युगप्रवर्तक बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या शिवेच्छा!
गरीबांचा राजा | दु:खितांचा राजा
पिडीतांचा राजा | शिवराय ||
गुलामीचा शत्रू | पीडकांचा शत्रू
शोषकांचा शत्रू | शिवराय ||
थोर कर्मवीर | भक्त स्वातंत्र्याचा
भक्त समतेचा | शिवप्रभू ||
मोडी जातीभेद | मोडी सिंधुबंदी
धर्मांतरबंदी | मोडितसे ||
स्त्रियांचा कैवारी | पुत्र जिजाऊंचा
पालक प्रजेचा | निष्ठावंत ||
मानवताभक्त | थोर शिवराय
न दे अंतराय | नीतीतत्वा ||
सामान्या प्रतिष्ठा | दिली शिवबाने
जिजाऊंचे स्वप्नं | खरी केली ||
शिवछत्रपती | लोकराजा खरा
प्रेरणेचा झरा | स्वातंत्र्याचा ||