‘बाबां’च्या मार्गावर मराठा समाजाची वाटचाल

दलित आणि मुस्लिम समाज कमीअधिक प्रमाणात समदु:खी आहे. त्यांना सामाजिक, राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या वंचित ठेवले आहे. संविधानामुळे आशेचा किरण निर्माण झाला आहे. पण पुन्हा धर्मांधांच्या संविधान बदलाच्या भूमिकेमुळे चिंता वाढली आहे. मराठा सेवा संघाच्या स्थापनेला २०१५ मध्ये पंचवीस वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त अकोला येथे रौप्यमहोत्सवी महाअधिवेशन घेतले होते. शिक्षणसत्ता, माध्यमसत्ता, अर्थसत्ता राजसत्तेत मराठा, कुणबी समाज कोठे आहे, यावर विकासाच्या अंगाने चर्चा करण्यात आली. पूर्वी शेती हा आर्थिक व्यवस्थेचा कणा होता. कुणबी, मराठा म्हणून ओळखला जाणारा बहुतांश समाज शेतीवर अवलंबून होता. एकर, दोन एकरापासून काही हजार एकरांपर्यंत हा समाज शेतीचा मालक होता.

परंतु ९० टक्क्यांपर्यंत अल्पभूधारक असलेला आणि ग्रामीण भागात राहणारा मराठा समाज निरक्षर, अल्पशिक्षित होता. सामाजिक अंगाने पाहिले तर मराठा समाज स्त्रियांबद्दल प्रतिगामी, कर्मठ परंपरावादी होता. कालबाह्य रूढी, प्रथा, परंपरेच्या जोखडात अडकलेल्या समाजाला यातून बाहेर काढण्यासाठी डाॅ. आंबेडकरांचा वैचारिक कृतिशील वारसा आपण पुढे न्यायचा, असा निर्णय त्या अधिवेशनात घेतला गेला. आज दलित समाजाने शिक्षणात नेत्रदीपक प्रगती केली आहे. त्यामुळे मराठा समाजाला नवे विचार आणि नवी दिशा द्यायची असेल, प्रगती करायची असेल तर डाॅ. आंबेडकरांप्रमाणे काम करावे लागेल हे त्या वेळी झालेल्या विचारमंथनातून पुढे आले आहे. आम्ही शिक्षणापासून सुरुवात करायचे ठरवले. त्यात बाबासाहेबांचे नाव सर्वात अग्रभागी आहे. सुरुवात तिथूनच केली.

सनातन्यांनी वा प्रतिगाम्यांनी समाजा-समाजात वितुष्ट निर्माण करताना स्वातंत्र्यानंतर मराठा दलित समाज एकत्र येऊ नये, यासाठी प्रयत्न केले. चित्रपट, नाटक, कथा, कादंबऱ्यांतून चुकीचा इतिहास रंगवला गेला. त्याचा पगडा समाजावर अजूनही काही प्रमाणात आहे. तो पूर्णपणे पुसून टाकायला काही वेळ जावा लागेल. शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती- जमातीतील लोकांना एकत्र केले. त्यांच्या सैन्यात सर्व जाती-जमातीचे आणि धर्माचे लोक होते. शिवाजी महाराजांनी मराठे महारांना एकत्र आणले. अजूनही हे प्रयत्न सुरूच आहेत. कारण मराठा दलित समाज एकत्र आला, तर या देशाचा चेहरामोहरा बदलेल, हा आशावाद त्यामागे आहे.

मराठा, ओबीसी आणि दलित समाजाच्या एकत्रीकरणाचे आमचे प्रयत्न सुरूच राहतील. त्याला रा. स्व. संघाप्रमाणेच दलित आणि मराठा समाजातील काही विकृत लोकांचाही विरोध आहे. कारण दलित समाजातील विकृतांना आंबेडकर, फक्त त्यांच्याच तिजोरीत हवे आहेत. तर मराठा समाजातील विकृतांना शिवाजी महाराज फक्त त्यांच्याच तिजोरीत हवे आहेत. आम्ही सांगू तेच आंबेडकर आणि आम्ही सांगू तेच शिवाजी महाराज, असा त्यांचा हट्ट आहे. पण या विरोधाला भीक घालता, आम्ही समाजाला आंबेडकर समजावून सांगू. कारण ते केवळ दलितांचेच नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे आहेत.

पुरुषोत्तम खेडेकर
संस्थापक अध्यक्ष, मराठा सेवा संघ

ठाकरेचं पोर.. महाहरामखोर…

शिवश्री प्रदीप इंगोले

महाराष्ट्राचे वाटोळे त्या दिवसापासून सुरु झाले, ज्या दिवशी प्रबोधनकार नावाच्या एका कायस्थाने त्याच्या ५० किलोच्या लेकराला उद्देशून आजपासून हा बाळ महाराष्ट्राला अर्पण म्हटले आणि शिवसेनेची स्थापना केली. त्यात फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्राच्या नशिबी अजून वाईट दिवस होते म्हणूनच कि काय त्याच बाळ ठाकरेचा पुतण्या राज ठाकरेने काही वर्षांनी स्वतःच्या पाठीमागे फक्त आपली शेपूट असताना आजपासून हा राज महाराष्ट्राला अर्पण म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली.

