दादोजी कोंडदेव ठेचला हो!!
दादोजीचा पुतळा हटवण्यासाठी २००६ पासून अविरत परिश्रम घेणारे मा. दिपक भाऊ मानकर, अरविंद शिंदे यांचे शिव-अभिनंदन! तसेच पुणे मनपा प्रशासन, सर्व नगरसेवक, संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, आणि शिवरायांच्या कार्यावर निष्ठा असणारे असंख्य पुरोगामी मावळे यांचे शतशः आभार!
आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासाच्या भाळी जो पक्षपाती लेखनाचा कलंक लागला होता तो दादोजी हटल्याने पुसून निघाला आहे. दादोजी हे शिवरायांचे गुरु होते हे ब्राम्हण इतिहासकारांनी आतापर्यंत आमच्या डोक्यात ठसवले होते. आणि त्याला कुठलाही पुरावा नव्हता. पण जेम्स लेनने दादोजी गुरु करण्यामागची जी विकृत मानसिकता होती ती उघडकीस आणली आणि आम्ही जेंव्हा स्वतः इतिहास तपासला तेंव्हा दादोजी गुरु नसल्याचे उघड झाले. मग आतापर्यंत ह्या तथाकथित इतिहासकारांनी आमच्यावर चुकीचा इतिहास का थोपला? ह्याला एकच उत्तर आहे वर्चस्ववाद! जगात जे काही चांगले असेल ते आमचे, आणि वाईट असेल ते दुसर्यांचे हि अवसानघातकी प्रवृत्ती! तुम्ही कितीही मोठे झालात तरी ब्राम्हण गुरु असल्याशिवाय तुम्ही तसे घडूच शकला नसता हा माज. पण हा माज आता उतरवण्याची वेळ आली आहे.
ह्या निर्णयाच्या विरोधात सेना, भाजप, आणि मनसे यांनी आवाज उठवला आहे, यातूनच त्यांचे बेगडी शिवप्रेम दिसून आले. ठाकरे बंधूंना शिवराय आपली खाजगी मालमत्ता असल्याचा भास व्हायला लागला आहे. ज्यांनी आपल्या निष्ठा एखाद्या विष्ठेगत ब्राम्हणांच्या पायावर टाकल्या आहेत त्यांनी अशी आंदोलने करणे हास्यास्पद आहे. ज्या बहुलकरला शिवसैनिकांनी जेम्स लेनला मदत केली म्हणून काळे फासले होते त्याची राज ठाकरे यांनी माफी मागितली होती. शिवसैनिकांचे शिवप्रेम अस्सल आहे यात शंका नाही, पण ज्या घरातल्या तीन पिढया शिवरायांच्या नावावर जगल्या त्यांचे खरे स्वरूप जनतेला कळाले आहे! अहो ठाकरे, कमीत कमी प्रबोधनकारांची पुस्तके तरी तुम्ही वाचावी. आणि आमच्या तीन पिढयांच्या रक्तावर तुमच्या सेना उभ्या आहेत याचे भान ठेवा!


काल स्टार माझा वरती तो बोबडा भरतकुमार राऊत म्हणतो, शिवरायांना आम्ही सेंटर स्टेजला आणले. तुम्ही? अरे तुमची लायकी काय, तुम्ही शिवरायांना सेंटर स्टेजला आणणार? आणि ह्यांनी यातून हे सिद्ध केले आहे कि यांना यांच्या बापापेक्षा दादोजी जवळचा वाटतो. जेंव्हा लेनने पुस्तक लिहिले तेंव्हा क्षुल्लक गोष्टीवरून महाराष्ट्र पेटवनार्या सगळ्या सेना घरात का बसल्या होत्या? तेंव्हा कुणाची निष्ठा (कि विष्ठा?) तुम्हाला गप्प करत होती? लेनला मदत करणार्यांचा साधा निषेध तरी तुम्ही केलात का? राज ठाकरे म्हणतात इतिहास जातीच्या चष्म्यातून बघणार का? अरे तुम्हाला इतिहास कशाशी खातात हे माहित आहे का? जरा तुमच्या आजोबांनी काय लिहिलंय ते वाचा.
आणि सगळ्या प्रसारमाध्यमांनी आपली जानवी जपत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ला टार्गेट करायला सुरुवात केली आहे. पण लक्षात ठेवा तुम्ही या प्रकरणाला कितीही राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातील जनता त्याला भुलणार नाही. काँग्रेस ने काय पापे केली आहेत याचा हिशेब जनता त्यांच्याकडून घेईलच. पण त्याला राजकीय वळण देऊ नका. आणि सर्व प्रसारमाध्यमांनी परत एकदा मराठा समाजाला धोपटायला सुरुवात केली आहे आणि इतर बहुजनांना वेगळे करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. पण आम्ही तो प्रयत्न हाणून पाडू. त्यामुळे तुम्ही कितीही आदळआपट केली तरी इतिहास बदलणार नाही. आणि शेवटी सत्याचाच विजय होणार!