विदेशी पुस्तक, देशी मस्तक – भाग १

छत्रपती शिवरायांचे जीवनकार्य काळाला पुरून उरणारं आहे. आपल्या जीवन कार्याला ऐतिहासिक करण्यासाठी शिवरायांनी आदिलशाही, मोगलशाही, पोर्तुगीजांशी आणि स्वजनांशी केलेल्या लढाया केवळ स्वराज्यासाठीच नव्हत्या. त्या सामान्य ठरवल्या गेलेल्या माणसात स्वाभिमान निर्माण करण्यासाठीही होत्या. त्यामुळेच शिवरायांच्या रणांगणावरील लढायांपेक्षा त्यांच्या समताधिष्ठीत सामाजिक प्रस्थापनेला अधिक महत्व आहे. शिवरायांनी आपल्या ३० वर्षाच्या जाणत्या आयुष्यातील फार तर दहा वर्ष शत्रूंशी लढण्यात खर्च केली असतील. उर्वरित काळ त्यांनी चातुर्वर्ण्याच्या बढेजावाने हिंदू समाजात भिनलेली विषमता नष्ट करण्यासाठीच खर्च केली आहे. या प्रयत्नातच वाईच्या नागेवाडीचा नागनाथ महार गावचा पाटील झाला. स्वराज्य स्थापन करतानाच शिवरायांनी वर्णवर्चस्वाचाही अहंकार ठेचला आहे. त्याआधी त्यांनी शेतकर्‍यांना, कष्टकर्‍यांना जीणं नकोसं करणारा सावकारी पाश तोडला. वतनदारी मोडली. श्रमांना-गुणांना प्रतिष्ठा दिली. न्याय अन्यायाची सीमा स्पष्ट केली. गोचीड वृत्तीच्या भटशाहीला नंगं केलं. त्याचा बदला भटशाहीने शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करून घेतला. या बदलामुळेच शिवराय “रयतेचा राजा” झाले. शिवरायांनी धर्मजागृती केली. पण ती मानवतेचा मर्म अबाधित ठेवून केली. यासंदर्भात इतिहासकार त्रि.शं.शेजवलकर लिहितात, ‘शिवाजीराजांचे कोणतेही युद्ध ‘धर्मयुद्ध’ असे म्हणता येणार नाही. त्याकाळी युरोपात सुद्धा धर्मयुद्धे सुरु होती. पण मागासलेल्या आशियात व विशेषतः हिंदुस्थानात  शिवाजीने हि गोष्ट तर्कास न पटणारी, कोणाच्याही हिताची न ठरणारी असून कालानुरूप नाही, हे स्वतःच्या ज्ञानाने एकट्यानेच ठरवले त्याप्रमाणे आजच्या लोकशाही मनुस शोभण्यासारखे वर्तन धर्माच्या बाबतीत ठेवले.’ धर्मभेद न करता साधू संताचा आशीर्वाद घेत. त्यांनी जसा संत रामदासांना परळीचा सज्जनगड मोकळा करून दिला; तसंच कोकणातील केळशीच्या संत हजरत पीर सय्यद याकुब बाबाला दर्ग्यासाठी ६५३ एकर जमीनही आज्ञापत्राने इनाम म्हणून दिली.

शिवरायांच्या धर्मभेद, जातीभेद, स्त्री-पुरुष भेद गाडणार्‍या राज्य व्यवहारात आजच्या भारतीय लोकशाहीची बीजं आहेत. त्यातून निर्माण झालेल्या समतावादी विचाराच्या फांद्या ज्यांना भाल्यासारख्या टोचतात; अशा भटशाहीच्या पिलावळीने शिवरायांची “समतावादी स्वराज्याची थोरवी” झाकली राहावी म्हणून, यासाठी शिवरायांच्या जीवनकार्यालाच बदनामीच्या भोवर्‍यात फिरत ठेवलंय.त्यासाठी शिवरायांच्या जन्मतिथी-तारीखवादाचा घोळ शंभर वर्ष घातला गेला. माणसातून उठवण्यासाठी शिवरायांवर देवत्व थापण्याचा प्रयत्न अधूनमधून होत असतो. त्यांच्या पुतळा-प्रतिमांच्या विदृपिकरणाचा वापर दलित-मुस्लीमविरोधातील तानावासाठी केला जातो. जाती वर्चस्वाचं असत्य थापण्यासाठी रामदासांना शिवरायांचे ‘गुरु’ बनवलं जातं. हा खोडसाळपणा शिवरायांच्या हयातीपासून सुरु आहे. ते करणारे, भटशाहीची आणि शिवरायांच्या स्वराज्याच्या मुळावर घाव घालणार्‍या पेशवाईची लालेलाल करणारे निपजावे, हा योगायोग नाही. या रोगात विचारांचा संसर्ग आता विदेशी लेखनकामाठयांनाही झाला आहे. जून २००३ मध्ये ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस’ ने ‘शिवाजी- हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ हे जेम्स डब्ल्यू. लेन याने लिहिलेलं पुस्तक प्रसिद्ध केलं. जेम्स लेन हा अमेरिकेच्या मिनेसोटा विभागातील मेकॅलेस्टर कॉलेजच्या ‘धर्म आणि भारतीय संस्कृती’ विभागाचा प्रमुख आहे. या कामासाठी तो १९८६ पासून नियमितपणे भारतात येतो. १२७ पृष्ठांच हे पुस्तक लिहिण्यासाठी त्याने बरीच मेहनत घेतलेली दिसते. संदर्भासाठी अनेक पुस्तकं वाचलीत. परंतु या मंथनातून नवनीत निघण्याऐवजी शिवरायांना बदनाम करणारी गटारघाण निघालीय.

