माय मराठी

दगडांनाही शेंदूर; फासतात इथे मराठी
त्या दगडांनाच देव; मानतात इथे मराठी

संस्कृतचीच माय; असताना माय मराठी
संस्कृतलाच माय; इथे मानतात मराठी

विसरून आपली जन्मदात्री; माय मराठी
दासीलाच माय मानतो; अडाणी मराठी

मूळचाच झरा वाहे; हर-हर माय मराठी
पाझरालाच झरा; मानतात आज मराठी

सुधारून चुका आता; बोला माय मराठी
जगवा अण्णाभाऊंची; अस्सल माय मराठी

सरस्वतीपुत्रांनो; निरोगीच आहे माय मराठी
निर्ॠतीच्या दुधानेच पोसली; माय मराठी

पाहुणेही जेऊ घालते; सन्मानाने माय मराठी
भगिनींसह सुखात नांदते; जगभर माय मराठी

मराठा तेजावर पोसते; वाढते माय मराठी
शिवधर्म नेईल विश्वात; आमची माय मराठी

सांस्कृतिक स्वातंत्र्याचा; श्वास-ध्यास माय मराठी
हिंदवी शिवराज्य मागणी; मागते माय मराठी

मनी, मने, मते, माणसे; मोट बांधा माय मराठी
मावळे व्हा सारे मराठे; गर्जुनि सांगे माय मराठी

नामा तुका शिव जोती; शाहू भिमाची माय मराठी
शब्दा-मतांचीच करा शस्त्रे; शिवराज्य येईल माय मराठी

-अॅड. पुरुषोत्तम खेडेकर
संस्थापक अध्यक्ष, मराठा सेवा संघ

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.