दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरणी इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचा दै.देशोन्नतीच्या स्पंदन पुरवणीतील लेख. (दै.देशोन्नती, ३० जानेवारी २०११). छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य राजगडावर असताना मुघल सरदार शायिस्तेखानाने पुण्यावर ७ स्वारी केली. लाल महाल ताब्यात घेतला. तेथे वास्तव्य केले, त्यावेळेस पाऊण लाख फौज लाल महालाभोवती होती. मुंगीला देखील आत येता येणार नाही, अशी व्यवस्था खानाने केली होती.