थन लोकशाहीत होऊच शकत नाही. आणि आमचा समाज म्हणजे बहुजन समाज…

 4. तुमच्या ब्लॉगमधील प्रत्येक लिखाणाला ब्राह्मणद्वेषाचा वास येतो. संभाजी ब्रिगेडी मंडळींचे पीत-साहित्य वाचण्याऐवजी आणि तेच आदर्श मानून उगाच एकाच जातीविषयी गरळ ओकण्याऐवजी तुम्ही सारासार विचार करून का लिहित नाही?

  आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या वरील पुस्तकाचा जो तुम्ही संदर्भ दिला आहे ते पुस्तक, जी ओळ तुम्ही दिली आहे त्या ओळीच्या पुढेमागे असलेला सर्व मजकूर तुम्ही स्वतः वाचलेला आहे का? जर तुम्ही तो वाचलेला नसेल तर तो आधी वाचून मगच यावर लिखाणकाम करा. आणि जर वाचलेला असेल तर तुम्हाला तुम्ही वर संदर्भाखातर दिलेल्या वाक्याचा अर्थच लागलेला नाही असे म्हणायला हवे. बाबासाहेब पुरंदरे यांनी वरील वाक्यातील "मराठा" हा शब्द मराठा या जातीला नसून तो मराठी ही बोलीभाषा असलेल्या महाराष्ट्रातील सर्व लोकांना उदेशून लिहिला आहे. समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांना केलेल्या "मराठा तितुका मेळवावा | महाराष्ट्र धर्म वाढवावा ||" या उपदेशातही मराठा हा शब्द जातीवाचक नसून मराठी भाषा बोलणाऱ्या महाराष्ट्रातील समुदायासाठी आहे. त्यावेळी किंवा आजही मराठा ही केवळ जातीवाचक संज्ञा नसून सर्व ठिकाणी याचा अर्थ महाराष्ट्रातील मराठी बोलणारा समाज असाच होतो. संभाजी ब्रिगेडच्या काही टाळक्यांनी क्षुद्र राजकीय स्वार्थासाठी मराठा या शब्दाचा जातीवाचक वापर करून महाराष्ट्रात परत फुटीची भावना आणण्याचा प्रयत्न चालवला आहे.

  1. सारासार विचार करूनच सर्व लिखाण आम्ही करतो, पुस्तकात लिहिलेली ओळ वाचूनच हा लेख लिहिला आहे. त्याने कुठल्याही अर्थाने जरी हे वाक्य लिहिलेले असेल तरी यातून मराठा समाजाची बदनामी होतेच होते…

   रामदास आणि शिवाजी महाराजांची कधीच भेट झालेली नसल्याकारणाने त्यांनी काय सांगितले ह्याला आमच्या लेखी महत्व नाही. आणि संभाजी ब्रिगेड च्या ३३ लक्ष टाळक्यांनी राजकारणाला कधीच तिलांजली दिली आहे. त्यामुळे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात एकीची भावना निर्माण करण्याचे काम आम्ही करतो…

  2. मलाही हे वाक्य संदर्भ सोडून काढले आहे अशी शंका येत होतीच. पण पुस्तक मिळवून वाचणे अवघड असल्याने नोंदवले नाही मत. आपण त्यातला सिलेक्टेड मजकूर न देता पूर्ण पान जरी स्कॅन करून जोडले तरी मला वाटते ९९% असं लक्षात येऊ शकेल की ते वाक्य आउट ऑफ कॉन्टेक्स्ट आहे. निदान तसं असण्याची दाट शक्यता आहे.
   खुद्द महाराजांच्या विषयी भक्तीभावाने आयुष्यभर लिहिणारी व्यक्ती त्यांच्याच मराठा जाती-समाजावर काय म्हणून चिखल उडवेल?

   1. तुम्ही ते पुस्तक वाचाच हे वाक्य एक उदाहरण आहे, अशी अनेक वाक्ये त्या पुस्तकात भरलेली आहेत…

    आणि पुरंदरेने आयुष्यभर महाराजांच्या नावे फक्त पैसा कमविला, दुसरे काही केलं नाही…

   2. नक्की..पण पुस्तक मिळवून वाचायला वेळ लागेल रुटीनमध्ये.

    बरे..एक मदत कराल का?

    हे उपरिनिर्दिष्ट वाक्य पुस्तकात "कोणाच्या तोंडी" आहे तेवढे सांगाल का?

    कदाचित त्यावरून काही खुलासा होईल.

   3. नचिकेत अगदी बरोबर आहे…हे फ़क्त पराचा कावळा करणे प्रकार चालु आहे…

    विनीत ह्यांनी वाद घालण्यापेक्षा त्यांच्या समर्थानार्थ जर पुर्ण मजकुर स्कॅन केला तर उत्तम होईल म्हणजे खर काय ते समजेल.

    1. माझ्याकडे सध्या scanner नाहीये त्यामुळे पान इथे देऊ शकत नाही, type करून देईन पण परत त्याच्या सत्या-सत्यतेविषयी शंका निर्माण होऊ शकते. त्यामुळे मजकूर काही असो माझा मुद्दा असा आहे कि राजा शिवछत्रपती हि कादंबरी आहे, त्यातील वाक्ये हि पुरंदरेंच्या मनची आहेत. त्या काळात असा काही संवाद झाला होता किंवा हे वाक्य कुठे लिहून ठेवले होते हे सांगता येत नाही. त्यामुळे अशी वाक्ये वगळायला हवीत…

   4. आपल्या सत्यासत्यतेविषयी शंका घेणार नाही… तसं असतं तर इतक्या प्रतिक्रिया लिहिल्याच नसत्या.

    फक्त काही संदर्भ सोडून काढलेली वाक्ये आणि गैरसमज नाही ना तेवढेच बघायचे आहे.

