Day: July 31, 2021
भूमातेची आराधना – डॉ.अशोक राणा
आला पह्यला पाऊस | शिपडली भुई सारी धरत्रीचा परमय | माझं मन गेलं भरी ! पहिल्या पावसाने जमिनीचा कणन् कण ओला झाला. त्यामुळे दरवळलेला मृदगंध मनात काठोकाठ भरून गेला. भूमिकन्या बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या खानदेशी बोलीतून व्यक्त केलेल्या या उत्कट भावना साऱ्या भूमिपुत्रांच्या मनातील स्पंदनांना मुखरित करतात. पावसाच्या धारा म्हणजे…