या पुस्तकाच्या निवेदनात जेम्सने पुण्याच्या भांडारकर इतिहास संशोधन संस्थेचे आणि तेथील सिनियर लायब्रेरियन वा.ल.मंजुळ यांचे आभार मानलेत. तसेच मराठी भाषा-साहित्य आणि महाराष्ट्राची संस्कृती समजून घेण्यासाठी मदत करणार्‍या श्रीकांत बहुलकर, सुचेता परांजपे, वाय.बी.दामले, रेखा दामले, भास्कर व मीना चंदावरकर, दिलीप चित्रे, यांचेही आभार मानलेत. या आभार प्रदर्शनात ‘अमेरिकन इन्स्टिटयूट ऑफ इंडियन स्टडीज’ च्या माधव भांडारेंचा आणि मुस्लीम समाजसुधारक असगरअली इंजिनीयर यांचाही समावेश आहे. यातील असगरअली इंजिनीयर यांचा समावेश हि पुस्तकावर ‘हिंदू-मुस्लीम तेढीचा पीळ घट्ट करण्यासाठी केलेला खटाटोप’ असा शिक्का बसू नये, याची घेतलेली खबरदारी असावी.

तरीही बामणी पिसाच्या मंडळींचं बदकर्म छपून राहत नाही. ते पुस्तकात पानोपानी पेशवाई किडा बनून वळवळताना दिसतं. या सनातनी वळवळीमुळेच पृष्ठ ९३ वर शिवरायांच्या जन्मदात्याबद्दल संशय घेण्यापर्यंत मजल मारली आहे. बामणी विकृतीने भरलेला जेम्स लेन लिहितो- The repressed awareness that Shivaji had a absentee father is also revealed by the fact that Maharashtrians tell jokes naughtily suggesting that his guardian Dadaji Konddev was his biological father. In a sense, Shivaji’s father had little influence on his son, for many narrators it was important to supply him with father replacements, Dadaji and later Ramdas.

शिवरायांप्रमाणेच जिजाबाईंनाही दैवत मानणार्‍यांच्या काळजाला अट्टल कोब्रा नाग डसावा; अशी हि पिचकारी आहे. ती मराठीजनांना नालायक ठरविणारी आहे. आपल्या विषारी फुत्कारात जेम्स लेन म्हणतो, ‘महाराष्ट्रीयन खोडसाळ विनोदाने (एकूण अर्थ कुचेष्टेने) सुचवतात कि, शिवाजीचे पालक दादोजी कोंडदेव हे त्याचे खरे वडील (biological father) आहेत. बर्‍याचशा चरित्रकारांनी शिवाजीवर वडिलांचा (शहाजींचा) फारसा प्रभाव नव्हता, असं म्हटलं आहे. हि उणीव भरून काढण्यासाठी त्यांनी शिवाजीच्या वडिलांची जागा प्रथम दादोजीला आणि नंतर रामदासाला दिली आहे,’

जेम्सचं हे म्हणणं पूर्णपणे असत्यावर आधारलेलं आहे. ते तर्कावरही टिकणारं नाही. शिवराय हे जन्मजात आदर्श माणूस होते; म्हणूनच शिवरायांच्या मृत्युनंतरही २६ वर्षं मावळे स्वराज्यासाठी आणि स्वाभिमानाच्या जरीपटक्यासाठी प्राणपणाने लढले. मावळ्यांनी औरंगजेबाला मरेस्तोवर दख्खन राज्य ताब्यात घेऊ दिलं नाही.याउलट पेशवाईत पेशवा म्हणजे राजा हयात असताना १८१८ मध्ये पुण्याच्या शनिवारवाड्यावरून दगाबाज बाळाजी-नातू पटवर्धन याने जरीपटका खाली खेचला आणि तिथे इंग्रजांचा युनियन जॅक फडकवला. पण पेशवाईचा जीव वाचवण्यासाठी कुणी लढलं नाही कि, कुणी रडलंही नाही. कारण बाजीराव आणि माधवराव पेशव्यांचा सत्ताकाळ वगळता जनतेला ते कधी आपलं राज्य वाटलं नाही. उर्वरित कालखंडात रावबाजीच्या आणि रंगेलबाजीच्या अतिरेकामुळे पेशव्यांचं सत्ताकेंद्र असणारा शनिवारवाडा छिनालवाडा झाला होता. या इतिहासाचं पाप आपल्यावर उलटेल या भयानं बिथरलेले आजही शिवरायांच्या चारित्र्यकथन-लेखनाचा आव आणून त्यांचं चारित्र्य वादग्रस्त करण्याचा डाव खेळत असतात. त्यात पेशवाईपेक्षा शिवशाही वेगळी नव्हती, हे सांगण्याचा हलकटपणा असतो.