    कारण खरेच असे मराठ्यांचे नाव घेऊन म्हटले असेल तर ते चूकच आहे. मग कोणीही म्हटलेले असो.

    म्हणून "कोणाच्या तोंडी" (कोणत्या पात्राच्या तोंडी) वाक्य आहे ते सांगाल तर बरे होईल. scan ची ही गरज नाही.

 5. यार तुझी दोन वाक्य मला प्रचंड प्रचंड प्रचंड आवडली आहेत!
  १. भांडारकर तो झांकी है, शनिवारवाडा अभी बाकी है…

  २. त्यामुळे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात एकीची भावना निर्माण करण्याचे काम आम्ही करतो…

  दुसरं वाक्य तर फक्त युगपुरूषांच्या मुखात शोभण्यासारखं आहे!
  त्या एका वाक्यासाठी तुला नोबेल पीस प्राईज मिळायला हवं!

  1. भांडारकर इंस्टीटयुट वर हल्ला झाला तसा शनिवारवाड्यावर करण्याची गरज नाही. विध्वंसक काम करण्याऐवजी उभारणीचं काम करावं शनिवारवाड्यासमोर जो बाजीरावाचा पुतळा आहे त्याच्या शेजारी महादजी शिंदे व मल्हारराव होळकर यांचे तेवढ्याच उंचीचे पुतळे उभारायची मागणी करावी कारण बाजीरावाचा पराक्रम हा त्याचा एकट्याचा नव्हता. जर शिंदे-होळकर नसते तर बाजीराव एवढा पराक्रम करूच शकला नसता हे तरी ऐतिहासिक सत्य आहे येवढे मान्य करावे व हे पुतळे उभारावे. पुतळे उभारतांना पुर्वी कधीतरी पुर्वग्रह दुषीत पद्धतीने इतिहासाचा अर्थ लावला गेला आहे हे खरेच आहे. दादोजी कोडदेवाचा पुतळा उभारण्यामागचा पुणे महापालीकेच्या निर्णयाचा खराखुरा इतिहास समोर आला तरी हे स्पष्ट होईल.

  1. हसा… तुम्हाला हसू येणारच…

   कारण ज्यांच्या अस्मितेला धक्का पोचतो तेच पोटतिडकीने बोलतात. बाकीचे फक्त हसतात. हसा…

   1. अहो विनीत मी तेच म्हणतोय…गडांची विटंबना होते आहे तेव्हा कुठे जाते अस्मिता…त्याबद्दल तुम्ही काहीच सांगत नाही.

    1. गडांची होणारी विटंबना थांबवण्यासाठी आम्ही पुरातत्व खात्याशी संपर्क केला, व त्यांना request केली कि आम्हाला गडांवर डागडुजी करण्याची परवानगी मिळावी पण पुरातत्व खात्याने परवानगी नाकारली, पुरातत्व खाते आपले काम विसरून फक्त एखाद्या सापासारखे गडांवर वेटोळे घालून बसला आहे. त्यासाठी जनमताचा रेटा निर्माण करण्याचे काम चालू आहे…

 6. विनित…
  उगाच फुकाची बड्बड करण्यापेक्षा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या "राजा शिवछत्रपती"या पुस्तकातील तुम्हाला आक्षेप वाटणारे जे वाक्य आहे,ते वाक्य असलेले संपूर्ण पान इथे स्कैन करा…म्हणजे दूध का दूध और पानी का पानी…काय आहे ते सत्य समोर येइल.

  अजून एक मोलाचा सल्ला म्हणजे दैनिक मुलनिवासी सारख्या संध्यानंद छाप विनोदी वर्तमानत्रातील लिखाण पुरावे म्हणून इकडे सादर करू नका….हसून हसून वाट लागते.

  1. मी फुकाची बडबड करत नाही, ज्यांना शंका असेल त्यांनी ते पुस्तक वाचावे…

   मला हे म्हणायचं आहे कि ते वाक्य कसल्याही संदर्भात वापरू देत; इथे common मराठा जातीला उद्देशूनच ते लिहिले आहे, कारण त्या काळात असा काही संवाद किंवा लेखी पत्रव्यवहार झाला होता याचे पुरावे पुरंदरेने मांडलेले नाहीत…

   आणि दैनिक मूलनिवासी नायक हे बहुजनांचे वर्तमानपत्र आहे, ज्याचा प्रचंड खप कधीच बामणी ABC-IRS सर्व्हे मध्ये येणार नाही. मला वाटते संध्यानंद online मिळत नसावा…
   (www.mulnivasinayak.com)

 7. नमस्कार विनीतराजे,
  मला काही प्रश्न विचारायचे आहेत
  खंडोजी खोपडे आणि जावळीचे मोरे पण होतेच ना!
  चांगली आणि वाईट सर्व समाजात असते हो !
  बाबासाहेब पुरंदरेंनी त्या पुस्तकात ब्राह्मणांवर पण टीका केली आहे..तुम्ही वाचली असेलच
  सर्व ब्राह्मणाना एका चष्म्यात का बघता ?
  तुमचे थोर विचारवंत पुरुषोत्तम खेडेकर जरा मराठा समाज आणि कुणबी समाज यांच्यात रोटी आणि बेटी व्यवहार होण्यासाठी
  प्रबोधन करतील का? अजूनही माझे मराठा मित्र कुणबी मित्रांना कुणबट आणि मागासवर्गीय असे हिणवतात !
  सातारचे शिवरायाचे १३ वे वंशज उदयन राजे पण अशा तुमच्या नव्या इतिहासाला भीक घालत नाहीत!
  माझ्या होस्टेल वर शिवजयंती साजरी होत असे त्या वेळी काही मराठा मुले दारू पिऊन नाचत असत मिरवणुकी मध्ये!
  सांगायचा मुद्दा असा आहे की हा द्वेष सोडून द्या !
  आपण सगळे मराठी आणि मराठा एक आहे..कृपया विष पसरवू नका!

