फुले-शाहू-आंबेडकरांपेक्षा महान भीमसेन-लता-तेंडूलकर!

भारतातील तमाम मराठा-बहुजन महापुरुषांना सोडून केवळ ब्राम्हणांना जातीच्या आधारावर भारतरत्न देण्याच्या सरकारच्या कृतीवर संभाजी ब्रिगेडचे अकोला जिल्हा प्रवक्ता शिवश्री अमोल मिटकरी यांनी ओढलेला असूड!

माफ करा महापुरुषांनो आम्हाला! तुम्ही इतिहासातच बरे वाटता! तुमचे नाव घ्यायला स्टेजवर टाळ्या मिळाव्यात, म्हणून आम्हाला तेवढयापुरता अभिमान वाटतो. भगतसिंग, शिवाजी महाराज, संभाजीराजे वा…. वा…अंगात क्षणभर वांझोटा उत्साह संचारतो. फुले,शाहू, आंबेडकर म्हटले, की तूर्त समाजसुधारक झाल्याचा भास होतो; पण तुम्ही तुमच्या जीवनाचे कधी आत्मचिंतन केलंय का? आम्ही केलंय बरं का! तुम्ही जगला असाल उपभोग शुन्य म्हणून; मात्र आजचा जमाना वशिल्याचा आहे. आम्ही जर तुमच्यासारखे बनण्याचा प्रयत्न केला ना, तर अख्खी खानदान मारून टाकतील, समाजकंटक!

आता महापुरुषांची व्याख्या बदलली आहे. आता छातीचा कोट करून देशासाठी बलिदान देण्याचा हेमंत करकरेंसारख्या महान देशभक्ताच्या खाकी वर्दीतल्या मर्दाना कुणी किंमत नाही देणार; मात्र करबुडव्या ‘छक्के’ मारणाऱ्या छक्क्यांच्या राजाला म्हणजे आमच्या तरुणांच्या आदर्शाला सचिन तेंडुलकरला ‘भारतरत्न’ म्हणून इतिहासात धडा येणार, त्याला सन्मानाची जागा मिळणार !

जीवाचं रान करून समाजाला अघोरी प्रथेपासून रोखण्यासाठी मरणाऱ्या नरेंद्र दाभोळकरांचा आम्हाला अभिमान नाही वाटणार; पण ‘देर ना होजाये…’ गाणाऱ्या लता मंगेशकरला आमच्या पुढच्या पिढ्या महापुरुष म्हणणार. खंजेरीवर थाप मारून मुडद्यामध्ये देशसेवेची क्रांती गीते पेरणाथा तुकडोजींना साधे स्वातंत्र्य सैनिक व राष्ट्रपुरुष म्हणा, हे सांगण्यासाठी आंदोलन करावे लागणार; मात्र भीमसेन जोशींच्या हां-हू पुढे तुकडोजींचा विसर पडणार, कारण तेही काही दिवसांत आमच्या अभ्यासक्रमात येणार!

परवा भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार समजल्या जाणा-या ‘भारतरत्न’ पुरस्काराची घोषणा ऐकली व अंतःकरण चिरल्यासारखे, कुणीतरी कानात शिसे ओतल्यासारखे वाटले! कला क्षेत्रात अतुलनीय काम करणा-यांना तसेच क्रीडा, संशोधन, राजकारण व समाजकार्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. आता एकेक क्षेत्र तपासून पाहू! ‘कला’ या क्षेत्रात अनेक प्रकार येतात. ‘गायन’ हा प्रकार कलेमध्ये येतो! भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांच्या गानकलेला ‘भारतरत्न’ मिळाला. हे दोन्ही कलावंत कधी फुकट गात नव्हती.’ऐ मेरे वतन के लोगो’ हे लता बाईचे गाणे अजूनही आम्ही ऐकतो, रडतो, डोळ्यात पाणी आणतो, ती पैसे घेऊन गाते तरी तिला ‘भारतरत्न’, तिच्या पूर्ण परिवारात कुणी ‘बॉर्डर’वर गेला नसेल, तरी ‘शहीदां’वर ती गाते मात्र जे खरेच शहीद झाले ते भगतसिंग, उधमसिंग, खुदीराम बोस यांची नावे का भारतरत्नात येत नाहीत?