अशा डावात फसलेला जेम्स लेन पुढे लिहितो, ‘एकप्रकारे नवर्‍याने टाकलेल्या त्याच्या (शिवरायांच्या) आईने आपल्या अंतर्मनात खोलवर रुजलेल्या प्रेरणा शिवाजीच्या आदर्श पुरुष होण्याच्या कृतीला नियंत्रित करीत होत्या. खरं तर, शिवाजीचं शौर्य आपल्या आईला खुश ठेवण्याचाच प्रयत्न होता. कारण शिवाजीच्या आईला आपल्या यादव घराण्याच्या थोरवीची जाणीव होती. आपला नवरा (शहाजी) आपल्या घराण्यापेक्षा हलक्या कुळातला आहे, याचीही तिला जाणीव होती. म्हणूनच हिंदुराज्याचे पुनर्निर्मिती करण्याचे स्वप्न तिने आपल्या मुलावर बिंबवले.’ हे विश्लेषण शहाजी-जिजाबाई-शिवराय यांनाच नव्हे; तर जे स्वराज्यासाठी लढले, मेले त्यांच्याही समर्पणाला कलंकित करणारे आहे.

क्रमशः

44 comments

 1. majhya alpshya buddhimattela na samjalelei vaakya udhrut karat aahe..clarifcations dilit tar upkaar hotil

  स्वराज्य स्थापन करतानाच शिवरायांनी वर्णवर्चस्वाचाही अहंकार ठेचला आहे.
  nakki kaay kela…dakhle dyaal ka

  त्याआधी त्यांनी शेतकर्‍यांना, कष्टकर्‍यांना जीणं नकोसं करणारा सावकारी पाश तोडला.
  he bhatach hote ka

  गोचीड वृत्तीच्या भटशाहीला नंगं केलं.
  mhjne naaki kaay kela…karan maharajachya raajyat brahman chi ghara jalyache prakaar me tari nahi aaiklet…

  अशा भटशाहीच्या पिलावळीने शिवरायांची “समतावादी स्वराज्याची थोरवी” झाकली राहावी म्हणून, यासाठी शिवरायांच्या जीवनकार्यालाच बदनामीच्या भोवर्‍यात फिरत ठेवलंय.
  vistrut sangaal ka..naaki kaay kela te..

  त्यासाठी शिवरायांच्या जन्मतिथी-तारीखवादाचा घोळ शंभर वर्ष घातला गेला.
  to vaad vividha historiancs chya madhe mataaikya naslyamule ahe..tyane maharajanche kaarya kuthe kaami jhaala..

  जाती वर्चस्वाचं असत्य थापण्यासाठी रामदासांना शिवरायांचे ‘गुरु’ बनवलं जातं.
  sadhu santancha maan thevne hi maharajanchi olakh hoti..tyamule samarth ramdasch kaay anek sadhu santana maharaj naman karit asat.
  afzal khan maharajvar chal karun yet aslychi batmi ramdas swamini maharajna patra dware kalavili hoti.
  yavarun tya doghatil natyache spashtikaran hote..ek guruch aplyala shishayas savadh karel..
  n gurucha artha asa navhe ki maharajana ghodi var basane ramdas swamini shikawli
  adhyatmik bal he sharirik kshamatechya kaaik pat mahantvhche aste..n swami maharajana tech bal dile..

  हा खोडसाळपणा शिवरायांच्या हयातीपासून सुरु आहे. ते करणारे, भटशाहीची आणि शिवरायांच्या स्वराज्याच्या मुळावर घाव घालणार्‍या पेशवाईची.
  swarajyachya mulvar ghav ghalne mhjne nakki kaay…tarabai chya fauza jevah shahu maharajavar chalu gelya tevha tyanich balaji vishwanathas peshwa nemle n tyne aplay malakache
  pran vachavle…marathe…marathi bolnaare..yaat kadhich ekvaakyata navhti..javali che more kon hote te tumhas thaauka ahech..
  ashyaveli eka brahamanaech khalya mithala jagun apala kartavya paar padla..

  n tumhich kaal kon te lad saheb aahet tyancha daakhal dilat..paaypos peshwe ityadi..mag ata peshwe mothe kase jhale…

  या पुस्तकाच्या निवेदनात जेम्सने पुण्याच्या भांडारकर इतिहास संशोधन संस्थेचे आणि तेथील सिनियर लायब्रेरियन वा.ल.मंजुळ यांचे आभार मानलेत. तसेच मराठी भाषा-साहित्य आणि महाराष्ट्राची संस्कृती समजून घेण्यासाठी मदत करणार्‍या श्रीकांत बहुलकर, सुचेता परांजपे, वाय.बी.दामले, रेखा दामले, भास्कर व मीना चंदावरकर, दिलीप चित्रे, यांचेही आभार मानलेत. या आभार प्रदर्शनात ‘अमेरिकन इन्स्टिटयूट ऑफ इंडियन स्टडीज’ च्या माधव भांडारेंचा आणि मुस्लीम समाजसुधारक असगरअली इंजिनीयर यांचाही समावेश आहे.
  abhar manle..aho gore jayat tyaat saglay sathi thank you mhntaat..ya sansthene tyana madat keli..tyani thnx mahtnla..kaay bighadla..
  to ghanerda vinod hech satya ahae asa kuni bhandakar inst madhun lihun dila tya laine la..hayacha purava daakhava..
  kahi patra likhit purva aahe ka asa tumchya kade..tyani dusri kaahi mahiti dili aasel..ya prakaranashi kuna brahmanacha sambandha kadapi nahi..

