पंचांगाच्या मागे। लागतो अडाणी, पाहे क्षणोक्षणी। शुभाशुभ ॥१॥ मूर्ख भट म्हणे। त्याज्य दिन आज, दक्षिणेची लाज। बाळगेना ॥ २॥ कामचुकारांना। धार्जिणे पंचांग, सडलेले अंग। संस्कृतीचे ॥३॥ मुहूर्ताचे वेड। मूर्खांना शोभते, आयुष्य नासते। पंचांगाने ॥४॥ चांगल्या कामाला। लागावे कधीही, गोड फळ येई। कष्ट घेता ॥५॥ दुष्ट कामे केली। शुभ वेळेवरी, माफी नाही तरी। शिक्षेतुनी ॥६॥ वेळ,