“कळी” चे “राज” कारण…

चारपाच दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील तमाम मिडिया ( विशेषतः इलेक्ट्रॉनिक ) एका कळीने अख्खा दिवस कासावीस झाला होता. एकच क्लिप वारंवार घासून दाखवली जात होती. आणि तीच तीच माहिती वारंवार आळवली जात होती. उद्धव ठाकरे लीलावतीत, राज ठाकरे दौरा सोडून परत फिरले, राज लीलावतीत दाखल, उद्धवची एन्जिओग्राफ़ि, डिस्चार्ज आणि राज उद्धवला घेवून…