Purushottam Khedekar on Reservation

Maratha Seva Sangh founder president Purushottam Khedekar expresses his views on conceptions and misconceptions about reservation in India in a lecture series at Pune.

मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी आरक्षण – समज गैरसमज व्याख्यानमाला, पुणे येथे केलेले व्याख्यान.

‘बाबां’च्या मार्गावर मराठा समाजाची वाटचाल

दलित आणि मुस्लिम समाज कमीअधिक प्रमाणात समदु:खी आहे. त्यांना सामाजिक, राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या वंचित ठेवले आहे. संविधानामुळे आशेचा किरण निर्माण झाला आहे. पण पुन्हा धर्मांधांच्या संविधान बदलाच्या भूमिकेमुळे चिंता वाढली आहे. मराठा सेवा संघाच्या स्थापनेला २०१५ मध्ये पंचवीस वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त अकोला येथे रौप्यमहोत्सवी महाअधिवेशन घेतले होते. शिक्षणसत्ता, माध्यमसत्ता, अर्थसत्ता राजसत्तेत मराठा, कुणबी समाज कोठे आहे, यावर विकासाच्या अंगाने चर्चा करण्यात आली. पूर्वी शेती हा आर्थिक व्यवस्थेचा कणा होता. कुणबी, मराठा म्हणून ओळखला जाणारा बहुतांश समाज शेतीवर अवलंबून होता. एकर, दोन एकरापासून काही हजार एकरांपर्यंत हा समाज शेतीचा मालक होता.

परंतु ९० टक्क्यांपर्यंत अल्पभूधारक असलेला आणि ग्रामीण भागात राहणारा मराठा समाज निरक्षर, अल्पशिक्षित होता. सामाजिक अंगाने पाहिले तर मराठा समाज स्त्रियांबद्दल प्रतिगामी, कर्मठ परंपरावादी होता. कालबाह्य रूढी, प्रथा, परंपरेच्या जोखडात अडकलेल्या समाजाला यातून बाहेर काढण्यासाठी डाॅ. आंबेडकरांचा वैचारिक कृतिशील वारसा आपण पुढे न्यायचा, असा निर्णय त्या अधिवेशनात घेतला गेला. आज दलित समाजाने शिक्षणात नेत्रदीपक प्रगती केली आहे. त्यामुळे मराठा समाजाला नवे विचार आणि नवी दिशा द्यायची असेल, प्रगती करायची असेल तर डाॅ. आंबेडकरांप्रमाणे काम करावे लागेल हे त्या वेळी झालेल्या विचारमंथनातून पुढे आले आहे. आम्ही शिक्षणापासून सुरुवात करायचे ठरवले. त्यात बाबासाहेबांचे नाव सर्वात अग्रभागी आहे. सुरुवात तिथूनच केली.

सनातन्यांनी वा प्रतिगाम्यांनी समाजा-समाजात वितुष्ट निर्माण करताना स्वातंत्र्यानंतर मराठा दलित समाज एकत्र येऊ नये, यासाठी प्रयत्न केले. चित्रपट, नाटक, कथा, कादंबऱ्यांतून चुकीचा इतिहास रंगवला गेला. त्याचा पगडा समाजावर अजूनही काही प्रमाणात आहे. तो पूर्णपणे पुसून टाकायला काही वेळ जावा लागेल. शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती- जमातीतील लोकांना एकत्र केले. त्यांच्या सैन्यात सर्व जाती-जमातीचे आणि धर्माचे लोक होते. शिवाजी महाराजांनी मराठे महारांना एकत्र आणले. अजूनही हे प्रयत्न सुरूच आहेत. कारण मराठा दलित समाज एकत्र आला, तर या देशाचा चेहरामोहरा बदलेल, हा आशावाद त्यामागे आहे.

मराठा, ओबीसी आणि दलित समाजाच्या एकत्रीकरणाचे आमचे प्रयत्न सुरूच राहतील. त्याला रा. स्व. संघाप्रमाणेच दलित आणि मराठा समाजातील काही विकृत लोकांचाही विरोध आहे. कारण दलित समाजातील विकृतांना आंबेडकर, फक्त त्यांच्याच तिजोरीत हवे आहेत. तर मराठा समाजातील विकृतांना शिवाजी महाराज फक्त त्यांच्याच तिजोरीत हवे आहेत. आम्ही सांगू तेच आंबेडकर आणि आम्ही सांगू तेच शिवाजी महाराज, असा त्यांचा हट्ट आहे. पण या विरोधाला भीक घालता, आम्ही समाजाला आंबेडकर समजावून सांगू. कारण ते केवळ दलितांचेच नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे आहेत.

पुरुषोत्तम खेडेकर
संस्थापक अध्यक्ष, मराठा सेवा संघ

आव्हान… धर्मसत्तेला अन् राजसत्तेला!

दरवर्षी १२ जानेवारीला मराठा सेवा संघातर्फे सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला जातो. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम खेडेकर हे शिवधर्मपीठावरून मार्गदर्शन करतात, यावर्षीच्या मार्गदर्शनाचा दैनिक लोकमतचे पत्रकार राजेश शेगोकार यांनी घेतलेला वेध.

Purushottam Khedekar: Challenge to Religious and Political Powers

जिजाऊ जन्मोत्सव २०१६

दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा, राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव यावर्षीही मोठ्या थाटामाटात साजरा झाला. यावर्षीचा जन्मोत्सव गर्दीचा उच्चांक मोडणारा आणि नवयुवकांचा सहभाग दाखवणारा ठरला. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचे स्थानिक वृत्तपत्रांमधील वार्तांकन.

