गांधींच्या खुन्यांची पिलावळ…

मोहनदास करमचंद गांधी या माणसाला त्याच्या हयातीतच शत्रू होते असे नाही तर त्याने ‘हे राम’ म्हटल्याला आता ६३ वर्षे व्हायला आली तरी त्याला शत्रू आहेतच.

आणि या नि:शस्त्र वृद्धाचे तेव्हा प्राण हिरावूनही या शत्रूंची तहान भागलेली नाही. त्यांना त्याची तत्त्वे, त्याने इतिहासावर उठवलेली मोहोर आणि विश्वव्यापी करुणा पुसून टाकायची आहे. तसे नसते तर १५ नोव्हेंबरला गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे याचे स्मरण जागवताना पुन्हा एकदा गरळ ओकले गेले नसते. ‘नथुरामच्या जाज्वल्य राष्ट्रप्रेमामुळे स्वातंत्र्यानंतर हिंदुस्थानची होणारी संभाव्य हानी टळली’ अशा शब्दांत हिंदू महासभेच्या पदाधिकार्‍यांनी मुंबई तसेच पुण्यातही नथुरामच्या आरत्या ओवाळल्या. असेच विषारी एसएमएसही सध्या फिरत आहेत. नथुरामचे ‘जाज्वल्य राष्ट्रप्रेम’ म्हणजे काय? गांधीजींची हत्याच ना?

बारामतीत जन्मलेल्या आणि पुण्यात वृत्तपत्र चालवणार्‍या नथुरामचा जन्म होऊन यंदा शंभर वर्षे झाली. त्याचे निमित्त करून त्याच्या नावाचा आणि ‘कर्तृत्वाचा’ उदो उदो करण्याचा जो प्रयत्न चालला आहे, त्याचा निषेध करावा तितका थोडाच आहे. ही विषवल्ली अजूनही मुळे धरून का आहे, याचाही गंभीर विचार करायला हवा. कपाळावर राष्ट्रप्रेमाचे शिक्के उठवून फिरणार्‍या या नादानांना अनुल्लेखाने मारावे, असे अनेकांना वाटते. पण कोणीच टोकले नाही तर धादान्त असत्य आणि विषारी द्वेष यांचे थैमान वाढते.

या लबाडीचे एक उदाहरण म्हणजे, गांधीजींनी स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानला ५५ कोटी रुपये दिले, हे असत्य परवा पुन्हा उच्चारले गेले. मुळात फाळणीत मालमत्तेच्या ज्या वाटण्या झाल्या त्यातली ही उरलेली रक्कम होती. तिच्याशी गांधींचा काहीच संबंध नव्हता. माऊंटबॅटनच्या अखत्यारीतला हा निर्णय. झालेला करार पाळा, एवढाच गांधींचा आग्रह होता. तो त्यांच्या ‘नैतिक भूमिके’शी सुसंगतच होता. संपत्तीची वाटणी कशी झाली आणि त्यात कोण गुंतले होते, याचा तपशील ‘ट्रान्सफर ऑफ पॉवर्स’च्या खंडांमध्ये आहे. यात गांधी कुठेही नाहीत.

पॅकेजे देऊन काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे लाड चालल्याचा आरोप हिंदू महासभेने केला. या आरोपाचे बोटही गांधींच्या वारशाकडे आहे. फाळणीला सर्वाधिक जबाबदार असणार्‍या महंमद अली जिना यांच्याकडे डोळे वर करून बघण्याचीही हिंमत नसलेले षंढ मारेकरी गांधींना मारून घरच्या म्हातारीचे काळ झाले. तीच रीत आज चालली आहे. स्वातंत्र्यानंतर काश्मिरात हल्लेखोर घुसले तेव्हा प्रार्थनासभेत गांधींना विचारण्यात आले की, आता काय करायचे? तेव्हा गांधी म्हणाले, भारत हे स्वतंत्र राष्ट्र आहे. सीमांचे संरक्षण करायलाच हवे. या घुसखोरांना भारतीय सैन्याने हुसकावून लावावे. (संदर्भ : दिल्ली डायरी) गांधींची अहिंसा आंधळी नव्हती, याचे हे उदाहरण आहे.