  यातील असगरअली इंजिनीयर यांचा समावेश हि पुस्तकावर ‘हिंदू-मुस्लीम तेढीचा पीळ घट्ट करण्यासाठी केलेला खटाटोप’ असा शिक्का बसू नये, याची घेतलेली खबरदारी असावी.
  wah rao..tumhi zakir naikchi gani gata te chalta ka ho..

  बामणी विकृतीने भरलेला जेम्स लेन लिहितो- The repressed awareness that Shivaji had a absentee father is also revealed by the fact that Maharashtrians tell jokes naughtily suggesting that his guardian Dadaji Konddev was his biological father. In a sense, Shivaji’s father had little influence on his son, for many narrators it was important to supply him with father replacements, Dadaji and later Ramdas.
  he tya lekahakache vichar aahet..satya kaay aahe he te apan sarech janto…

  याउलट पेशवाईत पेशवा म्हणजे राजा हयात असताना १८१८ मध्ये पुण्याच्या शनिवारवाड्यावरून दगाबाज बाळाजी-नातू पटवर्धन याने जरीपटका खाली खेचला आणि तिथे इंग्रजांचा युनियन जॅक फडकवला. पण पेशवाईचा जीव वाचवण्यासाठी कुणी लढलं नाही कि, कुणी रडलंही नाही. कारण बाजीराव आणि माधवराव पेशव्यांचा सत्ताकाळ वगळता जनतेला ते कधी आपलं राज्य वाटलं नाही. उर्वरित कालखंडात रावबाजीच्या आणि रंगेलबाजीच्या अतिरेकामुळे पेशव्यांचं सत्ताकेंद्र असणारा शनिवारवाडा छिनालवाडा झाला होता.
  suryaji pisalane gadache darwaje ughadun dile hote..tyala maharajani deh dand kela hota…sambahji maharaj khan chya sainyabarobar gadavar chal karun gele..
  atil namakhalal sardarani gad kahli kela..sarvanche haat kalam jhale…
  1818 chi goshtach nirali hoti…so eka gaddaramule saglech gaddar hot nastaat..

  jiva mahala n baji prabhu yana tumhi kaay mhnaal mag…

  अशा डावात फसलेला जेम्स लेन पुढे लिहितो, ‘एकप्रकारे नवर्‍याने टाकलेल्या त्याच्या (शिवरायांच्या) आईने आपल्या अंतर्मनात खोलवर रुजलेल्या प्रेरणा शिवाजीच्या आदर्श पुरुष होण्याच्या कृतीला नियंत्रित करीत होत्या. खरं तर, शिवाजीचं शौर्य आपल्या आईला खुश ठेवण्याचाच प्रयत्न होता. कारण शिवाजीच्या आईला आपल्या यादव घराण्याच्या थोरवीची जाणीव होती. आपला नवरा (शहाजी) आपल्या घराण्यापेक्षा हलक्या कुळातला आहे, याचीही तिला जाणीव होती. म्हणूनच हिंदुराज्याचे पुनर्निर्मिती करण्याचे स्वप्न तिने आपल्या मुलावर बिंबवले.’ हे विश्लेषण शहाजी-जिजाबाई-शिवराय यांनाच नव्हे; तर जे स्वराज्यासाठी लढले, मेले त्यांच्याही समर्पणाला कलंकित करणारे आहे.

  laine je vaatla te tyane lihila..tumhala patat nahina mag tyacha virodh kara..pan tychya kanfataat tumhi maru shakat nahi mhnun nihattya brahamanvar bhekad halla kelat..tohi cheap publicity karta..ya ulat babasaheb purandareni patra dwari apla rosh oxford univ press la kalvaun yavar bandi anaavi ashi maagani keli

  ekandar kaay tar brahaman te sagle chor haraamkhor n darodekhor..hech tumcha breed vaakya ahe..tevha tumchya kadun satya n tarksangat uttarachi asaha dhusarach aahe…

  jai jai raghuveer samartha…

  1. अध्यात्म वगैरे गोष्टी भटांचे पोट भरण्यासाठी निर्माण केलेली थोतांड आहेत, रामदासाने लिहिलेले पत्र उपलब्ध करून देऊ शकता का?

   शिवजयंतीचा वाद फक्त आणि फक्त बाबा पुरंदरे आणि जयंत साळगावकर यांच्यामुळे आहे.

   पेशवे मोठे आहेत असं ह्या लेखात तरी कुठेच उल्लेख नाही. आणि गोरे ज्यांनी मदत केली त्यांचेच आभार मानतात.

   जेम्स लेनने संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षांसोबत ई-मेल द्वारे झालेल्या पत्रव्यवहारात मान्य केले आहे कि भांडारकर मधील लोकांनीच त्याला हि माहिती पुरविली.

   झाकीर हुसेन हा कोण मला माहित नाही, मी त्याला ओळखत नाही.

   लेखकाने म्हटले आहे कि हा जोक त्याला महाराष्ट्रीयन्सनी सांगितला, त्याच्या संपर्कातले महाराष्ट्रीयन्स कोण हे जगजाहीर आहे.