 

मराठा तितुका मेळवावा आणि शेतकरी वाचवावा!

मराठा सेवा संघ हि एक शक्तिशाली सामाजिक संघटना आहे. दिल्लीच्या पातशाहीला हादरे देण्याचा मराठेशाहीचा गौरवशाली इतिहास आहे. बहुजनांच्या हितासाठी दिल्लीला जागे करण्याची ताकत आज या संघटनेमध्ये आहे; परंतु हि ताकत कुठे आणि केंव्हा वापरावी याचे नियोजन फार महत्वाचे आहे.

मराठा सेवा संघाच्या रौप्यमहोत्सवी अधिवेशनाच्या निमित्ताने विजय लोडम यांनी केलेले मराठा सेवा संघाच्या कार्याचे विश्लेषण.

Unite Marathas and Save Farmers

नामांतर : सांस्कृतीकरण कि राजकारण

भारतातील विविध नामांतराच्या मागण्यांचा वेध घेणारा आणि विश्लेषण करणारा मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांचा दैनिक देशोन्नती या लोकप्रिय दैनिकातील लेख. नामांतर : सांस्कृतीकरण कि राजकारण.

 

Namantar - Sanskritikaran ki Rajkaran - Part 1 - Deshonnati

Namantar - Sanskritikaran ki Rajkaran - Part 2 - Deshonnati

Pradeep Solunke on Maratha Community

Prominent Speaker Pradeep Solunke speaks on Maratha community, importance of Maratha Seva Sangh, problems of farmers and social problems in India.

ख्यातनाम वक्ते प्रदीप सोळुंके यांचे मराठा समाज, शेतकऱ्यांच्या समस्या, सामाजिक समस्या व मराठा सेवा संघाचे महत्व यावरील मत.

Professor K.R. Gawade on Maratha Reservation

Professor K.R. Gawade delivering a lecture on problems and solutions about Maratha reservation. A must watch to understand the truth and facts about Reservation.

प्राध्यापक के.आर. गावडे यांचे मराठा आरक्षण – समस्या व उपाय यावरील व्याख्यान. आरक्षणाबाबतीत सत्य व तथ्य जाणून घेण्यासाठी अवश्य बघा.

विकृतीभूषण

झालेत बहू होतील बहू
यासम बेशरम दुसरा नाही
बिलंदरीही लाजली जनहो
विकृतीभूषणाच्या सन्मानाने!

शाहिरी न रचता शाहीर झाला
जिजाऊ बदनामीपायी देह झिजविला
दहशतवादीही पडलेत फिके
विकृतीभूषणाच्या सन्मानाने!

शिवइतिहासाच्या ब्राम्हणीकरणातून
उध्वस्त केली भारतीय बंधुता
मानवी बॉम्बही शहारले जगी
विकृतीभूषणाच्या सन्मानाने!

काय साधले? साधणार आहेत!
विकृतीभूषणाच्या सन्मानाने!
तरुणाईचे तारुण्य करपले
विकृतीभूषणाच्या सन्मानाने!

महाराष्ट्राची अस्मिता काळवंडली आज
विकृतीभूषणाच्या सन्मानाने!
उपाय शिवजनहो एकच आता
उजळूया महाराष्ट्र लोकभूषणाने….

-पुरुषोत्तम खेडेकर
जिजाऊनगर (पुणे)

महान धर्मनिरपेक्ष राजा छत्रपति शिवाजी जयंती उत्सव २०१५

कल महाराष्ट्रमें लोकप्रिय राजा छत्रपति शिवाजी जयंती उत्सव बड़े पैमाने पर मनाया गया. मनुवादी संघटनों की शिवाजी को हिन्दू राजा दिखाने की कड़ी कोशिश के बावजूद शिवाजी का धर्मनिरपेक्ष चेहरा मराठा सेवा संघ तथा संभाजी ब्रिगेड इन संघटनाओंने सामने लाया है, २० सालके जनप्रबोधन का असर अब दिखने लगा है. इस साल महाराष्ट्र के कई हिस्सोमे मुस्लिम समुदायने छत्रपति शिवाजी जयंती मनाई, इसमें मराठा सेवा संघ स्थापित छत्रपति शिवाजी मुस्लिम ब्रिगेड इस संघटन का बड़ा योगदान रहा.

गौरतलब बात यह है की छत्रपति शिवाजी का नाम लेकर राजनीती करने वाली शिवसेना इस बातसे बौखला गई है और उन्होंने अपने आकाओंके कहने पर इसमें विघ्न डालने की कोशिश शुरू कर दी है. मुस्लिम विरोध ही शिवसेना के राजनीती का मुख्य आधार रहा है, और जनप्रबोधन से घबरा कर अब वे जयंती कार्यक्रम में विघ्न डालने की कोशिश में लग गए है.

मराठा सेवा संघ के संस्थापक अध्यक्ष एड.पुरुषोत्तम खेडेकर इनके कड़े प्रयासोंके कारन महाराष्ट्र में यह सफल हुआ है, मराठा महाराष्ट्र का सबसे बड़ा जाती समूह है और इनमे प्रबोधन बढ़ने की वजह से अब महाराष्ट्र के जिन इलाको में मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड कार्यरत है उन इलाको में धार्मिक दंगे बंद हो गए है और सांप्रदायिक ताकतों का कड़ा मुकाबला करने वाली युवा पीढ़ी तैयार हुई है. इन प्रयासोंको अब जल्द ही राष्ट्रिय स्तर पर लाया जाएगा.