भारतासारखे क्रिकेटवेड मी युरोप-अमेरिकेत प्रवास करतानाही पाहिले नाही. क्रिकेटचे माहेरघर असलेल्या लंडन शहरातही ‘गल्ली-बोळात’ कुठेही क्रिकेट दिसले नाही. साधारणपणे १६ व्या शतकात इंग्लंडमध्ये क्रिकेटची सुरवात झाली. इ.स. १७८७ साली मेरिलीबोन क्रिकेट क्लबची (एम.सी.सी.ची) स्थापना झाली. जगात जिथे जिथे ब्रिटिशांच्या वसाहती स्थापन झाल्यात, तिथे तिथे ब्रिटिश सैनिक आणि अधिकारी क्रिकेट खेळू लागले. ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेल्या इंग्रजांनी