   जीवा महाले आणि बाजीप्रभू स्वामिनिष्ठ होते. सूर्याजी पिसाळ असो नाहीतर जावळीचा मोरे गद्दार सगळीकडे होते. संभाजी महाराज शत्रूला जाऊन मिळाले होते ते कूटनीतीचा भाग म्हणून.
   कादंबर्‍या वाचून statements करत जाऊ नका. इतिहास वाचत चला.

   ब्राम्हणांवर आम्ही हल्ले केलेले नाहीत. भांडारकरवर कारवाई केली तेंव्हा एकाही माणसाला इजा केली नाही.

   तर्कसंगत उत्तरांची जर अपेक्षा नाही तर comments लिहीताच कशाला?

   जय जिजाऊ!

   1. ahdhyatma he jar thothaand ahae tar mag Gautam Buddha kaay gammat mhnun 12 varsha tapasya karat hote ka..

    me vicharlelaya bhatbandi mhnje kaay yache uttar ajun mala milala nahiye..

    1. गौतम बुद्ध सत्याच्या शोधात होते, मोक्षाच्या नाही!
     भटबंदी म्हणजे भटबंदी… It is a self explanatory word .

   2. te email prasiddha tari kara mag..mhjne saglyanach kalel kkhara kaay te..
    ingraz nehmich aplaya jhunjvat thevun swatacha rajya karat aalet…
    haa tyaatlach baahg nahi he tumahal samjat nahi ka

    1. नक्कीच करू, जेम्स लेन हा अमेरिकन आहे, इंग्रज नाही. त्या पुस्तकात त्याने भांडारकरी भटांचे 'घरोब्याचे' संबंध असल्याचं लिहिलंय.

 2. brahman gochid hote na..gagabhatt kona hota mag…
  n jar asach hota tar havach kashala baaman mag rajyabhishek karaayla
  asach kaaraycha na mag..

  1. त्या काळात भटांनी मान्यता दिल्याशिवाय राज्याभिषेक होणे शक्य नव्हते…
   कारण तो वैदिक पद्धतीने केला होता, जी कि फक्त भटांनाच माहित होती…

   त्यानंतर छ.संभाजी महाराजांनी आणि निश्चलपुरी गोसावी यांनी महाराजांचा शाक्त (तांत्रिक) पद्धतीने राज्याभिषेक केला होता…

 3. mala ek sanga tumhi dev hi sankalpana nakru ichhita ka..
  karan tumchya brigade madhe samil honarya lokana hi mahiti pharach mahatvachi aahe..tyamule te clear karal ka..

  1. आम्ही देव ही संकल्पना नाकारत नाही, पण आमचे स्पष्ट मत आहे…
   'सर्वसाक्षी जगत्पती, त्याला नकोच मध्यस्ती…'

 4. bandi yahce anek artha ahet tyat nakki kaay

  ekikade sanagaycha ki amhi kuna brahmanavar halla kela nahi..upkaarach jhale mhanaayche..
  pudhe mhnaaycha ki sanvidhaanala amhi modnaar nahi..

  mag brahaman je ya deshache naagrika ahet tyavar bandi annaar mhjne nakki kaay

  aho tumhi raje na bindaas bola sankhoch nako..tumhi tar satyashodhak na

  mag dyaki khara uttar..

  1. बंदी आणि हल्ला यात फरक आहे…
   बंदी म्हणजे बंदी… हल्ला (सुज्ञास न सांगणे लगे)…

 5. me tuhmala sangto thothand kaay ahe te..
  he mulniwasi ityadi ahe he thothaand ahae..tumhi kon tharavnaar mul kon n upare kon te..
  n mul aso kaay upare aso kaay aajchi kaay garaj aahe te paaha ugaach 1000 varash purviche gane gaat basu naka
  france germany england italy hya madhe anek bhayankar yuddha jahli
  pan aaj te eu madhe ektra rahat aahet pragati karat aahet
  samajatil ekhadhya gatachi naahak badnaami karun apan mothe hou pahat ahat

  1. प्रगती इतिहासाला साक्षी ठेऊन केली जाते आणि प्रगती करणेसाठी मन शांत चित्तावर राहावे लागते. ते मात्र जाणूनबुजून कोणीतरी नेहमीच हटवायचा प्रयत्न करतेय निदान बहुजन समाजाचा तरी. कशाला आणि कोणी जन्मावरून वाद निर्माण केला, कोणी आणि कशाला लज्जास्पद खोटी माहिती उपरयावणी दुसरयाला दिली, का आणि कोणी बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवलं जरा बघा कोण आणि का वाद निर्माण करताय आणि वर तोंड करून परत म्हणायचं प्रगती करा तुम्ही करताय ती पुष्कळ आहे. for you anon read it

   1. me kaay lihila n tyavar tumhi kaay uttar deta ahat..
    ha pattern junaach aahe..kahitari bhavanik..vidhane karaaychi n mul mudda mage saaraycha

    tumhi jewna jaalaalet asa mhnla ki german la sharmene maan khali ghalavich lagte..jhal prakar ha manuskila kalima fasnara hota..pan aaj te don desh te don samaj magche sagla visaraun..atahka prayatnatun ..ekamekana madat karat aahet..

    atyachar jhale nukssan jhala vaadach nahina..

    pan jya goshti 100 varsha adhi houn gleya..chala 60 varsha adhi houn gelya mhana havatar tya karta ajchya brahman pidhi la jawaabddar dharun n tyana target karun kaahi upyog nahi… te chuakach ahe..

