ह्या देशात मराठा-बहुजनांना पद्धतशीरपणे फसविण्याचे षड्यंत्र सुरु आहे. या देशाची सत्ता आणि संपत्ती ५% लोकांच्या हातात एकवटली आहे. देशातील मिडिया नॉन इशूला इशू करून या फसवणुकीला हातभार लावत आहे. काँग्रेस, भाजप तसेच इतर “फुटकळ” पक्ष सगळे मिळून देशाला लुटत आहेत. ह्याचे एक उदाहरण म्हणजे राष्ट्रपती प्रतिभा पाटील बांधत असलेला बंगला.
राष्ट्रपतींना निवृत्तीनंतर २ हजार स्क्वेयर फुट जागा देऊन बांधकाम करावे असे नियमात आहे पण हे सर्व नियम कायदे डावलून राष्ट्रपतीसाठी ५ एकर जागा दिली जात आहे. या कृत्याचा विरोध करणाऱ्या कर्नल सुरेश पाटील यांना भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी तसेच विकलेले पत्रकार त्रास देत आहेत. कर्नल सुरेश पाटील हे मुंबई येथे असताना अवैधपणे त्यांच्या घरात शिरून त्यांच्या पत्नी, सुन व मुलीला धमकावून त्रास दिला तसेच कोणतीही नोटीस किंवा पूर्व कल्पना न देता त्यांच्या घरात घुसून त्यांच्या घराची झडती घेतली.
तसेच Indian Express या काँग्रेसच्या दलाल पेपर मधील पत्रकार प्रणव कुलकर्णी याने कर्नल सुरेश पाटील घरी नसताना येऊन आतंकवादी पद्धतीने घरात शिरून कर्नल साहेबांच्या कुटुंबियांना त्रास दिला तसेच त्याने दिनांक १९ एप्रिल रोजी कर्नल साहेबांच्या विरुद्ध खोटी बातमी देऊन त्यांची बदनामी केली. कर्नल सुरेश पाटील यांना लष्कराने जे घर दिले आहे त्या घराच्या आवारात त्यांनी एका झाडाखाली पक्षांसाठी एक मचवा तयार करून त्यावर पाणी तसेच काही झाडांच्या कुंड्या लावल्या आहेत त्याला या पत्रकाराने आक्षेप घेतला आहे.
कर्नल सुरेश पाटील हे Justice For Jawan या संघटने मार्फत सैनिक आणि शहीद झालेल्या विधवांच्या साठी काम करतात. सैनिकांना घरे मिळावीत यासाठी ते अनेक आंदोलने करत आले आहेत. देशाची सुरक्षा करण्यासाठी सैनिक आपला जीव देतात आणि सरकार त्या शहीद झालेल्या सैनिकाच्या पत्नीला एक घर पण देऊ शकत नाही. यामुळे कर्नल साहेब सैनिकांच्या हक्कासाठी लढा देत आहेत. आता लष्करी जागेवर राष्ट्रपती भव्य दिव्य बंगला बांधत आहेत. सुमारे ५ एकर मध्ये हा बंगला बांधल्या जात आहे. कर्नल सुरेश पाटील यांनी या बंगल्याला विरोध केला आहे कारण हा बंगला सैनिकांच्या जागेवर बांधला जात तसेच या बंगल्याची जागा सैनिकांना आणि शहीद झालेल्या सैनिकाच्या विधवेला देण्यात यावी असी त्यांची प्रमुख मागणी आहे.
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभा पाटील सर्वांना परिचित आहेत. त्या आपले सगळे अंग झाकून शालीनतेच्या नावाखाली मनुस्मृतीचे पालन करतात. त्यांना यात मोठा घरंदाजपणा वाटतो. प्रतिभा पाटीलांनी कधी या देशातील स्त्रियांच्या समस्यांवर बोलल्याचे ऐकिवात नाही. आणि आता काँग्रेसच्या कृपेने त्यांना सैनिकांच्या जागेवर घर मिळत आहे. त्यांना जर थोडीशीही सैनिकांची कणव असेल तर त्यांनी हि जागा लष्कराला परत करावी.
कर्नल सुरेश पाटील यांनी युद्धात आपले रक्त सांडवले त्यांनी आपल्या लष्करी सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी बॉम्ब स्वतःच्या अंगावर झेलला. या देशासाठी त्यांनी आयुष्य वेचले आणि आज त्यांना या देशातील पत्रकार आणि सरकारी अधिकारी ते सैनिकांचा हक्क मागत आहेत म्हणून त्रास देत आहेत. आज कर्नल साहेबांना आपल्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. सर्वांनी कर्नल साहेबांना पाठींबा देऊन या पोस्टला जास्तीतजास्त लोकांपर्यंत share करावे.
कर्नल सुरेश पाटील यांचा मोबाईल नंबर ०९३७१२०२८७५