  1. प्रबोधनाचे कामच आम्ही करत आहोत, मा.खेडेकर साहेब स्वतः याच दृष्टीने कार्यरत आहेत. आणि मराठा व कुणबी हे एकच आहेत, त्यांना बामणांनी वेगळं दाखवायचं सुरु केलंय. I think मंडल आयोगाच्या निर्णयानंतर…

   छ.उदयन राजेंना आम्ही समजावू. त्याची चिंता तुम्हाला नसावी. आणि ज्या बिघडलेल्या पोरांचे तुम्ही उदाहरण देताय त्यांची टाळकी सुधारण्याचेच काम आम्ही करतो…

 8. बाबासाहेब पुरंदरे यांनी जर चुकीचा इतिहास लिहिला व तो एवढा लोकप्रिय झाला असे तुम्हाला वाटत असेल तर एक नवीन शिवचरित्र लिहा.अन जर तो लीहायची जर हिम्मत नसेल तर कृपया करून आपल ज्ञान फक्त अन फक्त ब्राम्हण द्वेष करण्यात घालवू नका.कारण टायने काहीही साध्य होणार नाही.

  1. नवीन पुस्तके लिहिण्याचं काम तर सुरूच आहे, पण गुरुवर्य कृ.अ. केळुस्कर, वा.सी. बेंद्रे, न.र. फाटक, कॉम्रेड शरद पाटिल, महात्मा फुले, प्रबोधनकार ठाकरे, त्र्यं.श. शेजवलकर, यांची पुस्तके वाचून पहा. आणि आमची हिम्मत जोखायच्या नादाला लागु नका…

 9. च्या मारी धरून फट्याक… अशीच अद्दल शिकवली पाहिजे या ब्राह्मणांना.. स्वारी स्वारी.. तुमच्यात 'ब्राह्मण' हा शब्द 'बामण' असा बोबडा लिहिण्याची पद्धत आहे नाही का.. स्वारी.. चुकलो.. अशीच अद्दल शिकवली पाहिजे या बामणांना..

  रारा राजे, मी आपला आणि ब्रिगेडचा पंख झालो आहे. ब्रिगेड जॉईन करण्यासाठी काय करावं लागेल.. अरे हो पण मी ब्राह्मण.. स्वारी.. पुन्हा तीच चूक झाली.. मी बामण आहे.. तरीही घ्याल का तुम्ही मला तुमच्या संघटनेत? कारण ज्या शिवाजी महाराजांच्या/संभाजी महाराजांच्या नावाने तुम्ही तुमची दुकानं चालवता त्यांच्या पदरी तर सगळ्या जातीधर्माचे लोक होते. त्यांनी कधी रामदासस्वामींना 'ए रामदाश्या', मोरोपान्तांना 'ए मोऱ्या', गागाभट्टांना 'ए गाग्या' म्हणून हिणवल्याचे स्मरत नाही..

  असो अजून एक.. मी तुमच्याइतकाच 'दै. मूलनिवासी नायक' या महान वृत्तपत्राचा (या महान ग्रंथाला वृत्तपत्र म्हणणं हे खरं तर अंडर स्टेटमेंट आहे. असो..) देखील पंखा झालो आहे. वार्षिक वर्गणी काय आहे या ग्रंथाची? किंवा जाऊ दे… सरळ आजीव सभासदत्व घेण्यासाठी काय करावं लागेल तेच सांगून टाका..

  लिहिता लिहिता मला तुमच्या संघटनेसाठी पुढचं कॅप्शनही सुचलं…

  "रामदाश्या तो झांकी है, ज्ञानेश्वर अभी बाकी है" (तुमच्या वैचारिक सुंता झालेल्या वैचारिक नपुंसक कार्यकर्त्यांना माहित नसेल तर हे सांगतो कि ज्ञानेश्वर हे ही बामणच होते.. कऱ्हाडे बामण)

  पार्श्वाभागात (याला बोबड्या भाषेत काय म्हणतात हे सांगायची गरज नसावी माझ्या मते) दम असल्यास ही प्रतिक्रिया छापाच.

  1. आमच्या संघटनेत बामणांना प्रवेश नाही, मूलनिवासी नायक online उपलब्ध आहे वाचत चला.

   आमच्या पार्श्वभागात नाही तर मनगटात दम आहे, पार्श्वभागात त्यांनी दम बाळगावा ज्यांना प्रत्येक वेळेस पार्श्वभाग पुढे करावा लागतो…

   1. माफ करा पण लेखणी आवरणे नाईलाजाने अवघड बनले….

    संघटना नपुसंक आहे म्हंटल्यावर त्यांनी संघटना पाठवणे आवश्यक आहे… आणि संघटना ही स्रीरुप आहे, तो काही संघ नव्हे…

    तेव्हा आपले विधान हे महर्षि वाल्या कोळी ह्यांच्याच पंक्तीतले आहे… अगोदर आपल्या सर्व सभासदांना विचारा की ते तुमच्या प्रेग्नन्सी दर्पोक्तीत सहभागी आहेत का…

    उत्तर छान दिलेत पण प्रश्न समजला का? हाच प्रश्न आहे…!

