विकृतीभूषण

झालेत बहू होतील बहू
यासम बेशरम दुसरा नाही
बिलंदरीही लाजली जनहो
विकृतीभूषणाच्या सन्मानाने!

शाहिरी न रचता शाहीर झाला
जिजाऊ बदनामीपायी देह झिजविला
दहशतवादीही पडलेत फिके
विकृतीभूषणाच्या सन्मानाने!

शिवइतिहासाच्या ब्राम्हणीकरणातून
उध्वस्त केली भारतीय बंधुता
मानवी बॉम्बही शहारले जगी
विकृतीभूषणाच्या सन्मानाने!

काय साधले? साधणार आहेत!
विकृतीभूषणाच्या सन्मानाने!
तरुणाईचे तारुण्य करपले
विकृतीभूषणाच्या सन्मानाने!

महाराष्ट्राची अस्मिता काळवंडली आज
विकृतीभूषणाच्या सन्मानाने!
उपाय शिवजनहो एकच आता
उजळूया महाराष्ट्र लोकभूषणाने….

-पुरुषोत्तम खेडेकर
जिजाऊनगर (पुणे)

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.