Year: 2020
गणपती देवता: उगम व विकास – डॉ.अशोक राणा
मंगलकार्याच्या आरंभी गणपतीला वंदन करण्याची प्रथा आपल्या देशात वर्षानुवर्षे चालू आहे. अगदी ऋग्वेदातील ऋचांपासून तो तमाशातील गण-गौळणींच्या नमनापर्यंतचे सारे संदर्भ गणपतीच्या अग्रस्थानाला मान्यता देणारे आहेत. आजही एखाद्या नव्या कामाची सुरूवात करायची झाल्यास गणेशाचे वंदन पहिल्यांदा केले जाते. त्यामुळेच तर कार्याच्या आरंभाला ‘श्रीगणेशा ‘ असे म्हटले जाते. यावरून अग्रपूजेचा मान मिळालेल्या…
विठोबा कुणाचा? – डॉ.अशोक राणा
महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेला पंढरपूरचा पांडुरंग हा वारकऱ्यांचा प्राण आहे. संत शिरोमणी नामदेवांनी त्याला विठाई म्हणून संबोधून ते आपल्या जीवीचे जीवन आहे, असं म्हटलं आहे. खरं तर त्यांच्यामुळेच तो भारतभर पसरला व शिखांच्या गुरुग्रंथ साहिबचं अविभाज्य अंग झाला. ज्ञानदेवांनी कानडा विठ्ठलु कर्नाटकु म्हणून त्यांच्या मूळ स्थानाची खूण सांगितली. मग तो केवळ…
हेमाडपंती मंदिरे व इतिहासकारांचा सावळागोंधळ
भारतभर नागर, वासर व द्राविड अशा प्राचीन मंदिरांच्या निर्माणशैली प्रचलित आहेत. परंतु हेमाडपंती या शैलीचा कोणत्याही प्राचीन किंवा मध्ययुगीन ग्रंथांमध्ये उल्लेख आढळत नाही. तरीही प्रख्यात पुरातत्त्वशास्त्रज्ञ व संस्कृत भाषा व साहित्याचे संशोधक डॉ.वा.वि.मिराशी यांनी आपल्या’ संशोधन मुक्तावली‘ या शोधनिबंध संग्रहात मात्र तसा उल्लेख केलेला आहे. १९५७मध्ये प्रकाशित प्रस्तुत ग्रंथामध्ये पृ.१३९…
शोध हनुमानाचा – डॉ. अशोक राणा
आमच्या अमरावतीच्या घरासमोर काळ्या मारुतीचे मंदिर आहे. माझ्या पत्त्यामध्ये त्याचा पूर्वी उल्लेख असायचा. त्यामुळे काळा मारुती हा काय प्रकार आहे,असे भेटणारे लोक उत्सुकतेने विचारीत असत. मग मंदिराच्या पुजाऱ्याने दिलेली माहिती उत्तरादाखल आम्ही त्यांना सांगत असू. बहुतेक ठिकाणी शेंदूर माखलेला मारुती असतो. लाल-नारिंगी रंगाचा मारुती सर्व परिचित आहे. त्याच्याविषयी स्पष्टीकरण दिले…