    1. प्रश्न समजला पण संतापाच्या भरात ते वाक्य निघाले. मी ती comment मागे घेऊन सुधारित comment दिली आहे. आणि भविष्यात अशी वाक्ये इथे लिहिली जाणार नाहीत (किमान माझ्याकडून तरी)…

     आणि ते वाक्य माझे वैयक्तिक होते/आहे. पण तशी वक्तव्ये मांडण्याची जागा हि नव्हे. या वाक्याचा आणि संघटनेचा काहीएक संबध नाही…

 10. काय लिहिता हो तुम्ही वा! मला तर तुमची जहाल लेखन शैली खुप आवडली, तुम्ही उगाचच हे ब्लॉग वगैरे लिहिण्याच्या भानगडीत पडता आहात, कादंबरी लिहा "बाबा पुरंदरेची हरामखोरी…" म्हणुन, राजे शिवछत्रपती पेक्षा जास्ती खप होईल, शाळेत शिकायला ठेऊया. भांडारकर तो झांकी है, शनिवारवाडा अभी बाकी है… ही घोषणा तर ऎतिहासीक आहे, शिवराय धन्य झाले, वा लाजवाब!

 11. "ते वाक्य कसल्याही संदर्भात वापरू देत; इथे common मराठा जातीला उद्देशूनच ते लिहिले आहे.."

  याच्याशी थोडीशी विनम्र असहमती.

  उदा. "फेड रे तिचे वस्त्र.." हे वाक्य महर्षि व्यासांनी एका पुस्तकात लिहिले (जे पुस्तकही अशीच एक सेमी काल्पनिक महाकादंबरी आहे) म्हणून महर्षि व्यास (ब्राह्मण की कोण ते बाजूला ठेवू) स्त्रीलम्पट किंवा विकृत ठरत नाहीत.

  केव्हा? जर ते वाक्य असं पूर्ण वाचलं तर:

  उदा:

  दुर्योधन म्हणाला, दु:शासना पाहतोस काय ..फेड रे तिचे वस्त्र..

  अर्थात अगदी अस्साच प्रकार श्री पुरंदरे यांच्या लिखाणात झालाच आहे असा दावा नाही. फक्त ते तसे नाही ना हे क्लीअर व्हावे म्हणून संदर्भ , आय मीन, कोणाच्या तोंडी किंवा कोणत्या परिस्थितीत ते वाक्य आहे ते देण्याची विनंती केली होती.)

  1. महर्षी व्यासांनी ते वाक्य लिहिले कारण दुर्योधन वाईट प्रवृत्तीचा त्यांना चित्रित करायचा होता, आणि तो असेलसुद्धा. हे वाक्य कोणाच्याही तोंडी असो, भविष्यात त्यातून असे प्रतीत होईल कि पूर्ण मराठा जातच अशी होती, जे कि कौरवांच्या बाबतीत घडले…

   मान्य आहे कि खंडोजी खोपडे, चंद्रराव मोरे गद्दार होते, पण त्यासाठी पूर्ण मराठा जातीला दूषण देणे योग्य नाही. पुरंदरेला specific नाव देऊन तसे म्हणता सुद्धा आले असते. उदा. खंडोजी खोपडे आई विकायला कमी करणार नाही…

 12. "पूर्ण मराठा जातीला दूषण देणे योग्य नाही…
  पुरंदरेला specific नाव देऊन तसे म्हणता सुद्धा आले असते… उदा. खंडोजी खोपडे आई विकायला कमी करणार नाही…"

  हा तुमचा युक्तिवाद आत्ता तरी बिनतोड दिसत असून क्षणभर निरुत्तर करणारा आहेच. शिवाय पुरंदरेंना किंवा ब्राम्हणांना डिफेंड करण्याचा हेतू माझा मुळातूनच नसल्याने काहीच्या बाही मुद्दे वादासाठी काढायचे नाहीयेत.

  मला वाटते आता पुस्तक वाचल्याशिवाय काही बोलणे व्यर्थ..

  फक्त एक उगीच प्रयत्न करतो. काही पात्रे जात, जमात, धर्म, लिंग यांवर जनरलाईज्ड वाईट भाष्य करताना अनेक साहित्य कृतींमध्ये दिसतात.

  "माजलीत XXडी (जातीचे नाव)"
  श्यामची आई मध्ये मला वाटते लग्नाच्या जेवणात अन्न मागायला आलेल्या दलित बाईला उद्देशून एक कर्मठ ब्राम्हण असे ओरडतो…

  शिवाय श्याम एका म्हाता-या बाईला पडलेली मोळी उचलून द्यायला जातो तेव्हा ती क्ष जातीची असल्याने एक कर्मठ ब्राम्हण श्यामला बरेच सुनावतो आणि त्या अनुषंगाने त्या बाईच्या जातीचा उल्लेख करून अपमान करतो.

  मात्र शाम आणि त्या अनुषंगाने साने गुरुजीसुद्धा त्या कर्मठाच्या जातीवाचक उल्लेखाचा आणि अस्पृश्यतेचा विरोध त्याच कथेत करतात. किंबहुना त्या विरोधा साठीच ती कथा लिहिली आहे. श्याम त्या क्ष जातीच्या म्हातारीला पडलेली मोळी उचलून डोक्यावर चढवायला मदत करतो. नंतर त्याची आई त्याला आंघोळ घालते कारण जातीयतेचा तत्कालीन घट्ट फास. पण त्या फासातूनही जात न बघता मदत करण्याची वृत्ती आणि पुढे गुरुजींनी स्पेसीफिकली दलितांसाठी केलेले सर्व कार्य पाहता त्यांच्या पुस्तकातल्या अशा वाक्यांवरून ते वर्णद्वेषी होते असे म्हणणे योग्य का?

  पुरंदरे आणि साने गुरुजींची तुलना नाही.. कृपया तसे समजू नये. पुरंदरे यांनी तसे काही कार्य केलेले माहीत नाही.. फक्त साहित्याचे उदाहरण दिले. संदर्भ सोडून काढलेल्या वाक्यांने फार ध चा मा होतो म्हणून.

  म्हणजे साने गुरुजी या ब्राम्हणाने "माजलीत XXडी" असे वाक्य लिहिले आहे..इतकेच म्हटले तर.

