Category: Truth Seeker

कामगारांचे हितकर्ते राजर्षी शाहू

समाजातील कष्टकरी, कामगार आणि शोषित, पीडित यांच्याविषयी राजर्षी शाहू छत्रपतींना आंतरिक कळकळ होती. या घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी कृतिशील आदर्श घालून दिला. राजर्षी शाहूंच्या जयंतीदिनी त्यांच्या कार्याला दिलेला उजाळा. शाहू छत्रपती स्वतःला अगदी अभिमानाने शेतकरी किंवा मजूर कष्टकरी म्हणवून घेण्यात धन्यता मानताना आढळून येतात. कानपूर येथील अखिल भारतीय क्षत्रियांच्या सामाजिक परिषदेच्या अध्यक्षपदावरून बोलताना १९एप्रिल १९१९रोजी ते

राजर्षी शाहू महाराज आणि स्त्री शिक्षण

छत्रपती असूनही समाजक्रांतिकारक बनलेले, आपल्या राजदंडाचा वापर जनतेच्या सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी करणारे राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त. आधुनिक महाराष्ट्राच्या विबोधतेचा काळ म्हणून आपण ‘फुले, शाहू, आंबेडकर’ कालखंडाकडे पाहतो. आधुनिक महाराष्ट्राला त्यांच्यासारख्या सुधारकांकडून आणि त्यांच्या विचारांच्या अनुयायांकडून पुरोगामित्वाचा वारसा मिळाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात समाजसुधारकांची मांदियाळीच निर्माण झाली. या मांदियाळीत राजर्षी शाहू महाराजांचे वेगळेपण प्रकर्षाने जाणवते. छत्रपती असूनही

कोरोना, 5G आणि बिनबुडाचे षडयंत्रकारी सिद्धांत

गेले काही दिवस महाराष्ट्राच्या सोशल मीडियात 5G व कोरोनाच्या संबंधाने काही अतिशय हास्यास्पद पोस्ट फिरत आहेत. महाराष्ट्राच्या एकूण सोशल मीडिया वर्तुळात तांत्रिक तसेच विज्ञान विषयांवर माहिती लिहिणाऱ्यांचा दुष्काळ असल्याने हिंदी पट्टयातून येणाऱ्या खऱ्या-खोट्या मेसेजेसचा पाऊस येथे पडत असतो. यातून कोविड-19 सारख्या घातक आजाराच्या गांभिर्याकडे दुर्लक्ष होऊन अस्तित्वात नसलेल्या जागतिक षडयंत्राच्या वायफळ चर्चा घडत आहेत. या

अधिक महिना आणि थोतांड

अगणीत वर्षांपूर्वी आकाशा मध्ये दोन अत्यंत तेजस्वी तारे फिरत होते. हे तारे जवळून जात असताना एक मोठी ठिणगी उडाली. ही ठिणगी अवकाशात तप्त वायूच्या गोळ्याच्या स्वरुपात फिरत होती. करोडो वर्ष फिरत राहिल्यावर हळूहळू या तापलेल्या गोळ्याचा पृष्ठभाग थंड झाला. तीच आपली पृथ्वी होय. पृथ्वी सूर्याभोवती ३६५ दिवसात एक फेरा पूर्ण करते. पृथ्वी, सूर्य, चंद्र व

मराठी भाषेचे ‘खरे’ शिवाजी: महाराज सयाजीराव

२०१३ पासून वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर सयाजीरावांचा वारसा कृतीत आणणाऱ्या यशवंतराव चव्हाणांनी घेतलेला पहिला निर्णय म्हणजे १९ नोव्हेंबर १९६० रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना होय. अशा प्रकारची संस्था स्थापन करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य होते. हे मंडळ

गणपती देवता: उगम व विकास – डॉ.अशोक राणा

मंगलकार्याच्या आरंभी गणपतीला वंदन करण्याची प्रथा आपल्या देशात वर्षानुवर्षे चालू आहे. अगदी ऋग्वेदातील ऋचांपासून तो तमाशातील गण-गौळणींच्या नमनापर्यंतचे सारे संदर्भ गणपतीच्या अग्रस्थानाला मान्यता देणारे आहेत. आजही एखाद्या नव्या कामाची सुरूवात करायची झाल्यास गणेशाचे वंदन पहिल्यांदा केले जाते. त्यामुळेच तर कार्याच्या आरंभाला ‘श्रीगणेशा ‘ असे म्हटले जाते. यावरून अग्रपूजेचा मान मिळालेल्या गणपतीला आपल्या जीवनात महत्वाचे स्थान

विठोबा कुणाचा? – डॉ.अशोक राणा

महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेला पंढरपूरचा पांडुरंग हा वारकऱ्यांचा प्राण आहे. संत शिरोमणी नामदेवांनी त्याला विठाई म्हणून संबोधून ते आपल्या जीवीचे जीवन आहे, असं म्हटलं आहे. खरं तर त्यांच्यामुळेच तो भारतभर पसरला व शिखांच्या गुरुग्रंथ साहिबचं अविभाज्य अंग झाला. ज्ञानदेवांनी कानडा विठ्ठलु कर्नाटकु म्हणून त्यांच्या मूळ स्थानाची खूण सांगितली. मग तो केवळ महाराष्ट्राचाच आहे, असं कसं म्हणता

हेमाडपंती मंदिरे व इतिहासकारांचा सावळागोंधळ

भारतभर नागर, वासर व द्राविड अशा प्राचीन मंदिरांच्या निर्माणशैली प्रचलित आहेत. परंतु हेमाडपंती या शैलीचा कोणत्याही प्राचीन किंवा मध्ययुगीन ग्रंथांमध्ये उल्लेख आढळत नाही. तरीही प्रख्यात पुरातत्त्वशास्त्रज्ञ व संस्कृत भाषा व साहित्याचे संशोधक डॉ.वा.वि.मिराशी यांनी आपल्या’ संशोधन मुक्तावली‘ या शोधनिबंध संग्रहात मात्र तसा उल्लेख केलेला आहे. १९५७मध्ये प्रकाशित प्रस्तुत ग्रंथामध्ये पृ.१३९ वर ते म्हणतात, ”रामदेवराय यादवाचा

शोध हनुमानाचा – डॉ. अशोक राणा

आमच्या अमरावतीच्या घरासमोर काळ्या मारुतीचे मंदिर आहे. माझ्या पत्त्यामध्ये त्याचा पूर्वी उल्लेख असायचा. त्यामुळे काळा मारुती हा काय प्रकार आहे,असे भेटणारे लोक उत्सुकतेने विचारीत असत. मग मंदिराच्या पुजाऱ्याने दिलेली माहिती उत्तरादाखल आम्ही त्यांना सांगत असू. बहुतेक ठिकाणी शेंदूर माखलेला मारुती असतो. लाल-नारिंगी रंगाचा मारुती सर्व परिचित आहे. त्याच्याविषयी स्पष्टीकरण दिले जाते,की जन्मतःच आकाशातील लालबुंद सूर्य

राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख

(जन्म : २० फेब्रुवारी १९३९ मृत्यु : २९ सप्टेंबर २००३) गेल्या तीन चार दशकांमध्ये महाराष्ट्रातील असे एकही गाव नसेल ज्या गावात शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांचा आवाज घुमल्याशिवाय शिवजयंती साजरी झाली असेल. “ओम नमो श्री जगदंबे, नमन तुज अंबे, करुन प्रारंभे, डफावर थाप तुणतुण्या ताण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिवप्रभुचं गातो गुणगान जी जी जी जी…