    ha swatachay political gain sathi anek lok te kartaa ahet..ek barhamane gandhi vadh kela mhnun 1000 brahaman ghara jalali gelie..tya itaranche tyaat kaay dosh hota

    ithun pudhe ya goshtichi punaravrutti hou naye..n saglyanchi pragati kashi hoil yacha vichaar kaarava hich majhi bhumika aahe

    pan punha punha hech disat rahte ki kahi dhurta mandali aplaya faydya karta itihaas..(kadhi swataha lihun suddha) dweshache raajkaran karat aahet..

    brahman kaay kshatriya kaay.. sgle kaaydya pudhe smaan ahet he apla sanvidhaan sangta..

    swatantray milun itke varsha jhali pan ya parasapar dweshachya pashatun kahi tumhi mukta hou ichhit nahi..yacha mala khed aahe

    shevti nuksaan majhay janmabhumicha hote aahe….

  2. कुणाची बदनामी करून कुणीच मोठे होत नसते,
   मूळ कोण उपरे कोण हे टिळकांनी त्यांच्या आर्क्टिक होम ऑफ वेदाज, आणि नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिले आहे, वाचा कधीतरी…

   1. me ya maatit janmalo aahe..mala upara mhnayacha kunalach adhikaar nahiye

    daruchya dighavar basun agishi khelo naka ashya jagi aag laagel ki basta hi yenaar nahi aani sangta hi yenaar

    purogami whaa saglayana barobar ghya..ugaach bhat bhat karun samjatil eka gatala badnaam karun swatache raajkaran karu naka..samjaakaran kara..tyachich aaj garaj aahe..

 6. jasa tumchya sathi janva ghalnare sagle chor ahaet tasech..majhya sathi ingrazi bolnaare saglech ingraz aahet..americacha itihaas vacha jara..mag british te american ha pravas tumhala samjel..

  n ho Buddha n tyanche sagle anuyayi (kharewale ha…nonveg khanare n daru pinare khote baoudha barech ahaet kaaaran) Nirvaan mhjne janma mrutyu chya pasahtun mukta hone yach sathi prayatnshil astat..

  jar aplayala mahit nasel tar mahiti karun ghya..paha tumchya "chalvalila" faydach hoil…
  kaaran saglyach goshti nihatyaavar bhyaad halle karun sadhya hot nastaat

  1. फक्त जैन नाही तर मला वाटत ब्राह्मण लोकदेखील शाकाहारी असतात आणि मी आजपर्यंत पाहिलेले बहुंताशी ब्राह्मण हेय दोन्ही दारू आणि मांसाहार करतात तेंव्हा बोलताना स्वतःकडे पाहत चला

   1. mulat jain nahi me boudha mhntla pan aso..
    me kuthe mhntle ki brahman maas kahat nahit…daru pit nahit..

    tech tar me sangto aahe..aj shendya gelyat karmakanda atikrek jaatoach ahae.khandyala khanda bhidwun sagle ekatra yeun kaam karat aahet..jithe he chitra disat nahiye tuthe lokana jagruk karnyachi garaj aahe..

    tya saglyat modta ghalun jaat dharma pantha varna n anek itar marge dweshache raajkaran kela jaat aahe

    swatahachya faydyakarta samajat dufali majavnarya lokana adawane tyana expose karne he aplay saglaynche kartyava ahe..n me te karatach raahnaar..

    jai hind…

  2. बुद्ध अंतिम सत्य म्हणजेच निर्वाण हे सांगण्यासाठी प्रयत्नशील होते,

   आणि मी तुम्हाला किती वेळेस सांगू आम्ही कुणावर हल्ले करत नाही, करत नाही.
   तरी तुम्ही एकच टेप लावून बसला आहात…

   1. halle karat nahi… mag…bhatbandi mhjne kaay tumhi paadya puja karnaar ahat..

    bahujanacha dwesh n tyana mgas thevne ha tat kalin savarniyancha dosh hota..1000 varsh purvichya junaat samjutichya adhare hya goshti hot hotya

    pan tumchi mahan brigade tar halichya kalatil..mhjne 1000 samor 30-40 varsha halli mhanolo tar chalele na..aahe..mag tumhi kaa pudhil 1000 varshchya dwesh n suppression chi beeja perta ahet..

    nahitar mag tevha ajun ekhadhya vinit la shivdharma sthapan karva lagel…

    bhatbandi ityadi majkur tumchya policy doc madhun kaadlaach pahije..

    devavar nahi karma kandavar halla kara

    brahmanana nahi varchaswawadi vichar sarani la modun kadha..kaaran varachaswad kaahi brahmanan purta maryaadit nahiye..

    kahirlanjit te agdi spashtapane disun alaay…

    (me swatahala kadhi ugach dusryahun shreshtha ajibaat samjala nahi n samjanar hi nahi..)

    1. भटबंदी झाली म्हणजे कर्मकांड आपोआपच बंद होतात… १००० वर्षाआधी ज्या जातीद्वेषाची बीजे पेरलीत, खैरलांजी हे त्याचेच फळ आहे…

     ह्या प्रवृत्तींचे मूळच भटांच्या ग्रंथांमध्ये आहे…
     उच्च-नीचतेची भावना कुणी निर्माण केली?

