नामांतर : सांस्कृतीकरण कि राजकारण

भारतातील विविध नामांतराच्या मागण्यांचा वेध घेणारा आणि विश्लेषण करणारा मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांचा दैनिक देशोन्नती या लोकप्रिय दैनिकातील लेख. नामांतर : सांस्कृतीकरण कि राजकारण.

 

Namantar - Sanskritikaran ki Rajkaran - Part 1 - Deshonnati

Namantar - Sanskritikaran ki Rajkaran - Part 2 - Deshonnati

विकृतीभूषण

झालेत बहू होतील बहू
यासम बेशरम दुसरा नाही
बिलंदरीही लाजली जनहो
विकृतीभूषणाच्या सन्मानाने!

शाहिरी न रचता शाहीर झाला
जिजाऊ बदनामीपायी देह झिजविला
दहशतवादीही पडलेत फिके
विकृतीभूषणाच्या सन्मानाने!

शिवइतिहासाच्या ब्राम्हणीकरणातून
उध्वस्त केली भारतीय बंधुता
मानवी बॉम्बही शहारले जगी
विकृतीभूषणाच्या सन्मानाने!

काय साधले? साधणार आहेत!
विकृतीभूषणाच्या सन्मानाने!
तरुणाईचे तारुण्य करपले
विकृतीभूषणाच्या सन्मानाने!

महाराष्ट्राची अस्मिता काळवंडली आज
विकृतीभूषणाच्या सन्मानाने!
उपाय शिवजनहो एकच आता
उजळूया महाराष्ट्र लोकभूषणाने….

-पुरुषोत्तम खेडेकर
जिजाऊनगर (पुणे)

आंबेडकरांच्या बदनामी मागेही पुण्यातील ब्राम्हण!

एनसीईआरटीच्या अकरावीच्या पुस्तकात डॉ. आंबेडकरांचा अवमान करणारे कार्टून घुसडवून बदनामीचा विकृत आनंद लुटणाराही पुण्यातला ब्राम्हणच निघाला. डॉ. सुहास पळशीकर असे त्याचे नाव. तो पुणे विद्यापीठात विभाग प्रमुख आहे. संतप्त भीमसैनिक शनिवारी त्याच्या केबिनमध्ये घुसले. मोडतोड केली. पण अशाने काहीही होणार नाही. डॉ. पळशीकरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांना अटक होऊन, जामीन मिळणार नाही, अशी कलमे लागली पाहिजेत. असे झाले तरच अशा घटनांना पायबंद बसेल. व्यंगचित्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा हा प्रकार जगातील पहिलाच असावा, असे दिसते.

येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, पुण्यातील ब्राम्हण हीच एक विकृती आहे. ब्राम्हणेतरांच्या यच्चयावत सर्व महापुरुषांची बदनामी करण्यात या लोकांना विकृत आनंद मिळतो. छत्रपती शिवराय आणि माँसाहेब जिजाऊंच्या बदनामीचे केंद्र पुण्यात, ब्राह्मण वसाहतींत होते. डॉ. आंबेडकरांच्या बदनामीचे केंद्रही येथेच आहे. ब्राम्हणेतर महापुरुषांच्या बदनामीसाठी पाठ्यपुस्तकांचा आधार घेण्यापर्यंत या विकृतांची मजल गेली आहे.

डॉ. सुहास पळशीकर एनएसीईआरटीचे सल्लागार होते. त्यांच्या जोडीला होते, डॉ. योगेंद्र यादव. हेच यादव अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सक्रिय होते. अण्णांचे आणि आरएसएसचे संबंध असल्याचे अलिकडील आंदोलनाने स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारे आंबेडकरांच्या बदनामीचे धागेदोरे सर्व बाजूंनी ब्राह्मणांनाच जाऊन भिडतात.

केंद्र सरकारच्या एनसीईआरटी अभ्यासक्रमातील राज्यशास्त्राच्या “इंडियन कॉन्स्टिट्यूशन अ‍ॅट वर्क” या पुस्तकात घटनेच्या निर्मितीप्रक्रियेसंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ५० वर्षापुर्वीचे व्यंगचित्र छापले आहे. त्यावरून शुक्रवारी संसदेत गदारोळ झाल्यानंतर हे पुस्तक मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर एनसीईआरटीचे सल्लागार असलेल्या योगेंद्र यादव आणि डॉ. सुहास पळशीकर यांनी पदाचा राजीनामा दिला.

पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख असलेल्या डॉ. सुहास पळशीकर यांच्या कार्यालयावर भीमसैनिकांनी हल्लाबोल केला. या हल्ल्यात पळशीकर यांच्या कार्यालयाचे तोडफोड करण्यात आली. यावेळी पळशीकर कार्यालयात नसल्याने त्यांना कोणतीही इजा पोहचलेली नाही. व्यंगचित्राच्या मुद्द्यावर भीमसैनिकांनी पळशीकर यांची भेट मागितल्यानंतर त्यांनी त्यांना चर्चेसाठी बोलावले होते. तीन कार्यकर्त्यांशी झालेल्या चर्चेनंतरही त्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी हा हल्ला केला असल्याचे बोलले जात आहे.