  साने गुरुजींचे दलितांसाठी कार्य किंवा महर्षी कर्वे यांनी बालविधवा आणि स्त्रियांसाठी केलेले कार्य यांमध्ये ते केवळ ब्राम्हण आहेत म्हणून षडयंत्र, दुष्ट हेतू शोधता येईल का हा वेगळा प्रश्न..त्यात आत्ता पडायचे नाही.

  1. साने गुरुजींनी लिहिले ती तत्कालीन परिस्थिती दर्शविण्यासाठी, आणि अजूनही खेडेभागात हि स्थिती आहेच
   (मी स्वतः खेडयातील असल्यामुळे "पदरचा अनुभव")…

   त्यामुळे पुरंदरेच्या वाक्याची आणि साने गुरुजींच्या वाक्याची तुलना होऊ शकत नाही…

   साने गुरुजींनी किंवा महर्षी कर्वेंनी केलेले कार्य आम्ही नाकारत नाही, पण साने गुरुजींनी दलितांसाठी मंदिर प्रवेशाऐवजी शिक्षण मिळण्यासाठी उपोषण केले असते तर बरे झाले असते…

   आणि महर्षी कर्वेंनी खुद्द विठठल रामजी शिंदे या मराठा सहकार्‍याच्या बहिणीला आश्रमात प्रवेश नाकारला होता, कारण "त्या मराठा होत्या म्हणून"…

   1. Vinit ugach udava udavi karu naka. Nachiket cha mudda 100% barobar aahe. Tumhi Sane Gurujinchya vakya baddal kaay mhanal?

    Ani Sane Gurujinni Dalitanna pravesh milavun dila he kahi lahan karya nahi. Agadi atta atta paryant aplya kade shikshanala kami mahatva dila jaaycha. Tyamule tyanna dalitanna mandirat pravesh milavun dena adhik mahatvacha vatala asel. Te tumha-amhala thauk asne kathin aahe. Navhe, tase bhedbhav karna yogya nahi.

    Ani Karvyanchya tya krutyache kahi purave baghayla milale tar bara hoil. Ani jara tatastha srot (Sambhaji Brigade va tatsam sanstha sodun) asla tar bara hoil.

    1. वाचा-
     महर्षी शिंदे, लेखक-हिराजी पाटील.

     आणि मला वाटते महात्मा फुलेंनी आपल्याला शिकवून फार मोठी चूक केली…
     साने गुरुजी तर फुलेंच्या नंतरचे, फुलेंना जे कळले ते सानेंना कळू नये का?

   2. संस्थेची खूप जवळून ओळख असलेल्या व्यक्तींकडून आणि स्वत: कर्वे यांच्या चरित्रावरूनही प्रवेश नाकारल्याची घटना खरी असल्याचे दिसते. त्यात मूळ उद्देश काहीसा वेगळा दाखवला असला आणि श्री शिंदे यांना विश्वासात घेऊन त्यांच्या संमतीने हा प्रवेश न देण्यात आला असल्याचे सांगितले असले तरी तात्विकदृष्ट्या त्याला तसा काही अर्थ नाही. सुदैवाने यथावकाश या संस्थेने सर्वांनाच आपले दार उघडे केले आणि आज ती या सर्वापलीकडे गेली आहे ही समाधानाची गोष्ट. शिवाय कर्वे यांनी प्रांजळपणे स्वचरित्रात उल्लेख केलाय ही त्यातल्यात्यात बरी गोष्ट.

    "मराठा" म्हणून प्रवेश नाकारला असे नव्हे तर "अब्राह्मण म्हणून नाकारला.." कारण अब्राह्मण समाजातून त्यांच्या विधवा पुनर्वसन कार्याला होणारा विरोध अधिक कडवा आणि त्यांच्या तत्कालीन शक्तीपलीकडला असावा (ज्याने कार्यच कोलमडून पडले असते असा त्यांचा दृष्टीकोन होता.) असे दिसते. ही म्हटले तर त्या काळातली जेन्युईन तडजोड किंवा म्हटली तर सारवासारव आहे.

    ते जे काही असो..ब्राम्हण नसल्याने एकेकाळी एका भगिनीला प्रवेश दिला गेला नाही ही मूळ वस्तुस्थिती खेदाने मान्य करावी लागेल..हे सत्य आहे.

 13. विनितभाऊ, मी अखिलेश परब. आडनाव यासाठी सांगितले कारण मी मराठा (कुळ:बागवे गोत्र:कौन्डीण्य इत्यादी) आहे हे कळावे. कोकणस्थ! (जनरली "कोब्रा" म्हणतात त्या चालीवर "कोम" म्हटलं इतकंच! :))
  एखाद्या गोष्टीचा द्वेष असला की ब्रेनवॉश करणं कठीण जातं जस की इस्लाम धर्मियाना अल्ला वा कुराण विरोधातला शब्दही खपत नाही तसंच. त्यामुळे मी तो प्रयत्न करणार नाही.. असो!
  एनीवे..

  "लाचार, स्वार्थी, गुलाम मराठा पुरुष" असं म्हटल्यानंतर मी मराठा असूनही मला वाईट वाटण्याचे कारण नाही कारण पहिली सगळी विशेषण मला लागू नाहीत.. पटतंय का? मराठी वाकय कसं वाचतो त्यावर त्याचा अर्थ बर्याचदा ध्वनित होतो. मी तरी हे वाकय असं वाचलं होतं. त्यामुळे मला वाईट नाही वाटलं!

