कोरोना, 5G आणि बिनबुडाचे षडयंत्रकारी सिद्धांत

गेले काही दिवस महाराष्ट्राच्या सोशल मीडियात 5G व कोरोनाच्या संबंधाने काही अतिशय हास्यास्पद पोस्ट फिरत आहेत. महाराष्ट्राच्या एकूण सोशल मीडिया वर्तुळात तांत्रिक तसेच विज्ञान विषयांवर माहिती लिहिणाऱ्यांचा दुष्काळ असल्याने हिंदी पट्टयातून येणाऱ्या खऱ्या-खोट्या मेसेजेसचा पाऊस येथे पडत असतो. यातून कोविड-19 सारख्या घातक आजाराच्या गांभिर्याकडे दुर्लक्ष होऊन अस्तित्वात नसलेल्या जागतिक षडयंत्राच्या वायफळ चर्चा घडत आहेत. या … Continue reading: कोरोना, 5G आणि बिनबुडाचे षडयंत्रकारी सिद्धांत

अधिक महिना आणि थोतांड

अधिक मासाचे थोतांड

अगणीत वर्षांपूर्वी आकाशा मध्ये दोन अत्यंत तेजस्वी तारे फिरत होते. हे तारे जवळून जात असताना एक मोठी ठिणगी उडाली. ही ठिणगी अवकाशात तप्त वायूच्या गोळ्याच्या स्वरुपात फिरत होती. करोडो वर्ष फिरत राहिल्यावर हळूहळू या तापलेल्या गोळ्याचा पृष्ठभाग थंड झाला. तीच आपली पृथ्वी होय. पृथ्वी सूर्याभोवती ३६५ दिवसात एक फेरा पूर्ण करते. पृथ्वी, सूर्य, चंद्र व … Continue reading: अधिक महिना आणि थोतांड

मराठी भाषेचे ‘खरे’ शिवाजी: महाराज सयाजीराव

महाराज सयाजीराव गायकवाड

२०१३ पासून वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर सयाजीरावांचा वारसा कृतीत आणणाऱ्या यशवंतराव चव्हाणांनी घेतलेला पहिला निर्णय म्हणजे १९ नोव्हेंबर १९६० रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना होय. अशा प्रकारची संस्था स्थापन करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य होते. हे मंडळ … Continue reading: मराठी भाषेचे ‘खरे’ शिवाजी: महाराज सयाजीराव

गणपती देवता: उगम व विकास – डॉ.अशोक राणा

मंगलकार्याच्या आरंभी गणपतीला वंदन करण्याची प्रथा आपल्या देशात वर्षानुवर्षे चालू आहे. अगदी ऋग्वेदातील ऋचांपासून तो तमाशातील गण-गौळणींच्या नमनापर्यंतचे सारे संदर्भ गणपतीच्या अग्रस्थानाला मान्यता देणारे आहेत. आजही एखाद्या नव्या कामाची सुरूवात करायची झाल्यास गणेशाचे वंदन पहिल्यांदा केले जाते. त्यामुळेच तर कार्याच्या आरंभाला ‘श्रीगणेशा ‘ असे म्हटले जाते. यावरून अग्रपूजेचा मान मिळालेल्या गणपतीला आपल्या जीवनात महत्वाचे स्थान … Continue reading: गणपती देवता: उगम व विकास – डॉ.अशोक राणा

विठोबा कुणाचा? – डॉ.अशोक राणा

महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेला पंढरपूरचा पांडुरंग हा वारकऱ्यांचा प्राण आहे. संत शिरोमणी नामदेवांनी त्याला विठाई म्हणून संबोधून ते आपल्या जीवीचे जीवन आहे, असं म्हटलं आहे. खरं तर त्यांच्यामुळेच तो भारतभर पसरला व शिखांच्या गुरुग्रंथ साहिबचं अविभाज्य अंग झाला. ज्ञानदेवांनी कानडा विठ्ठलु कर्नाटकु म्हणून त्यांच्या मूळ स्थानाची खूण सांगितली. मग तो केवळ महाराष्ट्राचाच आहे, असं कसं म्हणता … Continue reading: विठोबा कुणाचा? – डॉ.अशोक राणा