अधिक महिना आणि थोतांड

अगणीत वर्षांपूर्वी आकाशा मध्ये दोन अत्यंत तेजस्वी तारे फिरत होते. हे तारे जवळून जात असताना एक मोठी ठिणगी उडाली. ही ठिणगी अवकाशात तप्त वायूच्या गोळ्याच्या स्वरुपात फिरत होती. करोडो वर्ष फिरत राहिल्यावर हळूहळू या तापलेल्या गोळ्याचा पृष्ठभाग थंड झाला. तीच आपली पृथ्वी होय. पृथ्वी सूर्याभोवती ३६५ दिवसात एक फेरा पूर्ण करते. पृथ्वी, सूर्य, चंद्र व इतर ग्रह हे सूर्य मालेचे वेगवेगळे घटक आहेत. आपापसातील चुंबकीय व गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे त्यांचे स्थळ योग्य ठिकाणी राहते. त्यामुळे पृथ्वी ‘शेषनागाच्या फण्यावर’ ठेवलेली आहे, ही पुराणातील भाकडकथा चुकीची ठरते. सूर्य, पृथ्वी, चंद्र हे फिरत असताना सूर्य व पृथ्वी यामध्ये चंद्र आल्यास ग्रहण लागते. सूर्यग्रहण चंद्रग्रहण याचा अशुभ बाबींशी काहीही संबंध नाही. त्यामुळे ग्रहण सुटल्यावर आंघोळ करणे, शिळे अन्न पाणी फेकून देणे, दान मागते. या अंधश्रद्धा आहेत. शिळे फेकायचे झाल्यास घरातलेच पाणी फेकून चालणार नाही. पृथ्वीवरचे सर्वच पाणी शिळे समजावे लागेल म्हणून चंद्रग्रहण, सूर्यग्रहण या वैज्ञानिक बाबी आहेत. भटांनी खोटे लिहिले. तसेच राहू आणि केतू नावाचा कुठलाही ग्रह – सूर्यमालेत अस्तित्वातच नाहीत.

पृथ्वीची निर्मिती कशी झाली, ते आपण पाहिलेच आहे. त्यामुळे भारत देशातील कुणातरी ब्राम्हण ब्रम्हाने पृथ्वीची निर्मिती केली, हे खोटे आहे. पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरा मारायला अचूक सांगायचे झाल्यास ३६५ दिवस व सहा तास लागतात. यालाच आपण एक वर्ष म्हणतो. मराठी कॅलेडर अमावस्या पौर्णिमा याप्रमाणे असते. त्याप्रमाणे ३० दिवसांचा एक महिना व १२ महिन्याचे एक वर्ष म्हणजे १२ x ३० =३६० दिवसांचे एक मराठी वर्ष. प्रत्यक्षात एक वर्ष म्हणजे पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरा मारण्यास लागणारे दिवस अर्थात ३६५ १/४ दिवस म्हणजेच मराठी वर्ष. मूळ वर्षापेक्षा दरवर्षी ३६५१/४ – ३६० = ५१/४ दिवसांनी कमी पडते. हे कालचक्र भरून काढण्यासाठी दरवर्षी सव्वापाच दिवस साचत जाऊन सुमारे सहा वर्षांनी तीस दिवस होतात. हे साचलेले तीस दिवस ज्यावर्षी येतात, त्याला आपण अधिक महिना म्हणतो. म्हणजे चंद्र व सूर्याची पृथ्वीच्या गतीबरोबर काळाची सांगड घातली जाते. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे ‘अधिक महिना’ पुण्याचा महिना आहे वा मोठे संकट आहे, हे समजणे चूक आहे.

अज्ञानामुळे आपल्या मेंदूत ही भीती ब्राम्हण, भट, पुरोहीत यांनी घातलेली आहे. त्यामुळे अधिक महिन्यात ब्राम्हणांना दान, दक्षिणा देणे, तीर्थ यात्रा करणे, भीतीमुळे पैसे उडवणे स्वतःला पापी समजणे चूक आहे. त्याच सूत्रानुसार इंग्रजी वर्ष सौर वर्ष जानेवारी ते डिसेंबर ३६५ दिवसांचे असते. त्यामुळे त्यातही ३६५ १/४ – ३६५ = १/४ दिवस दरवर्षी शिल्लक म्हणून ही सांगड घालण्यासाठी चार वर्षांनी १/४४४ = १ दिवस वाढविल्या जाऊन फेब्रुवारी महिना २९ दिवसांचा होतो. त्याला आपण लीप इअर वर्ष म्हणतो. लीप इअरला आपण अपवास तीर्थ करत नाही, हे या ठिकाणी आपण आवर्जून समजून घेतले पाहिजे.

बहुजनांनो, अशा कितीतरी गोष्टी आहेत की त्याची अजूनही आपण चिकित्सा केलेली नाही. कुणीतरी ब्राम्हण आपल्या घरी येतो, तो सांगतो तेच आपण खरं मानतो. पाप, पुण्य, स्वर्ग, नरक, पुर्वजन्म, पुनर्जन्म, मोक्ष, उपवास, हे सर्व काल्पनिक शब्द आहेत. हे शब्द दररोज डोक्यात घातल्यामुळे आपल्या मेंदूचा भाग झालेत. एकच बाब सतत सांगत राहिल्यास ती खरी वाटते. खोटी गोष्ट भावनेला जोडून सांगितल्यास ती खरी वाटते. उदा. ब्राम्हणाला दक्षिणा दिल्यास तुझ्या बापाच्या आत्म्यास शांती मिळते असे सांगितल्यामुळे मेलेल्या बापाशी भावनिक संबंध जोडले. बापाने जन्म दिला वैभव दिले, त्यासाठी तुम्ही काहीच करत नाही त्यामुळे अत्यंत बुद्धिमान लोकांचे मेंदू बधीर होतात. संख्येने कमी असलेल्या ब्राम्हणांनी बहुसंख्य बहुजन समाजाच्या मनात प्रचंड भीतीचा विचार घातला. त्याचा मेंदू गुलाम केला. आज एकविसाव्या शतकात स्वतःहाच्या मुलाचं नाव ठेवण्यासही बहुजन समाज प्रचंड घाबरतो. यालाच मानवी मेंदूची गुलामी म्हणतात.


कैलास पाटील गीते
(संभाजी ब्रिगेड)

Source: 1

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.