आजकाल जो उठतो तो महाराष्ट्र बंद पाडण्याच्या वल्गना करतो आणि महाराष्ट्राचा कैवारी असल्याचे भासवतो. यात “मनसे प्रायव्हेट लिमिटेड” चे सर्वेसर्वा कार्टुनिस्ट राज ठाकरेंनी सर्वांवर कडी केली आहे. त्यांनी सरळ सरळ दंगली करण्याची धमकी दिलेली आहे. संजय निरुपम, अबू आझमी सारखे अडगळीत पडलेले लोक काहीतरी बडबडले आणि ह्यांनी दंगली करण्याची धमकीच देऊन टाकली. शिवसेनेचेच संस्कार घेऊन
लोकप्रभाच्या दि. ५ ऑगस्टच्या अंकात ‘फॅसिस्ट शक्तीमुळे बहुजनांचे विभाजन’ हा हरि नरके यांचा लेख वाचला. लेख वाचल्यानंतर लक्षात आलं की, एखादी व्यक्ती, एखादा विचार किंवा एखादी चळवळ बदनाम करण्यासाठी कोणतं तंत्र वापरावं, तर ते हरि नरके यांनी शोधलेलं आणि या लेखात वापरलेलं तंत्र होय. संपूर्ण लेखात ते पुरुषोत्तम खेडेकर, त्यांच्या मराठा सेवा संघ आणि संभाजी
सध्या जिकडे तिकडे अण्णा हजारे यांच्या उपोषणाची चर्चा सुरु आहे. अण्णा दुसरे गांधी असल्याचा प्रचार प्रसारमाध्यमे करतायत. अण्णा हजारे हे राळेगण सिद्धी या “गावचे” समाजसेवक, गांधींच्या मार्गावर चालणारे अशी त्यांची ख्याती आहे. सध्या २६-११ नंतर मेणबत्त्या मिरवणारे अण्णांसाठी सुद्धा मेणबत्त्या परजून रस्त्यावर आलेले आहेत. अण्णांची प्रमुख मागणी आहे लोकपाल विधेयक. जे भ्रष्टाचाराविरुद्ध थेट कारवाई साठी
शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला, करोडो विश्वे दारिद्रय असलेल्या अर्धवट भिंती व छत असलेल्या खुराड्यात झाला असे हे अण्णाभाऊ गरिबीचं निरक्षर पोर! गावाच्या शाळेत नाव घालण्यासाठी व दुसर्या दिवशी पहिल्याच प्रहरी बामन शिक्षकाकडून अपमानित होण्यापुरता अण्णाभाऊंचा शाळा व शिक्षणाशी संबंध. तांत्रिक दृष्टया
इतिहासाचे राजकारण भाग -१ व भाग-२ या मथळयांखाली लोकमतच्या दि. ९ व १६ जानेवारी रोजी प्रकाशित झालेल्या अग्रलेखांवर मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया आणि अत्यंत परखड भाषेत केलेलं सांप्रतच्या स्थितीचे विवेचन… (दै.लोकमत, ३० जानेवारी) भारत भूमीत गेल्या पाच हजार वर्षांपासून सुरू असलेल्या सांस्कृतिक व धार्मिक वादांचे यात विवेचन केल्याचे भासवण्यात
नक्षलवाद्यांना सुधारण्याऐवजी यंत्रणाच सुधारा! मारोती उईके यांचा दि. २६ एप्रिल २००९च्या दै.देशोन्नती मधील लेख. नक्षलवादाचे वास्तव. गरीब आणि आदिवासींच्या प्रश्नांसाठी नक्षलवादी लढतात. तसा नक्षलवाद्यांचा दावा आहे. आपण हा दावा कितपत मानायचा हा आपला प्रश्न आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या या दाव्याचे समर्थन करणे योग्य ठरणार नाही असे वाटते. नक्षलवाद्यांनी आपल्या प्रश्नांची तड लावण्यासाठी हिंसेचा वापर केला. पण
प्रबोधनकार ठाकरे लिखित प्रचलित हिंदू धर्म (?) आणि त्यातील परंपरांचे अतिशय कठोर विच्छेदन करणारे जहाल व क्रांतिकारी पुस्तक. स्वतःला हिंदू समजणार्या प्रत्येकाने अवश्य वाचावे असे पुस्तक… पुढील लिंकवरून डाउनलोड करा: देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे