ठाकरेचं पोर.. महाहरामखोर…

शिवश्री प्रदीप इंगोले

महाराष्ट्राचे वाटोळे त्या दिवसापासून सुरु झाले, ज्या दिवशी प्रबोधनकार नावाच्या एका कायस्थाने त्याच्या ५० किलोच्या लेकराला उद्देशून आजपासून हा बाळ महाराष्ट्राला अर्पण म्हटले आणि शिवसेनेची स्थापना केली. त्यात फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्राच्या नशिबी अजून वाईट दिवस होते म्हणूनच कि काय त्याच बाळ ठाकरेचा पुतण्या राज ठाकरेने काही वर्षांनी स्वतःच्या पाठीमागे फक्त आपली शेपूट असताना आजपासून हा राज महाराष्ट्राला अर्पण म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली.

असा हा ठाकरे घराण्याचा अर्पण सोहळा महाराष्ट्राच्या नाट्य इतिहासाला पण लाजवणारा आणि बामनांना माजवणारा आहे. याचा प्रत्यय अधून मधून राज ठाकरे नावाचं विदुषकी पात्र अवघ्या महाराष्ट्राला देत असतं. गिरगाव चौपाटीवर झालेल्या कार्यक्रमातही राज ठाकरेने अशीच मुक्ताफळे उधळली, ती त्याच्या अकलेची कीव करावी अशी आहेत. राज ठाकरेने बाबासाहेबाचे स्मारक ज्या इंदू मिलच्या जागेवर उभारावी अशी सर्व महाराष्ट्राची मागणी आहे, ती इंदू मिलची जागा कशाला बिल्डींग बांधायला पाहिजे का? असा सवाल करून आपला आणि “कोहिनूर”वाल्या जोशी सरांचा फार घनिष्ट संबध आहे हे दाखवून दिले.

जेव्हा अरबी समुद्रात शिवरायांचे स्मारक बांधावे अशी मागणी सर्व शिवप्रेमी संघटनांनी केली त्यावेळेस पण राज ठाकरे नावाच्या ह्याच बांडगुळाने विकासाचा मुद्दा पुढे करून शिव-स्मारकाला विरोध केला आणि आज भीमरायाच्या होणाऱ्या स्मारकाला विरोध केला. ह्या कार्यक्रमात राज ठाकरेने बॉम्बेतील दंगली आणि देशातील बॉम्बस्फोट हे परप्रांतीयांमुळेच झाले असा जावई शोध लावला. उद्या ह्यांच्या घरातील पाळणा जरी हलला तरी हे उपटसुंभ म्हणतील कि ह्यात नक्कीच परप्रांतीयांचा हात आहे एवढी परप्रांतीय द्वेषाची लागण यांना झाली आहे.

काही वर्षाखाली आपल्या काकाच्या सभेत काकाने लांड्या म्हणून मुस्लिमांना शिव्या दिल्यावर हिजड्या सारख्या टाळ्या वाजवणारा राज ठाकरे आज आपल्या पक्षाच्या झेंड्यात हिरवा रंग सामील करून मुस्लिमांचा उद्धारक होऊ पाहत आहे. हा दलाली करण्याचा प्रकार आहे हे माझ्या मुस्लीम बांधवांनी ओळखून घ्यावे आणि थोडी फार जरी अस्मिता असेल तर मनसे मधून राजीनामे द्यावेत तसेच भीम भक्तांनी पण ह्या राज ठाकरेच्या धोरणाचा विचार करावा. असीम त्रिवेदी नावाच्या एका माथेफिरूने संविधानावर मुतल्याचे चित्र आपल्या पुस्तकावर देऊन बाबासाहेबांचीच नव्हे तर समस्त देशाची बदनामी केली असताना, हा राज ठाकरे अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली त्याचे समर्थन करतो, मग म.फ.हुसेन ह्या जगप्रसिध्द चित्रकाराने हिंदू देवतांचे नग्न चित्र काढल्यावर त्याला भारत बंदी घाला असे सांगतो तेव्हा ह्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे झक मारते? कि मुस्लीम असल्यामुळे राज ठाकरे म.फ.हुसेन ला अभिव्यक्ती स्वातंत्र्य द्यायला तयार नाहीत हे त्यांनी स्पष्ट करावे. आणि मुस्लीम बांधवांनी पण ह्यांचा विचार करावा.

असीम त्रिवेदीला विरोध करणाऱ्या दलित बांधवाना राज ठाकरे धमकी देतो कि ह्यांना सरळ भाषा कळत नाही, ह्यांच्यात सृजनशीलता नाही, ह्यांना आमचीच खास शैली लागते. अरे बहाद्दरा आमच्यात जर सृजनशीलता नसती तर आज तुला बाबासाहेबांची बदनामी केली म्हणून मुंबईच्या रस्त्यावर नागडा करून मारला असता. पण शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारधारा आम्ही जगतो म्हणून तू सुखरूप आहेस लक्षात ठेव आणि तुझ्याच भाषेत सांगायचे झाले तर संयम पाळतो म्हणून गांडूची अवलाद समजू नको. तुला जे काही राजकारण करायचे आहे ते कर पण आमच्या शिवराय आणि भिमरायांना दुखावण्याचं महत्पाप ह्या पुढे तरी करू नकोस एवढीच अपेक्षा करतो..

जय जिजाऊ..  जय शिवराय..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.