  मुळात लेखक म्हणून ज्याच्या त्याच्या स्वतंत्र कल्पना असतात;अभ्यास असतो..
  विश्वास पाटील या आयएएस मराठा व्यक्तीने, गणोजी शिर्क्याने (नात्याने मेव्हणा) केलेल्या विश्वासघातामुळे संभाजी महाराज कसे औरंग्याच्या हातात पडले हे "संभाजी" कादंबरीत वर्णन केलं आहे.. मराठ्यांनी भडकलेल्या माथ्यानी पानिपतात केलेला सावळागोंधळ हि सर्वश्रुत आहे. त्याचं वर्णनही एका मराठ्यानच चित्रित केलं आहे. पुरंदरे यांनी (हा आदर त्यांच्या वयामुळे, कार्यामुळे) केलेली बाटग्या ब्राम्हणांची वर्णनं देखील कादंबरीत आहेत. मी या कादंबऱ्या (विकत घेऊन) वाचल्या आहेत. कारण शिवाजी महाराज,संभाजी महाराज,मराठा साम्राज्य याबाबतीत असलेल्या कुतूहलापोटी त्यासंबंधित कादंब-या माझ्या संग्रहीदेखील आहेत .

  तिसरी गोष्ट: भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवरील हल्ला हा त्यांना धडा शिकवण्यासाठी केला हे संपूर्णतः मान्य! कारण त्यांनी दिलेल्या माहितीशिवाय लेननं तो मजकूर छापला नसावा..तसंच कोण्या ब्राह्मण संस्थेनं या गोष्टीचा निषेध केल्याच ऐकिवात नाही!! पण म्हणून एकमेव ब्राह्मण बाबासाहेब पुरंदरे ज्यानं महाराजांच्या कार्यकर्तृत्वासाठी आपलं तन मन धन वेचलं त्याचा दु:स्वास नसावा.. त्यांनी महानाट्यातूनल,कादंबर्यातून पैसे कमावले हे जरी खरं असलं तरी त्यासाठी तहानभूक विसरून,पदरचा पैसा खर्चून,कर्ज काढून, अनवाणी पायांनी गडांची भ्रमंती केल्याच एखाद्या मराठ्याच उदाहरण मला दुर्दैवानं सापडलं नाहीये!

  आपल्या खेडेकर साहेबांची काही पुस्तकदेखील मी चाळली होती. एखाद-दोन असावीत.. पण वाकया वाकया तून भरलेल्या ब्राह्मणद्वेषामुळे ती विकत घेवावली नाहीत!! मी (शिवराय आणि संभाजी महराजांना जो अर्थ अभिप्रेत होता तसा) कट्टर मराठा जरूर आहे पण मुलुखाचा बामनविरोधी नाही त्यामुळे ती काही पचनी पडली नाहीत. अर्थात ती एखाद्या मराठ्याने लिहिली असती तर निदान विचार तरी केला असता.. पण खेडेकर मराठा नाहीत असं कळलं तेव्हा तो विचार काढून टाकला.

  कोणाचही कर्तृत्व असेल तर ते उफाळून येतंच.. जसं एकालाव्याच नाव (कुत्र्याच्या घशात बाण मारण्याव्यातिरिक्त त्याच इतर काही कार्य वाचल्याचं स्मरत नाही, मग गुरुदाक्षिणा दिली ती कथा..) व्यासदेखील टाळू शकले नाहीत.. तसंच शिवरायांच नाव त्यावेळचे लेखक ब्राह्मण असले तरी टाळू शकले नाहीत यातच सगळं काही आलं.. त्यासाठी इतर कोणाची जरूरच काय? बरोबर नं?

  1. मा. अखिलेश आपल्या comment साठी धन्यवाद…

   तुम्ही गोत्र वगैरे सांगितलंत चांगलं केलं, आपण काय सांगतोय ह्याची कल्पना नसल्यावर कुणी ती गोष्ट अपमानास्पद का असेना पण किती अभिमानाने सांगतो याचे उत्तम उदाहरण… गोत्र, कुळ, आणि क्षत्रियत्व यावर एक लेख लवकरच पोस्ट करणार आहे, कृपया वाचावा…

   मराठे पानिपतात का हरले यावर हि एक लेख लिहीन… तो हि वाचावा कारण comment मध्ये ती गोष्ट बसवणे शक्य नाही…

   पुरंदरे फिरले पण मानधन घेऊनच… नाटके, कथाकथन याचे पैसे घेऊनच, आणि ह्या जमा केलेला पैश्यातून भांडारकर संस्थेला निधी पण दिला!

   आणि खेडेकर साहेब मराठा नाहीत असे तुम्हाला कुणी सांगितले? तुम्ही पुस्तके तटस्थपणे वाचावीत… पूर्वग्रह मनात ठेवून नाही…
   एकलव्याच्या बाबतीत, तो जगातील सर्वश्रेष्ठ नेमबाज होता… पण आपला शिष्य सर्वश्रेष्ठ ठरावा, म्हणून एका ब्राम्हणाने त्याच्या प्रामाणिकपणाचा गैरफायदा घेतला…

   नाव टाळण्याच्या बाबतीत, शिवाजी महाराजांच्या बद्दल फक्त पुस्तकांमुळे ते जगाला माहित नाहीत, तर त्यांच्या कर्तृत्वामुळे माहित आहेत… त्यामुळेच ब्राम्हण त्यांना टाळू शकले नाहीत…

 14. एका संकेत स्थळावरून मिळालेली माहिती

  ब्राह्मणांनी मराठी दौलतीची ईभ्रत घालवली ! खरंच घालवली का ? माझ्या मते मराठी दौलतीची खरी इभ्रत ज्यांनी घालवली त्या मराठा सरदारांची ही पहा खाली यादी. या सर्व सरदारांनी महाराजांच्या विरुध्द कटे कारस्थाने करण्यात व त्यांच्या (महाराजांच्या) विरूध्द मोगलांना व मुसलमानांना मिळून लढण्यात धन्यता मानली. यात एकही महार, मांग, माळी इ. नाही. सर्व ९६ कुळीच आहेत. आता प्रवीण गायकवाड यांच्या सध्याच्या वंशजांच्या घरादारावरून गाढवाचा नांगर फिरवणार का ? आहे का त्यांच्यात एवढी ताकद ? फटके बसतील.
  ज्या दादोजी कोंडदेवांनी आपली हयात महाराजांची सेवा करण्यात घालविली त्यांचे चांगलेच पांग फेडतोय आपण. यांच्या डोक्यात हे शिरत नाही आहे की ते त्यांचा पुतळा काढून जेम्स लेनच्या म्हणण्यालाच पुष्टी देत आहेत. हा पुतळा का काढला असे जर भविष्यात विचारले तर काय सांगणार गायकवाड ?
  असो वाचूया………….