 7. "उर्वरित काळ त्यांनी चातुर्वर्ण्याच्या बढेजावाने हिंदू समाजात भिनलेली विषमता नष्ट करण्यासाठीच खर्च केली आहे"
  -याद्वारे आपणास काय म्हणावयाचे आहे? या दृष्टीने काही पुरावा आहे का ? पुरावा महणून एक उदाहरणाने काही सिद्ध होत नाही,,आपल्या म्हणन्यानुसार शिवाजी राजांनी सुमारे २० वर्षे समाजसुधारणा करण्यात घालवली.म्हंजे कारकीर्दीचा २/३ भाग.त्यांनी घडवून आणलेले काही बदल सांगावेत.शिवरायांनी कुठल्या गावाच्या जोशींना ब्राह्मणाचा विरोध करून त्यांची खोड मोडावी महणून बेदखल केल्याचे ऐकिवात नाही( त्यांनी काही गुन्हा केला असेल तर गोष्ट वेगळी).
  कर्मकांडाला माझा विरोध आहे आणि त्या काळातली परिस्थिती वाईट होती याबद्दल दुमत नाही.पण शिवाजी महाराजांनी ब्राह्मण समाजाला लक्ष्य केलेला मला ऐकिवात नाही.
  (स्वतः ज्ञानेश्वरांना त्या काळातील ब्राह्मणांनी त्रास दिला. आणि त्याबद्दल दांडेकरांनी सर्वांग सुंदर 'मोगरा फुलला' लिहिली.आता ब्राह्मण म्हणून ज्ञानेश्वरांना आपला विरोध असेल तर मी यापुढे काही बोलू शकत नाही. दांडेकरांनी स्वतः ब्राह्मण वृत्तीवर ताशेरे ओढले आहेत.जर त्यांना ब्राह्मणांचे वर्चस्वच दाखवायचे असते तर हा सगळा खटाटोप कशासाठी.)

  आपण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेनविषयी भरपूर विखारी लेखन केलं आहे.त्यांचे काही संधर्भ चुकले असतील.ऐतिहासिक दृष्ट्या अपूर्ण असतील.परंतु महाराष्ट्रात शिवप्रेम आणि शिवरायांविषयी अभिमान जागृत करण्याचे त्यांच्या एवेढे काम कुणी केले हे दाखवून द्यावे.आपण म्हणता कि शिवरायांना बदनाम करण्याचे काम त्यांनी केले.माझ्या पाहणीत अजून एकही असा व्यक्ती आला नाही कि 'राजा शिवछत्रपती' वाचून जायचे उर अभिमानाने भरून आले नाही.त्यांनी जसे मराठ्यांना शिव्या घातल्या आहेत तश्या वेळप्रसंगी ब्राह्मणांना सुद्धा घातल्या आहेत.

  समर्थ रामदास शिवरायाचे गुरु आहे असे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत.परंतु त्यामुळे समर्थ रामदास कुठेही कमी होत नाहीत.लोकांनी कदचीत तसे संदर्भ घुसवले असतील तर त्याची सत्यता तपासणे योग्य आहे. आपण रामदासांचा समावेश शिवचरित्रात व्हावा कि नको यावर नक्कीच वाद घालू शकतात.पण महणून संत व्यक्तींचा उपमर्द करणे चुकीचा आहे.रामदास हे महाराष्ट्रातील संत परंपरेतले एक अत्यंत महान संत आहेत आणि हे शिवचरित्रातील त्यांचा संदर्भ टाळला तरी सत्यच राहणार आहे.

  लेनचे पुस्तक गलिच्छ आणि टुकार आहे.याबद्दल दुमत नाही. परंतु त्याच्या पुस्तकात फक्त क्रेडिट्स मध्ये नाव आहे महणून आपण सगळा दोष ब्राह्मणांवर टाकून मोकळे झाले.आणि आता तर मुद्दामून ब्राह्मणांनीच हे लिहून घेतले असे सांगता आहात. याच लोकांनी oxford प्रेसला लिहिलेलं पुस्तकाचा निषेध करणारे पत्र मी स्वतः पहिला आहे. आणि हे पत्र लेन कांड होण्याच्या पुष्कळ पहिलेच आहे.मग तरी आपण त्याच्या ह्या पुस्तकाच्या समर्थांचे आरोप कसे करू शकतात.लेन हा भांडारकर मध्ये गेला.परंतु जर आपणास थोडी माहिती असेल तर भांडारकर मध्ये शिवाजी या विषयावर काही संशोधन चालत नाही. ते भारत इतिहास संशोधन मंडळात चालते. मग लेन तिथे का गेला नाही.माझ्या मते याचा उत्तर आपणच दिला आहे तो मिनेसोटा विभागातील मेकॅलेस्टर कॉलेजच्या ‘धर्म आणि भारतीय संस्कृती’ विभागाचा प्रमुख आहे. त्यामुळे तो भांडारकरमध्ये गेला.
  आपणास श्री.मेहंदळे याच्या पुस्तकापेक्षा शिवचरित्रावर विश्वसनीय पुस्तक माहित आहे का?लेन या लोकांना पुण्यात राहून भेटला नाही यावरून त्याच्या तोकडा अभ्यास आपल्या ध्यानी येत नाही का?
  आपल्या मतांवरून आपण उद्देश मनात ठेवून त्याला सह्हायीभूत ठरेल असा इतिहास वाचता असे वाटते. कृपया इतिहासाचा अभ्यास करून मते बनवा आणि समाजात सुरु असलेला विखारी प्रचार थांबवा.

