29-September-2010
पंचांगाचे थोतांड – डॉ. जे.बी. शिंदे
पंचांगाच्या मागे। लागतो अडाणी,
पाहे क्षणोक्षणी। शुभाशुभ ॥१॥
मूर्ख भट म्हणे। त्याज्य दिन आज,
दक्षिणेची लाज। बाळगेना ॥ २॥
कामचुकारांना। धार्जिणे पंचांग,
सडलेले अंग। संस्कृतीचे ॥३॥
मुहूर्ताचे वेड। मूर्खांना शोभते,
आयुष्य नासते। पंचांगाने ॥४॥
चांगल्या कामाला। लागावे कधीही,
गोड फळ येई। कष्ट घेता ॥५॥
दुष्ट कामे केली। शुभ वेळेवरी,
माफी नाही तरी। शिक्षेतुनी ॥६॥
वेळ, हवा पाणी। आकाश बाधेना,
भटांच्या कल्पना। शुभाशुभ ॥७॥
विवेकाने वागा। होऊनी निर्भय,
अशुभाचे भय। निर्बुद्धीना ॥८॥
सत्य सांगा लोका। जरी कडू लागे,
चाला, नाही मागे। आला कोण ॥९॥
–
डॉ. जे.बी. शिंदे
विशेष सूचना: वरील रचना संत तुकारामांची असल्याचा उल्लेख अनवधानाने यापूर्वी झाला होता. सदरील रचना कोल्हापूर येथील प्रसिद्ध विचारवंत व लेखक डॉ.जे.बी. शिंदे यांची आहे. झालेल्या चुकीबद्दल क्षमस्व.
2 Comments
ओळी चांगल्या आहेत पण तुकारामांच्या नावाखाली खपवने चुकीचे आहे,आजदेखील तो मेसेज व्हाट्सअप्प वर फिरतो आहे,,,,,
खरे आहे. अजून आम्हाला बऱ्याच ठिकाणी लोकांना सांगावे लागते की ही रचना संत तुकारामांची नाही.
वाद पण होतात.
संत तुकाराम यांच्या नावावर खपावयाचि काय गरज आहे?
मूळ कवींना याचे श्रेय जावू द्याना.