  १ जावळीचे मोरे
  २ यशवंतराव वाड्वे
  ३ मुधोळचे घोरपडे
  ४ सिधोजी पवार
  ५ मंबाजी भोसले
  ६ मालोजी पवार
  ७ तुळोजी पवार
  ८ मनाजीराजे घाट्गे
  ९ बाळाजी हैबतराव
  १० बजाजी राजे नाईक निंबाळकर ( महाराजांचे सख्खे मेव्हणे)
  ११ माने ( विजापूर)
  १२ संभाजी मोहिते ( सावत्र मामा)
  १३ नाईकराजे पांढरे
  १४ खंडोजी खोपडे ( मावळ)
  १५ जगदाळे देशमूख ( मसूरचे)
  १६ शंकराजी मोहिते
  १७ नाईकजी खराटे
  १८ कल्याणजी यादव
  १९ सरदार सर्जेराव घाटगे
  २० सूर्यराव सूर्वे ( श्रूंगारपूर)
  २१ पालवणीचे जसवंतराव
  २२ संवतवाडीचे राजे भोसले
  २३ गोंदाजी पासलकर
  २४ केदारजी देशमूख खोपडे
  २५ सुरजी गायकवाड
  २६ दिनकरराव काकडे
  २७ संभाजीराव पवार
  २८ कमळोजीराव कोकटे
  २९ त्रंबकराव खंडागळे
  ३० कमळोजीराव गाडे
  ३१ अंताजीराव खंडागळे
  ३२ त्रंबक्जीराजे भोसले ( भाऊबंद)
  ३३ जिवाजीराजे भोसले ( भाऊबंद)
  ३४ बाळाजीराजे भोसले ( भाऊबंद)
  ३५ परसोजीराजे भोसले ( भाऊबंद)
  ३६ माहूरचे उदाराम भोसले
  ३७ सिंदखेडचे दत्ताजीराजे जाधवराव
  ३८ रुस्तूमरावराजे जाधवराव
  ३९ संभाजीराजे स्वतः ( दिलेरखान)

  अजून्ही बरेच् आहेत, पण जाऊदेत….

  हे सर्व त्या काळातील मोठे सरदार होते. हे नुसते स्वार्थासाठी महाराजांविरूध्द लढले नाहीत तर त्यांनी आपल्या सैन्यातल्या सर्व मराठ्यांना महाराजांविरुध्द लढायला लावले. महाराजंची मला वाटते निम्म्याच्या वर शक्ती यांच्याशी लढण्यातच खर्ची पडली असणार.

  महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत ब्राह्मणांचा असा इतिहास नाही आणि पुढेही नाही.

  शाहूमहाराजांच्या काळात तर त्यांच्या विरूध्द असंख्य मराठा सरदार होते. त्यांची यादी तर आपल्याला अचंबितच करेल.

  उरला प्रश्न पेशव्यांचा. शाहू महाराजांना पेशवे पदाच्या लायक दुर्दैवाने एकही मराठा सरदार सापडला नाही हे सत्य आहे. दुसरे म्हणजे शाहू महाराजांचा त्यांच्या एकाही सरदारावर विश्वास नव्हता. पुढे शाहूमहाराजांचे सर्व सरदार केव्हा ना केव्हा तरी कुठल्या तरी कारणाने शाहू महाराजांशी लढले पण पेशवे शेवट पर्यंत त्यांच्याशी एकनिष्ठ राहिले. त्या मुळेच पेशव्यांचे संस्थान नाही. इंदूर नाही, ग्वाल्हेर नाही आणि बडोदाही नाही. पेशवे सारखे कर्जबाजारी रहायचे त्याचे मूख्य कारण म्हणजे त्यांनी भारतभर चालवलेल्या मोहिमा. त्या मोहिमेसाठी शाहूमहाराज त्यांना पैसे देत नसत. उलट मोहिमेवरून आल्यावर त्यांना ठराविक खंडणी शाहूराजांना द्यावी लागे. त्यामुळे त्यांनी शनिवार वाड्याला पैसे दिले हा दावा हास्यास्पद आहे.

  असो. त्या काळात या लोकांना जसे वागावे लागले तसे ते वागले त्या बद्दल त्यांना दोष देता येणार नाही. ज्या प्रमाणे आपण हा विचार या महाराजांच्या विरूध्द कारस्थाने करण्यार्‍या सरदारांबाबत आणि त्यांच्या जातीतल्या सध्याच्या समाजाबाबत करतो, तर एका मूर्ख माणसाने महाराजांबद्द्ल काहिही घाणेरडे लिहिले म्हणून ज्या माणसाने आपले आयूष्य महाराजांना वाहिले आणि ज्या माणसाबद्द्ल प्रत्यक्ष महाराजांना आदर होता त्यांच्या बद्द्ल अशी वागणूक आपल्याला शोभा देत नाही. आणि ते सुध्दा का ? या मूठ्भर क्षुद्र राजकारण्यांसाठी आणि त्यांच्या स्वार्थासाठी. उद्या कोणीही उठेल आणि काहिही लिहील मग काय करणार…………..

