चळवळी फुटण्याचे तत्त्वज्ञान व तंत्रज्ञान! – पुरुषोत्तम खेडेकर

जेंव्हा-जेव्हा बहुजन चळवळींचे समाज परिवर्तनाचे यश हिमालयासारखे उंच-उंच होऊन समाजाच्या नजरेत भरायला लागते, तेव्हा तेव्हा प्रतिचळवळीचे पुरस्कर्ते चळवळीमध्ये फूट पाडण्यात यशस्वी होतात. चळवळींचे मार्गदर्शक, नेते, चळवळींचे प्रवक्ते, चळवळींचे पदाधिकारी, चळवळींचे वक्ते यांच्यात मतभेद निर्माण केल्या जातात. नेतेमंडळी एकविचाराने वा एकमुखाने बोलत नाहीत. चळवळीमधील प्रमुख मार्गदर्शक जेव्हा प्रतिचळवळीची भाषा बोलू लागतात,…

भूमातेची आराधना – डॉ.अशोक राणा

आला पह्यला पाऊस | शिपडली भुई सारी धरत्रीचा परमय | माझं मन गेलं भरी ! पहिल्या पावसाने जमिनीचा कणन् कण ओला झाला. त्यामुळे दरवळलेला मृदगंध मनात काठोकाठ भरून गेला. भूमिकन्या बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या खानदेशी बोलीतून व्यक्त केलेल्या या उत्कट भावना साऱ्या भूमिपुत्रांच्या मनातील स्पंदनांना मुखरित करतात. पावसाच्या धारा म्हणजे…

कामगारांचे हितकर्ते राजर्षी शाहू

समाजातील कष्टकरी, कामगार आणि शोषित, पीडित यांच्याविषयी राजर्षी शाहू छत्रपतींना आंतरिक कळकळ होती. या घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी कृतिशील आदर्श घालून दिला. राजर्षी शाहूंच्या जयंतीदिनी त्यांच्या कार्याला दिलेला उजाळा. शाहू छत्रपती स्वतःला अगदी अभिमानाने शेतकरी किंवा मजूर कष्टकरी म्हणवून घेण्यात धन्यता मानताना आढळून येतात. कानपूर येथील अखिल भारतीय क्षत्रियांच्या सामाजिक परिषदेच्या…

राजर्षी शाहू महाराज आणि स्त्री शिक्षण

छत्रपती असूनही समाजक्रांतिकारक बनलेले, आपल्या राजदंडाचा वापर जनतेच्या सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी करणारे राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त. आधुनिक महाराष्ट्राच्या विबोधतेचा काळ म्हणून आपण ‘फुले, शाहू, आंबेडकर’ कालखंडाकडे पाहतो. आधुनिक महाराष्ट्राला त्यांच्यासारख्या सुधारकांकडून आणि त्यांच्या विचारांच्या अनुयायांकडून पुरोगामित्वाचा वारसा मिळाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात समाजसुधारकांची मांदियाळीच निर्माण झाली. या मांदियाळीत राजर्षी शाहू महाराजांचे…

कोरोना, 5G आणि बिनबुडाचे षडयंत्रकारी सिद्धांत

गेले काही दिवस महाराष्ट्राच्या सोशल मीडियात 5G व कोरोनाच्या संबंधाने काही अतिशय हास्यास्पद पोस्ट फिरत आहेत. महाराष्ट्राच्या एकूण सोशल मीडिया वर्तुळात तांत्रिक तसेच विज्ञान विषयांवर माहिती लिहिणाऱ्यांचा दुष्काळ असल्याने हिंदी पट्टयातून येणाऱ्या खऱ्या-खोट्या मेसेजेसचा पाऊस येथे पडत असतो. यातून कोविड-19 सारख्या घातक आजाराच्या गांभिर्याकडे दुर्लक्ष होऊन अस्तित्वात नसलेल्या जागतिक षडयंत्राच्या…

अधिक महिना आणि थोतांड

अगणीत वर्षांपूर्वी आकाशा मध्ये दोन अत्यंत तेजस्वी तारे फिरत होते. हे तारे जवळून जात असताना एक मोठी ठिणगी उडाली. ही ठिणगी अवकाशात तप्त वायूच्या गोळ्याच्या स्वरुपात फिरत होती. करोडो वर्ष फिरत राहिल्यावर हळूहळू या तापलेल्या गोळ्याचा पृष्ठभाग थंड झाला. तीच आपली पृथ्वी होय. पृथ्वी सूर्याभोवती ३६५ दिवसात एक फेरा पूर्ण…

मराठी भाषेचे ‘खरे’ शिवाजी: महाराज सयाजीराव

२०१३ पासून वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर सयाजीरावांचा वारसा कृतीत आणणाऱ्या यशवंतराव चव्हाणांनी घेतलेला पहिला निर्णय म्हणजे १९ नोव्हेंबर १९६० रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना होय. अशा प्रकारची संस्था स्थापन करणारे महाराष्ट्र हे भारतातील…

गणपती देवता: उगम व विकास – डॉ.अशोक राणा

मंगलकार्याच्या आरंभी गणपतीला वंदन करण्याची प्रथा आपल्या देशात वर्षानुवर्षे चालू आहे. अगदी ऋग्वेदातील ऋचांपासून तो तमाशातील गण-गौळणींच्या नमनापर्यंतचे सारे संदर्भ गणपतीच्या अग्रस्थानाला मान्यता देणारे आहेत. आजही एखाद्या नव्या कामाची सुरूवात करायची झाल्यास गणेशाचे वंदन पहिल्यांदा केले जाते. त्यामुळेच तर कार्याच्या आरंभाला ‘श्रीगणेशा ‘ असे म्हटले जाते. यावरून अग्रपूजेचा मान मिळालेल्या…

विठोबा कुणाचा? – डॉ.अशोक राणा

महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेला पंढरपूरचा पांडुरंग हा वारकऱ्यांचा प्राण आहे. संत शिरोमणी नामदेवांनी त्याला विठाई म्हणून संबोधून ते आपल्या जीवीचे जीवन आहे, असं म्हटलं आहे. खरं तर त्यांच्यामुळेच तो भारतभर पसरला व शिखांच्या गुरुग्रंथ साहिबचं अविभाज्य अंग झाला. ज्ञानदेवांनी कानडा विठ्ठलु कर्नाटकु म्हणून त्यांच्या मूळ स्थानाची खूण सांगितली. मग तो केवळ…

हेमाडपंती मंदिरे व इतिहासकारांचा सावळागोंधळ

भारतभर नागर, वासर व द्राविड अशा प्राचीन मंदिरांच्या निर्माणशैली प्रचलित आहेत. परंतु हेमाडपंती या शैलीचा कोणत्याही प्राचीन किंवा मध्ययुगीन ग्रंथांमध्ये उल्लेख आढळत नाही. तरीही प्रख्यात पुरातत्त्वशास्त्रज्ञ व संस्कृत भाषा व साहित्याचे संशोधक डॉ.वा.वि.मिराशी यांनी आपल्या’ संशोधन मुक्तावली‘ या शोधनिबंध संग्रहात मात्र तसा उल्लेख केलेला आहे. १९५७मध्ये प्रकाशित प्रस्तुत ग्रंथामध्ये पृ.१३९…