दलित आणि मुस्लिम समाज कमीअधिक प्रमाणात समदु:खी आहे. त्यांना सामाजिक, राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या वंचित ठेवले आहे. संविधानामुळे आशेचा किरण निर्माण झाला आहे. पण पुन्हा धर्मांधांच्या संविधान बदलाच्या भूमिकेमुळे चिंता वाढली आहे. मराठा सेवा संघाच्या स्थापनेला २०१५ मध्ये पंचवीस वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त अकोला येथे रौप्यमहोत्सवी महाअधिवेशन घेतले होते. शिक्षणसत्ता, माध्यमसत्ता, अर्थसत्ता राजसत्तेत मराठा, कुणबी समाज
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर नवीन प्रकाश टाकणारे शिवाजी कोण होता? हे कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तक PDF स्वरुपात खालील लिंकवरून डाउनलोड करा. लडेंगे! जितेंगे! कितना दम है गोली में तेरे, देखा है देखेंगे! कॉम्रेड गोविंद पानसरे लाल सलाम! For Ebook Click following link: शिवाजी कोण होता? ई-पुस्तक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीशेजारी असणाऱ्या चौथऱ्यावरील कुत्रा काढण्यासाठी, शिवप्रेमींचा अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे, तसेच कुत्र्याचे समर्थन करणारेदेखील काही लोक आहेत. कुत्रा हा शिवचरित्राचे उदात्तीकरण करणारी बाब आहे, की अवमान करणारी बाब आहे. हे आपण तटस्थपणे समजून घेणे गरजेचे आहे. आपल्या देशातील इतिहास हा अत्यंत पक्षपातीपणे आणि विकृतपणे लिहिला गेला आहे. कथा, कादंबऱ्या, चित्रपट, काव्य,
दहशतवाद अनेक नावांनी ओळखला जातो. परंतु आज भारत जेवढा अतिरेकी दहशवादाशी लढत आहे, तेवढाच सांस्कृतिक दहशतवादाशी झुंजतोय. याचे ताजे उदाहरण सांगायचे झाले तर रायगडावर नव्यानेच घडलेला प्रकार म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर असलेल्या वाघ्या (कुत्र्याचा) पुतळा हटविण्याचा. या घटनेमुळे पाहिजे तेवढ्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. हे कृत्य करणा-या संघटनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे ही दाखल करण्यात आले.
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळासमोर असलेला वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविल्यावरून व महाराष्ट्र शासनाने तो पुन्हा स्थापित केल्यावरून, नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यातच शासनाने संभाजी ब्रिगेडच्या कार्यकत्यांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३९५ अन्वये गुन्हा दाखल करून आपल्या कचखाऊ वृत्तीचा व निर्बद्धतेचा अतिरेक केला आहे. वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविण्याचे संभाजी ब्रिगेडचे कृत्य
रविवार दि. ४ डिसेंबर २०११ रोजीचा लोकमत पान ६ वरील फ्रेंच पत्रकार गोतीये यांचा “विभूती देव नव्हे देवाचे एक साधन” हा बचावात्मक लेख वाचला. लेखामध्ये गोतीये यांनी ते विचारवंत नसल्याचे लिहिले आहे. तसेच त्यांचा लेख वाचल्यावर ते विचारही करत नसावेत असे जाणवते. त्यांचा संपूर्ण लेख गोंधळलेला वाटतो. ते लेखाच्या सुरुवातीलाच सांगतात कि त्यांचे फाउंडेशन शिवाजी