या लताबाईपेक्षा दुप्पट गीते विना माईकचे व विना पैशाचे अण्णाभाऊ साठेंनी गायलीत. लताबाईची गाण्याची दोनची पट्टी असेल, तर अण्णाभाऊंचा पंचम स्वर होता. मग ते भारतरत्न का नाहीत? कारण ते मातंग आहेत. पं.भीमसेन जोशींचे गायलेले अभंग, गीत कुणाला तरी समजतात का? वामनदादा कर्डक, प्रल्हाद शिंदे, विठ्ठलराव उमप यांचे एक पहाडी आवाजातले गीत दोनशे भीमसेनांना कोरस करायला भाग पाडते; मात्र यांची नावे समाजाला माहीत नाहीत. ‘भारतरत्न’ तर नंतरचा विषय आहे, कारण पहाडी आवाजातले बौद्ध आहेत.

आता क्रीडा क्षेत्र पाहू या! तेंडुलकर जो खेळ खेळतो तो खेळ -प्रगत राष्ट्रे खेळत नाहीत. शाहू महाराज, लहुजी साळवे, जोतीराव फुले हे मर्दानी खेळ खेळायचे ‘कुस्ती’! खाशाबा जाधव हे पहिले कुस्तीपटू तर मेजर ध्यानचंदांचा ‘हॉकी’ हा खेळसुद्धा जागतिक दर्जाचा ! ध्यानचंद व खाशाबा जाधवांना शिफारस करूनही महत्त्व नाही; मात्र तेंडुलकर ‘भारतरत्न ! कारण मर्दानी खेळ खेळणारे मराठा बहुजन आहेत!

संशोधन हे क्षेत्र तपासू या! चंद्रशेखर वेंकटरमण, जे.आर.डी. टाटा आदि संशोधक म्हणून सन्मानित झालेत. टाटा उद्योग समूह उद्योजकांसाठी काम करतो. वामनदादा म्हणत इथे टाटा, बिरला तरतील! बाकी सगळे उपाशी मरतील!! यांच्यापेक्षा शेतामध्ये राब राब राबणाऱ्या शेतकऱ्याने एका दाण्याचे हजारो दाणे तयार करण्याचे संशोधन केले, तरी या क्षेत्रात भरीव कार्य करणाया डॉ. पंजाबराव देशमुखांना “भारतरत्न’ का नसावा? शेतकऱ्यांची, त्यांच्या बलिदानाची टिंगल करून ‘बळीराजाची बोगस बोंब’ अशी आरोळी ठोकणारे एखाद्या शेतकऱ्याला भारतरत्न देण्याची हिंमत नाही करणार, कारण शेतकरी कुणबी?

आता ‘राजकारण’ हा सर्वांच्या आवडीचा विषय! या क्षेत्रात काम करणाऱ्यांमध्ये पं.नेहरू ते अटल बिहारी असा प्रदीर्घ प्रवास ‘भारतरत्न’ पुरस्काराचा घडलाय. राजकारण व समाजकारण यांची सांगड घालून तळागाळाला न्याय देण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी करून दाखवले; मात्र मरणोपरांत ३४ वर्षांच्या ‘अटल’ संघर्षानंतर त्यांना व त्यांच्या कार्याला सरकारला न्याय देणे भाग पडले. बाबासाहेब ‘भारतरत्न’ तुम्हीच शोभता! नाहीतर इतरही नावे तपासा. काही अपवाद वगळले, तर अशा नावापुढे ‘भारतरत्न’ आहे, ज्यांची अजिबात xxx नाही. तुमचा (आमचाही बर) समाज शिकला व संघर्षात उतरला म्हणून तुमची दखल घेतली; मात्र झोपलेल्या समाजास कधी जाग येईल कुणास ठाऊक?

समाजकार्याचेही असेच वाटोळे झाले! विनावेतन शाळा शिकणाथा, शाळा उघडणाचा, चालवणाऱ्या सावित्री व जोतीरावांना अजूनही न्याय नाही; मात्र वेतन घेऊन शिकवणारे सर्वपल्ली पहिले भारतरत्न! राजर्षी शाहू महाराज! केवडे मोठे योगदान! वर्णव्यवस्थेला लाथाडणाऱ्या शाहू महाराजांना भारतरत्न नसणे ही भारतीय समाजमनाची शोकांतिका व पराभव आहे. यंदा ‘पंडित मदन मोहन मालवीय’ हे नाव भारतरत्न पुरस्कारासाठी जाहीर झाले. सरकारने भगतसिंगांची, त्यांच्या बलिदानाची टिंगल केली. भगतसिंगांच्या हौतात्म्याला काळीमा फासला. भगतसिंग असते, तर हसून म्हणाले असते,

