जिजाऊ वंदना

जिजा माउली गे, तुला वंदना ही ।
तुझ्या प्रेरणेने, दिशा मुक्त दाही ॥१॥

भयातून मुक्ती मिळाली जनांना ।
गुलामी कुणाला, कुणाचीच नाही ॥२॥

नसे दुःख कोणा, नसे न्यून कोणा ।
फुलांना मुलांना, नसे दैन्य काही ॥३॥

जिजा माउली गे…

जशी पार्वती ती, प्रिया शंकरास ।
तशी प्रेरिका गे, शहाजींस तूही ॥४॥

जसा संविभागी बळी पूर्वकाळीं ।
शिवाजी जनांच्या, तसे चित्तदेहीं ॥५॥

जिजा माउली गे…

तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने ।
प्रकाशात न्हाती, मने ही प्रवाही ॥६॥

तुला वंदिताना, सुखी अंग अंग ।
खरा धर्म आता शिवाचाच पाही ॥७॥

खरा धर्म आता, शिवाचाच पाही…

जय जय जिजाऊ ऽऽऽ- जय जिजाऊ

1 thought on “जिजाऊ वंदना”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.