भूमातेची आराधना – डॉ.अशोक राणा

आला पह्यला पाऊस | शिपडली भुई सारी धरत्रीचा परमय | माझं मन गेलं भरी ! पहिल्या पावसाने जमिनीचा कणन् कण ओला झाला. त्यामुळे दरवळलेला मृदगंध मनात काठोकाठ भरून गेला. भूमिकन्या बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या खानदेशी बोलीतून व्यक्त केलेल्या या उत्कट भावना साऱ्या भूमिपुत्रांच्या मनातील स्पंदनांना मुखरित करतात. पावसाच्या धारा म्हणजे त्यांच्यासाठी नवजीवनच. नांगरणी, वखरणी झाल्यावर … Continue reading: भूमातेची आराधना – डॉ.अशोक राणा

गणपती देवता: उगम व विकास – डॉ.अशोक राणा

मंगलकार्याच्या आरंभी गणपतीला वंदन करण्याची प्रथा आपल्या देशात वर्षानुवर्षे चालू आहे. अगदी ऋग्वेदातील ऋचांपासून तो तमाशातील गण-गौळणींच्या नमनापर्यंतचे सारे संदर्भ गणपतीच्या अग्रस्थानाला मान्यता देणारे आहेत. आजही एखाद्या नव्या कामाची सुरूवात करायची झाल्यास गणेशाचे वंदन पहिल्यांदा केले जाते. त्यामुळेच तर कार्याच्या आरंभाला ‘श्रीगणेशा ‘ असे म्हटले जाते. यावरून अग्रपूजेचा मान मिळालेल्या गणपतीला आपल्या जीवनात महत्वाचे स्थान … Continue reading: गणपती देवता: उगम व विकास – डॉ.अशोक राणा

शोध हनुमानाचा – डॉ. अशोक राणा

आमच्या अमरावतीच्या घरासमोर काळ्या मारुतीचे मंदिर आहे. माझ्या पत्त्यामध्ये त्याचा पूर्वी उल्लेख असायचा. त्यामुळे काळा मारुती हा काय प्रकार आहे,असे भेटणारे लोक उत्सुकतेने विचारीत असत. मग मंदिराच्या पुजाऱ्याने दिलेली माहिती उत्तरादाखल आम्ही त्यांना सांगत असू. बहुतेक ठिकाणी शेंदूर माखलेला मारुती असतो. लाल-नारिंगी रंगाचा मारुती सर्व परिचित आहे. त्याच्याविषयी स्पष्टीकरण दिले जाते,की जन्मतःच आकाशातील लालबुंद सूर्य … Continue reading: शोध हनुमानाचा – डॉ. अशोक राणा