शोध मराठया – शोध मराठा.. – पुरुषोत्तम खेडेकर

संयुक्त महाराष्ट्राला पन्नास वर्षे पूर्ण झालीत. महाराष्ट्र शासनाने सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केले. त्या निमित्ताने महाराष्ट्र विधानसभेच्या बोडक्या आवारातील बोडक्या वातावरणात मेघडंबरीविरहित छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठित लहानसा पुतळा बसवला. शिवरायांचा हा पुतळा तेथे बसविण्यामागे विधिमंडळाची अधिकृत भूमिका संशयास्पद आहे. मुळातच बोडका पुतळा अयोग्य जागी बसविल्यामुळे शिवरायांची बदनामीच जास्त होते. यातच…