‘लौट कर न आ सके इस जहाँ मे तो क्या? याद बनके दिलोमें तो उग जायेंगे।’

मदन मोहन यांना भारतरत्न द्या… पण इथल्या तरुणांचे रक्त भगतसिंगांचे नाव ऐकूनच पेटून उठले, मालवीय यांचे ऐकून नाही. या भारतरत्नाबद्दल भगतसिंगांनी जे लिहिलंय ते वाचा, पं. मालवीय कसे होते, ते पहा. ते बेगडी समाजसुधारक होते. पं. मदन मोहन मालवीय व भगतसिंग! आज मालवीयजींसारखे मोठे समाजसुधारक, जे स्वतःला अस्पृश्यांचे कैवारी आणि न जाणो काय काय समजतात, ते आधी एका भंग्याच्या हस्ते गळ्यात हार घालून घेतात, पण नंतर मात्र कपड्यासहित स्नान केल्याशिवाय स्वतःला पवित्र समजत नाहीत. काय चलाखी आहे! मंदिर हे सर्वांवर प्रेम करणाचा परमेश्वराची पूजा करण्यासाठी आहे! पण तिथे अस्पृश्य गेले तर ते अपवित्र होते! परमेश्वराचा कोप होतो! घरात जर ही दशा असेल, तर आपण बाहेर समानतेच्या नावावर संघर्ष करणे कितपत योग्य दिसते? आपली ही वागणूक म्हणजे देखील कृतघ्नपणाचा कळस आहे. जे लोक अत्यंत कष्टाची कामे करून आपल्याला सुखसोयी पुरवतात, त्यांनाच आपण झिडकारतो. पशुंची आपण पूजा करू शकतो, मात्र माणसाला आपण जवळही बसवू शकत नाही.

महान कोण आहेत? बहुजन समाजासाठी कार्य करणारे, जिवंतपणी व मरणोत्तरही उपेक्षितच राहिले. इतिहासात अशा उपेक्षितांची दखल घेतल्या जात नाही. जोतीराव फुले गेल्यावर त्यांचे साहित्य त्यांच्या सुनेला अवघ्या १०० रुपयांत विकावे लागले, लोकांची धुणीभांडी करावी लागली. बाबासाहेबांनी समाजासाठी आपल्या लेकरांच्या मरणाचे दुःख पचवले. अण्णाभाऊंचे प्रेत दीड दिवस झोपडीतच पडून राहिले. सावित्रीमाईला संसर्गजन्य व्याधीने जीव द्यावा लागला. छ.संभाजी राजे ४० दिवस अन्नपाण्याव्यतिरिक्त निधड्या छातीने लढत राहिले. भगतसिंगांचे १३१ दिवसांचे उपोषण व २३व्या वर्षी बलिदान, अबब! कुठे फुले,शाहू, आंबेडकर व कुठे लता, भीमसेन, तेंडुलकर?

मात्र यांना कितीही रत्न देऊ देत… सत्ताधीश उद्या वेळ पडला, तर आसाराम बापू, नथ्थुराम गोडसे, रामपाललाही भारतरत्न देतील. मात्र एक पोटतिडकीने सांगतो यांनी जाहीर केले म्हणून ते कागदोपत्री भारतरत्न उद्या कुणाच्या लक्षात राहोत न राहोत; पण रंजल्या, गांजल्या, उपेक्षितांना हृदयाशी कवटाळणाऱ्या खऱ्या महापुरुषांना मरेपर्यंत हृदयात साठवणारे करोडो अनुयायी अजून जिवंत आहेत. त्यांचे भारतरत्न तेंडुलकर, लता कधीच होणार नाहीत. पं. मालवीय वर्णवादी होते. त्यांना वर्णवादीच स्वीकारतील! मात्र भारतरत्नसाठी माणूस जातीने ‘ब्राह्मण असावा लागतो, हे भारतरत्नच्या आतापर्यंतच्या इतिहासातून लक्षात घेण्यासारखे आहे.

“जोवर मनुचा मुडदा पाडण्याचा प्रयत्न होत नाही,
रंजल्या गांजल्यांच्या पोटाला जोवर कुणी देत नाही,
अरे त्या तेंडुलकरला किती मोठे बनवले तरी
पुढे बाबासाहेबांसारखा भारतरत्न जन्माला येत नाही।।”


अमोल मिटकरी

Source: 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.