असा हा ठाकरे घराण्याचा अर्पण सोहळा महाराष्ट्राच्या नाट्य इतिहासाला पण लाजवणारा आणि बामनांना माजवणारा आहे. याचा प्रत्यय अधून मधून राज ठाकरे नावाचं विदुषकी पात्र अवघ्या महाराष्ट्राला देत असतं. गिरगाव चौपाटीवर झालेल्या कार्यक्रमातही राज ठाकरेने अशीच मुक्ताफळे उधळली, ती त्याच्या अकलेची कीव करावी अशी आहेत. राज ठाकरेने बाबासाहेबाचे स्मारक ज्या इंदू मिलच्या जागेवर उभारावी अशी सर्व महाराष्ट्राची मागणी आहे, ती इंदू मिलची जागा कशाला बिल्डींग बांधायला पाहिजे का? असा सवाल करून आपला आणि “कोहिनूर”वाल्या जोशी सरांचा फार घनिष्ट संबध आहे हे दाखवून दिले.

जेव्हा अरबी समुद्रात शिवरायांचे स्मारक बांधावे अशी मागणी सर्व शिवप्रेमी संघटनांनी केली त्यावेळेस पण राज ठाकरे नावाच्या ह्याच बांडगुळाने विकासाचा मुद्दा पुढे करून शिव-स्मारकाला विरोध केला आणि आज भीमरायाच्या होणाऱ्या स्मारकाला विरोध केला. ह्या कार्यक्रमात राज ठाकरेने बॉम्बेतील दंगली आणि देशातील बॉम्बस्फोट हे परप्रांतीयांमुळेच झाले असा जावई शोध लावला. उदया ह्यांच्या घरातील पाळणा जरी हलला तरी हे उपटसुंभ म्हणतील कि ह्यात नक्कीच परप्रांतीयांचा हात आहे एवढी परप्रांतीय द्वेषाची लागण यांना झाली आहे.

काही वर्षाखाली आपल्या काकाच्या सभेत काकाने लांड्या म्हणून मुस्लिमांना शिव्या दिल्यावर हिजड्या सारख्या टाळ्या वाजवणारा राज ठाकरे आज आपल्या पक्षाच्या झेंड्यात हिरवा रंग सामील करून मुस्लिमांचा उद्धारक होऊ पाहत आहे. हा दलाली करण्याचा प्रकार आहे हे माझ्या मुस्लीम बांधवांनी ओळखून घ्यावे आणि थोडी फार जरी अस्मिता असेल तर मनसे मधून राजीनामे द्यावेत तसेच भीम भक्तांनी पण ह्या राज ठाकरेच्या धोरणाचा विचार करावा. असीम त्रिवेदी नावाच्या एका माथेफिरूने संविधानावर मुतल्याचे चित्र आपल्या पुस्तकावर देऊन बाबासाहेबांचीच नव्हे तर समस्त देशाची बदनामी केली असताना, हा राज ठाकरे अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली त्याचे समर्थन करतो, मग म.फ.हुसेन ह्या जगप्रसिध्द चित्रकाराने हिंदू देवतांचे नग्न चित्र काढल्यावर त्याला भारत बंदी घाला असे सांगतो तेव्हा ह्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे झक मारते? कि मुस्लीम असल्यामुळे राज ठाकरे म.फ.हुसेन ला अभिव्यक्ती स्वातंत्र्य द्यायला तयार नाहीत हे त्यांनी स्पष्ट करावे. आणि मुस्लीम बांधवांनी पण ह्यांचा विचार करावा.

असीम त्रिवेदीला विरोध करणाऱ्या दलित बांधवाना राज ठाकरे धमकी देतो कि ह्यांना सरळ भाषा कळत नाही, ह्यांच्यात सृजनशीलता नाही, ह्यांना आमचीच खास शैली लागते. अरे बहाद्दरा आमच्यात जर सृजनशीलता नसती तर आज तुला बाबासाहेबांची बदनामी केली म्हणून मुंबईच्या रस्त्यावर नागडा करून मारला असता. पण शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारधारा आम्ही जगतो म्हणून तू सुखरूप आहेस लक्षात ठेव आणि तुझ्याच भाषेत सांगायचे झाले तर संयम पाळतो म्हणून गांडूची अवलाद समजू नको. तुला जे काही राजकारण करायचे आहे ते कर पण आमच्या शिवराय आणि भिमारायांना दुखावण्याचं महत्पाप ह्या पुढे तरी करू नकोस एवढीच अपेक्षा करतो..

जय जिजाऊ..  जय शिवराय..

शिवरायांचा मावळा आहे मी!

तसं पाहायला गेलं तर,
जरा निराळा आहे मी!
लिहिण्या घेतली लेखणी,
परतण्या इतका दुबळा नाही मी!
बाबासाहेबांचे विचार जपणारा,
शिवरायांचा मावळा आहे मी!

सह्याद्रीत हर हर महादेवचा,
घुमलेला नाद आहे मी!
फुलेंच्या पोवाड्यातील,
डफावरची थाप आहे मी!
राजे पोहोचता पन्हाळगडा,
त्याच पायाची धूळ आहे मी!

अशाच दोन ओळींचा कवी आहे मी,
शंभूराजांच्या रक्ताचा एक थेंब आहे मी!
शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर,
विचारांचा पाईक आहे मी!
फक्त आणि फक्त शिवरायांचा भक्त आहे मी!

-गणेश अटकळे