महाराष्ट्र राज ठाकरेंच्या बापाचा नाही!

आजकाल जो उठतो तो महाराष्ट्र बंद पाडण्याच्या वल्गना करतो आणि महाराष्ट्राचा कैवारी असल्याचे भासवतो. यात “मनसे प्रायव्हेट लिमिटेड” चे सर्वेसर्वा कार्टुनिस्ट राज ठाकरेंनी सर्वांवर कडी केली आहे. त्यांनी सरळ सरळ दंगली करण्याची धमकी दिलेली आहे. संजय निरुपम, अबू आझमी सारखे अडगळीत पडलेले लोक काहीतरी बडबडले आणि ह्यांनी दंगली करण्याची धमकीच देऊन टाकली.

शिवसेनेचेच संस्कार घेऊन मातोश्रीत वाढलेले आणि म्हातार्‍या काकांच्या पाठीत खंजीर खुपसून स्वत:चे नवीन राजकीय दुकान थाटलेले राज ठाकरे एखाद्या हुकुमशहाच्या थाटात विधाने करत आहेत. राज म्हणतात महाराष्ट्रात दंगली पेटतील, माणसांची कत्तल करून सत्तेचा मोक्ष मिळविण्याचा कानमंत्र त्यांनी गुजरात मध्ये मोदी यांच्याकडून घेतला आहे का? राज बेताल आणि बेफाम सुटले आहेत. दंगलीची भाषा राज ठाकरेंनी केलीच शिवाय माध्यमांनाही दम दिला.ज्या मातोश्रीच्या थाळीत खाल्ले त्या थाळीत परत एकदा थुंकायलाही त्यांनी कमी केले नाही. उद्धवनेच उत्तर भारतीय नेते मोठे केले असे त्यांनी म्हटलंय. राज ठाकरेंनी खुशाल मातोश्रीवर जाऊन उद्धवचे कपडे काढावेत.

राज ठाकरे यांची वटवट सहन करण्याएवढा महाराष्ट्र नामर्द आहे का? दंगलीची भाषा करणार्‍या राज ठाकरेना फटके देऊन सरकारने गजाआड करायला हवे. बाळासाहेब ठाकरे यांची वटवट महाराष्ट्राने ४० वर्ष सहन केली. इंदिरा गांधींनी हिसका दाखविल्यानंतर याच बाळासाहेबांनी इंदिराजींचे पाय धरून आणीबाणीचे निर्लज्जपणे समर्थन केले होते. तसा हिसका राजला दाखविण्याची हिम्मत बाबा, दादा आणि आबांच्या सरकारमध्ये आहे काय? निवडणुकीच्या तोंडावर सवंग प्रसिद्धीसाठी बेताल वक्तव्ये करायची निरुपम आणि ठाकरे यांच्यासारख्यांना सवयच आहे.

आणि ह्याच जागी जर अजित पवारांनी जर असे वक्तव्य केले असते तर सगळ्या भटी प्रसारमाध्यमांनी शेंडीला गाठ मारून देशभर बोंबाबोंब केली असती. आणि मराठा राजकारण, दादागिरी अशी विशेषणे लावली असती. आता हे गप्प का आहेत? राज ठाकरे सारखी माणसे शिवरायांचे नाव घेऊन अखिल भारतीय स्तरावर मराठयांची बदनामी करत आहेत. देशपातळीवरील भटांनी महाराष्ट्रातील माणूस म्हणजे तोडफोड करणारा, बाहेरच्यांना मारहाण करणारा अशी प्रतिमा रंगवली आहे. हे मराठयांना बदनाम करण्याचे नियोजित षडयंत्र आहे.

ह्यांना फक्त गरीब बहुजन कष्टकरी, सिंघ, यादव, पासवान अशा आडनावांच्या उत्तर भारतीयांचेच वावडे आहे. ह्यांना मिश्रा, शर्मा, पांडे ही भट मंडळी चालते. राजसाहेब प्रशासनातल्या ८०% जागा भटांनी बळकावल्या आहेत. जवळपास सगळे उच्च अधिकारी उत्तर भारतीय ब्राम्हण आहेत, त्यांच्या विरोधात कधी तुम्ही बोलणार आहात कि नाही? मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होत होता तेंव्हा तुम्ही कुठे होते? तिथला मराठी टक्का कमी होण्याचे कारण तुम्हाला माहित नाही काय? गिरण्या कुणी बंद पाडल्या? त्यांचा हक्काच्या जागा कुणी बळकावल्या हे माहित नाही काय?

हे सगळे सरकारच्या पाठींब्याने सुरु आहे असे वाटत आहे, शिवसेनेला संपवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मनसेला खतपाणी घालत असावेत. आबा, जशी तत्परता तुम्ही संभाजी ब्रिगेडच्या पोरांनी भांडारकरवर कारवाई केली म्हणून केसेस घालण्यात दाखवली तशी आता का नाही दाखवत? गेली २१ वर्षे मराठा समाजासाठी झटणार्‍या व मराठा सेवा संघ सारखी राष्ट्रीय स्तरावरील सामाजिक संघटना चालवणार्‍या पुरुषोत्तम खेडेकरांनी आपल्या समाजाचे नेते समाजाचं काम करत नाही या उद्वेगातून समाजाच्या नेत्यांना कचकावले तर लगेच त्यांच्यावर कारवाई करण्यास पळापळ केली.

पण शिवसेना, मनसे सारखे पक्ष रोज तोडफोडीची भाषा करतात तरी त्यांच्यावर कारवाई का होत नाही? ह्यांची पोरं स्टडीत आणि आमची कस्टडीत हे धंदे बंद झाले पाहिजे. मराठी वाढलीच पाहिजे पण त्यासोबत इतर भाषा पण शिकल्या पाहिजे. ग्लोबल झालं पाहिजे. आपले अनेक मराठा बांधव इतर राज्यात पण राहतात, त्यांचे तिथे चांगले व्यवसाय आहेत. हरियाना, बडोदा, इंदौर, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू इथे मराठा राहतात. जर त्यांना उद्या तिथल्या लोकांनी हाकलून लावले तर त्यात दोष कुणाचा?

ह्यांनी मराठा-बहुजन मुलांना अशा वादात अडकवून ठेवले आणि बाहेर राज्यातील व देशातील सगळ्या नोकर्‍या बळकावल्या. सगळ्या मराठा-बहुजनांनी अशा देशविघातक शक्तींच्या नादी न लागता आपली प्रगती साधावी. प्रगतीसाठी घर, तालुका, जिल्हा, राज्य, देश सोडण्याची तयारी ठेवा. ह्यातच आपले व आपल्या समाजाचे कल्याण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.