Day: December 13, 2010
बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा!
पावन खिंडीत आपल्या अल्प सैन्यांनिशी बाजी प्रभूंनी विजापूरकरांच्या अफाट सैन्याबरोबर घोर संग्राम दिला आणि स्वामिकार्यात आपला देह धारातीर्थी ठेविला. तो प्रसंग ह्या पोवाड्यात वर्णिला आहे. शाहीर- प्रबोधनकार ठाकरे (चाल:– उद्धवा, शांतवन.) शिवजींची घेऊनि आज्ञा । सजला बाजी समराला ! झडकरी वंदुनी नृपती । निज चमूस बाहुनि वदला- “वीर हो! असा…