  1. ह्या गोष्टी कळण्यासाठी प्रबोधनकार ठाकरे, वा.सी.बेंद्रे, न.र.फाटक, कृ.अ.केळुस्कर, त्रि.श.शेजवलकर यांची पुस्तक वाचा…

   रामदास गुरु नाहीत एवढेच आमचे म्हणणे आहे, आम्ही त्याचं अस्तित्व नाकारलेलं नाही…

   लेनच्या पुस्तकात त्यांचीच नावं आहेत, ज्यांनी त्याला मदत केली… कुणी कुणाचे फुकट आभार मानत नाही… आणि भांडारकरमध्ये संशोधन होत नाही हा चांगला विनोद आहे…

  2. "लोकांनी कदचीत तसे संदर्भ घुसवले असतील" mhanaje kon lokanni? bhat lekhkanni nave?

 8. माणसाने अपेक्षा ठेवणे सार्थ आहे पण अपेक्षा पुरती करणारा नेहमीच समोरच्या व्यक्तीची चाचपणी करतोच आणि योग्य त्या व्यक्तीची अपेक्षा पूर्ती होते, तेंव्हा तुम्ही अपेक्षा पूर्ती ची वाट पाहणे व्यर्थ

 9. tumhi bhatbandi mhjne agdi nasbandi sarkah vaaprataay ho farach chaan

  ekandar kaay tumchyat ughadpane bolnyche dhaarishtya nahiye..pan ek naaki ki tumchya manaat brahaman..mhnje haadamasachya manasanchya eka varga baddal prachand dwesh aahe he siddha tumhi padopadi karat aahat…

  tumchya bhampak bhelpuricha marketing pan tumhi chan karta tyabaddla tumhala congrats…

  pan tumche "vichaar" kiti pokal n uthal aahet te me jagaala dhakhvun detach rahin…

  n he lihun ghya tumhi lokani kitihi adal apat kelit n samjaat thed nirman karaaycha prayatna kelat..tumhi yashaswi hou shaknaar nahi…

  jai shri ram…

  1. ज्याला खरंच कळत नाही त्याला समजावून सांगता येईल,
   पण कळून न कळल्याचे भासवनार्‍याला काय सांगावे?

   आमचे विचार पोकळ आहेत कि नाहीत हे जग ठरवेलच,
   आणि आम्ही कुणामध्ये तेढ निर्माण करत नाही…

   जय जिजाऊ!

 10. aplaya dusryapeksha shreshtha samjane ha manascha motha doorguna ahe..tyasathi manusmruti vachavi laagat nahi

  tumchya ghari kuni gadi mansaa ahet tyanchyashi tumcha vaagna kay prakarcha aahe te paarkhun ghya..

  musalamaanat shia na sunni kami lekhtaat n amhich khare asa sangtaat.."gore" saglay jagavar rajya karun gele fakta rang gora ahe evdhya eka goshtichya gurmit…

  mhjne asa mhnaayla harkaat nahi ki…sunni.. n british hyani pan manusmruti tondpaath keli aasnaar…

  ahe ka kahi uttar..

  1. हा दुर्गुण मानवी स्वभावाचा नसतो, तो निर्माण ''केलेला'' असतो… त्यासाठीच मनुस्मृतीची रचना करण्यात आली… आमच्या घरी तरी अशी भेदभावाची वागणूक आम्ही कुणाला देत नाही…

   भटशाही जगात सगळ्याच ठिकाणी असते, शिया असोत किंवा ज्यू… दुसर्‍यांना कमी लेखण्याच्या प्रवृत्तीमुळेच तो वाद आहे…

   1. waah he tumhala thaouk aahe tar..
    tumchya bolynaat n vaagnyat ekruptaa nahi..to sajjaancha motha gun aahe….

    jar tumcha virodha vrutti la aahe mag tumchi handbills n bhashana n ekun tumcha sagli brigade "brahman" jati cha dwesh ka karte..karan te easi target aahet mhnun

    jar itkacha ahe tar savistar liha aki mag he vrutti bitti sagla..nahitarmag tumhi brahmana bolva na tumchya sabhela..vyaspithavarun hou det na tyanchihi bhashaana..

    1. आम्ही फक्त सत्य काय ते मांडतो, द्वेष करा असे सांगत नाही. वागण्यात आणि बोलण्यात एकरूपता आहे म्हणून टिकून आहोत. किमान एखादं वाक्य बोलून मी ते बोललोच नाही असं तरी म्हणत नाही.

     आम्ही सगळ्या पुरंदरे, बेडेकर आदि शिवद्रोही भटांना जाहीर आव्हान केले आहे कि आम्ही तुमच्याशी सलग ३६५ दिवस, २४ तास चर्चा करायला तयार आहोत. वाटल्यास विषयही आगावू सांगू नका. जागा आणि वेळ तुम्ही ठरवून द्या. पण एकानेही प्रतिसाद दिला नाही.

 11. thanx vinitraje congratulation.u done very well job. explosing brahmins and brahminism. thanx. and congratulation again .jai jijau jai shivrai jai mulnivasi.

Leave a Reply