  1. काही मराठा सरदार गद्दार होते आम्ही कधीच नाकारलेलं नाही, पण ह्या यादी सोबतच

   १) कृष्णा भास्कर कुलकर्णी
   २) राज्याभिषेकाला विरोध करणारे ब्राम्हण
   ३) दिलेरखान जिंकावा म्हणून यज्ञ करणारे ब्राम्हण
   ४) आदिलशहा विरोधात पुंडाई करू नये म्हणून पत्र लिहिणारा कोंडदेव
   ५) नेताजी पालकर ला हिंदू धर्मात पुनःप्रवेश देण्यास विरोध करणारे ब्राम्हण
   ६) शुद्राच्या हाताखाली काम करतोय असे म्हणणारा मोरोपंत पिंगळे
   ७) शाहिस्तेखानाकडून लढणारी रायबाघीन
   ८) मिर्झाराजे जयसिंगाचा सचिव उदयराज
   ९) औरंजेबाचा प्रधान रघुनाथदास
   १०) औरंगजेबाचा शिवनेरीवरचा किल्लेदार आबाभट
   ११) सिद्दीला मदत करणारा मुरुड-नांदगाव येथील जोशी
   १२) बापूखानाला मदत करणारा नागोजी पंडित
   १३) राज्याभिषेक प्रसंगी स्वराज्याचा पैसा लुटणारा गागाभट्ट
   १४) शिवाजी-व्यंकोजी यांच्यात भांडणे लावणारा रघुनाथपंत हणमंते
   १५) हैदराबादचे बादशहाचे अधिकारी मादन्ना-आकन्ना
   १६) संभाजीराजांना मुगलांच्या ताब्यात देणारा कवी कुलेश
   १७) शिवशक बंद करून फसली शक सुरु करणारे पेशवे

   आणि आताचे latest शिवद्रोही:

   १) तारीख तिथीचा वाद निर्माण करणारे पुरंदरे आणि साळगावकर
   २) खोटा इतिहास, कादंबर्‍या लिहिणारे य.दि.फडके
   ३) जेम्स लेनला मदत करणारे भांडारकरी ब्राम्हण
   ४) संभाजीराजांविषयी कथा, कादंबर्‍या, चित्रपट यातून चुकीचा इतिहास पसरवणारे ब्राम्हण
   ५) शिवरायांचा मृत्यू अन्थ्रेक्स ने झाला असं पसरवणारा निनाद बेडेकर

   ह्याचं नावही जोडायला पाहिजे…
   हि लिस्ट अत्यंत मोठी आहे स्थलाअभावी पूर्ण देता येत नाही…

   आम्ही वारंवार सांगतो कि आमचा राजकारणाशी काहीएक संबंध नाही, तरी तुम्ही एकंच तुणतुणं वाजवता आहात, राजकारण राजकारण म्हणून…

 15. विनित,
  एक गोष्ट मला महत्वाची वाटते,मराठा सरदारांनी महाराजांना विरोध केला परंतु तो विरोध सत्ता, मान- अपमानासाठी होता.महाराज स्वराज्याची उभारणी करत असताना हे सरदार स्वताला राजे समजत त्यामुळे त्यांना त्यांना दरबारात मन पाहिजे.तो निजामशाही मिळत होता त्याच्या जोरावर ते प्रजेचा छळ करत . हे महाराजांना न खपणारी गोष्ट होती . कारण ते प्रजेचे पालनकर्ते झाले होते.त्यांचा विरोध हा सत्तेसाठी होता. महाराजांचे प्रस्थ वाढते हे त्यांना व त्यांच्या अधिकाराला बाधा आणणारे होते .
  मुद्दा असा आहे मराठ्यांनी जरी महाराजांना त्रास दिला तरी त्यांना चिथावणी देणारे बामनच होते याचीही यादी काढावी लागेल.हे बामन या सरदारांना फितवून आपली पोळी भाजत होते कारण त्यांची देव धर्माच्या नावावर चालणारी दुकाने महाराजांच्या तेजाने जळत होती.आणि हे सरदार या बमनांना दक्षिना व गावाची हुकुमशाही देत होते.
  आपण दिलेल्या बामणांची याद हि त्यापैकी एक आहे. हे बामन जर स्वाभिमानी आणि या भूमीतल्या मातीशी निगडीत आसले असतेतर हे सरदार पण स्वराज्याचे पाईक झाले असते. पाहणा इतिहाची पुनरावृत्ती बाबासाहेब बेडेकर सारखे करत आहे व आपल्या समाजातील आपल्याच तरुणांना हाताशी धरून खोटा इतिहास सांगून आपल्याच विरुद्ध भडकवत आहे.
  आज पासून मी पण आपल्या पतीशी आहे तुमची मिशन अशीच चालू द्यावी हि विनंती
  स्वराज्याचा पाईक

 16. विनीत
  काही शाब्दिक चुका झाल्या आहेत उदा:मान जागी मन ,
  पाठीशी जागी पतीशी अशा चुका …
  समजून घ्या नाहीतर हे बामन पुन्हा ध चा मा करून ठीवतील

 17. Mr.Akhilesh Parab > Sambhaji Maharajanbaddal vacahayache Zale tar Krupaya Adv.Anant V. Darwatkar Sanshodhit

  अद्वितीय छ.श्रीसंभाजी महाराज yache 3khand prakashit zalele aahet aapnas vikat ghevun pustakanacha aabhyas karnyachi aawad aahe hey kalale mhanun salla dyawasa vatala….. kadambaryatun Itihas nave katha prakashit Hotat hey khand wacha mhanaje itihas kasa vachava & aani kas lihava hey kalel…..thanks.

Leave a Reply