Tag: राजमाता जिजाऊ जन्मोत्सव

जिजाऊ जन्मोत्सव २०१४

मराठा सेवा संघातर्फे आयोजित केला जाणारा आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्मोत्सव सोहळा यावर्षीही थाटामाटात साजरा झाला. लाखो मराठा-बहुजनांच्या उपस्थितीत  पार पडला. जगाच्या कानाकोपर्‍यातून जिजाऊ भक्तांनी हजेरी लावली होती. त्याचे स्थानिक वर्तमानपत्रातील वार्तांकन. कार्यक्रमातील ठळक बातम्या: १. गैरमराठा मुख्यमंत्री झाल्याशिवाय मराठ्यांचा विकास नाही – पुरुषोत्तम खेडेकर २. जिजाऊ सृष्टीची उपेक्षा बंद करा अन्यथा रस्त्यावर उतरेन – युवराज संभाजीराजे

जिजाऊ जन्मोत्सव २०१३

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राजमाता जिजाऊ जन्मोत्सव थाटामाटात साजरा झाला. जगभरातील जिजाऊ भक्तांनी मोठया संख्येने मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे हजेरी लावली. मराठा सेवा संघाच्या वतीने मोठया प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे विविध वृत्तपत्रामधील वार्तांकन.  

जिजाऊ जन्मोत्सव २०१२

मराठा सेवा संघाच्या वतीने साजरा होणारा राजमाता जिजाऊ जन्मोत्सव यावर्षीही थाटामाटात साजरा झाला. देशाच्या तसेच जगाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या जिजाऊ भक्तांनी सिंदखेड राजा परिसर फुलून गेला होता. यावर्षी उच्चांकी २०० पुस्तक स्टॉल्सची नोंदणी झाली होती. जिजाई प्रकाशन तसेच अनेक पुरोगामी प्रकाशनांनी हजेरी लावली होती. त्याचा दै.देशोन्नती, दै.लोकमत व दै.सकाळ या प्रमुख वृत्तपत्रांमधील वृत्तांत.  

जिजाऊ जन्मोत्सव २०११

राजमाता जिजाऊ जन्मोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही थाटामाटात साजरा झाला. मराठा सेवा संघाच्या वतीने गेली वीस वर्षे हा उत्सव मातृतीर्थ सिंदखेडराजा (जिल्हा-बुलडाणा) येथे मोठया प्रमाणावर साजरा केला जातो. लाखो जिजाऊ भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. त्याचे स्थानिक वृत्तपत्रांमधील वार्तांकन.