आज आँग सान सू ची पासून बराक ओबामांपर्यंत आणि नेल्सन मंडेलांपासून दलाई लामांपर्यंत सर्वांना सर्वाधिक कालसुसंगत वाटणारा विचार गांधींचा आहे. पण आपल्याकडे कडवे हिंदुत्ववादी, ढोंगी काँग्रेसवाले, कट्टर आंबेडकरवादी आणि ढापणे लावलेले मार्क्सवादी अशा चौफेर शत्रूंनी गांधींना घेरले आहे. तरी उद्या जगाला ‘एम.जी.रोड’वरूनच जायला लागणार आहे. दुसरा रस्ताच नाही. असे असताना ज्यांची हेडली आणि लादेन यांची हिंदू प्रतिबिंबे बनण्याचीच महत्त्वाकांक्षा आहे, त्यांच्या असत्य प्रचाराची विषवल्ली पुराव्यानिशी मुळातच खुडली पाहिजे.

– सारंग दर्शने
महाराष्ट्र टाईम्स २२ नोव्हेंबर २०१०

8 comments

 1. M.K.GANDHI IS MOST CRUCIAL POLITICAL PERSON IN THE WORLD.

  ONLY JEENA IS NOT RESPONSIBLE FOR DIVIDATION OF INDIA,PERHAPS IT HAPPENED BECAUSE OF GANDHI'S WRONG POLITICS.

  INDIA'S CURRENT SITUATION IS BECAUSE OF GANDHI THOUGHTS & ADOPTING HIS PHILOSOPHY.

  THEIR IS THOUSANDS OF PROOF WHICH SHOWS THAT GANDHI IS VARNAVADI PERSON.

 2. नथुराम गोड्सेंनी कहि वाइट केले नाही असेच मला वाट्ते.गांधि कायमच हिंदूच्या विरोधात रहिले आणी मुसलमान समाजाला खुश करत राहिले.मग त्यासथि हिंदूंचि कितिहि हानि का होइना.

  1. गांधी हत्येचे समर्थन किंवा विरोध करणे माझा उद्देश नाही, पण त्या प्रवृत्ती बद्दल आक्षेप आहे…

   1. मुसलमानांनी काहिहि क़ेले तरीही हिंदूंनी अहींसा सोडु नये.असे सल्ले नव्हे आदेश गांधिंनी देण्यामागे मुसल्मानांना खुश कर्ण्याचे धोरण होते,मग अश्या माण्साला मार्णे हे चांगले काम आहे वाइट वृत्ति नाही.

 3. Ghandhiji Took fast unto death for handing over the ballance ammaount of 55Karor to Pakistan and the Nehru cabinate has changed its discision and given money to the Pakistan,who has attacked on Kashmir.So actually wrong was Nehru,who had to be punished,but he got free,and Ghandhiji got punished..

 4. गांधीजींचा खुनी जर मराठा असता तर 'सत्यशोधक' च्या तथाकथित संस्कृतीरक्षकांनी हा लेख लिहिला असता का??

  ब्राह्मण होता म्हणून एवढी बडबड करताय??खुनी कुठला हि जाती धर्माचा असो…तो वाईटच हे साधे सोपे गणित तुम्हाला समजत नाही हे दुर्दैव

  1. गांधींचा खुनी मराठा जरी असता तरी आम्ही त्याला विरोध केला असता. पण तो ब्राम्हण असल्याने आणि ब्राम्हणांचे वर्चस्व कायम राखण्यासाठी त्याने गांधींची हत्या केली होती हे सत्य आहे.

Leave a Reply