डॉ. आंबेडकरांच्या बदनामीचे षडयंत्र उघडकीस आल्यानंतरही डॉ. पळशीकरांचा टारगटपणा कमी झालेला नाही. या पुस्तकातील आशय अतिशय चांगला आहे, असे निर्लज्ज उद्गार डॉ. पळशीकर यांनी काढले. महाराष्ट्र टाईम्सने त्यांची प्रतिक्रिया प्रसिद्ध केली आहे. त्यात डॉ. पळशीकर म्हणतात : “हे पुस्तक २००६ पासून शिकवले जात असून, त्यातील आशय चांगला असल्याची प्रतिक्रिया अभ्यासक आणि शिक्षणतज्ज्ञांनी यापूर्वी दिलेली आहे. आधीच्या पुस्तकांमधील निरस मजकुराऐवजी संवाद साधणारा आणि सचित्र मजकूर या पुस्तकात आहे. गांधीजी, डॉ.आंबेडकर आणि पंडित नेहरू या तत्कालीन प्रसिद्ध व्यक्तींची त्यावेळी काढल्या गेलेल्या अभिजात व्यंगचित्रांचा समावेश करण्यात आला आहे. आंबेडकर यांच्यावरील व्यंगचित्र वापरतानाही हाच दृष्टिकोन होता. आंबेडकरांचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नाही. घटना तयार करण्याची प्रक्रिया कशी आहे याचा तपशील याच पुस्तकात देण्यात आला आहे. आंबेडकरांची भूमिकाही नंतरच्या पुस्तकात देण्यात आली आहे. राज्यशास्त्रातील ख्यातनाम तज्ज्ञांची मान्यता घेऊनच हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले आहे.”

या पुस्तकाला ख्यातनाम तज्ज्ञांची मान्यता होती, असे डॉ. पळशीकर सांगतात. याचाच अर्थ या बदनामीच्या कटात आणखी अनेक जण सहभागी आहेत. हे इतर लोक कोण आहेत, याच शोध घेण्यासाठी डॉ. पळशीकरांची चौकशी होणे आवश्यक आहे. या कथित तज्ज्ञांनाही अटक व्हायला हवी.

अलिकडे काही दलित विद्वानांना ब्राह्मणांचा भारीच पुळका आलेला आहे. दलितांवरील भूतकाळातील अन्यायाला ब्राह्मणांना जबाबदार धरण्यात येऊ नये, असे या लोकांचे म्हणणे आहे. कार्टून प्रकरणाने अशा विद्वानांच्या डोळ्यांत झणझणीत अंजनच घातले आहे.

-अनिता पाटील

संस्कृत हटवा, मराठी वाचवा…

-महावीर सांगलीकर

मराठी भाषेला खरा धोका इंग्लिश किंवा हिंदी भाषेपासून नाही, तर संस्कृत भाषेपासून आहे हे हरेक मराठी माणसाने ध्यानात ठेवले पाहिजे. आज मराठीच्या प्रेमाचे ढोंग करणार्‍यांच्या ओठात जरी मराठीविषयी जिव्हाळा दिसत असला तरी त्यांच्या पोटात मराठीविषयी नाही, तर संस्कृत भाषेविषयी जिव्हाळा आहे. भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषेचे संस्कृतीकरण करणे हे त्यांचे मुख्य ध्येय आहे. आपण त्यांचा हा मनसुबा उधळून लावला पाहिजे. त्यासाठी सगळ्यात अगोदर त्यांनी मराठीत घुसवलेले संस्कृत शब्द आपण वापरण्याचे जाणून-बुजून बंद करायला पाहिजेत.

संस्कृत ही भाषा मूळ नाही हे संस्कृतवाद्यांना माहीत असते, पण बहुजनांच्या मराठी, हिंदी वगैरे भाषांना दुय्यम ठरवण्यासाठी ते लोक नेहमी संस्कृत भाषेचे महात्म्य उगळत बसलेले असतात, संस्कृत ही भाषा इतर सगळ्या भाषांची जननी असल्याचे सांगत रहातात. या खोटारडेपणाला बळी पडून बहुजन समाजाच्या मनात आपल्या भाषेविषयी न्यूनगंड तयार होतो. हे टाळायचे असेल तर आपणास संस्कृतचे स्तोम उधळून लावले पाहिजे. त्यासाठी आपणास ‘संस्कृत हटवा, मराठी वाचवा’ ही मोहीम राबवली पाहिजे. या मोहीमेचा पहिला भाग म्हणजे आपण मराठी भाषेतून संस्कृत शब्दांची हकालपट्टी केली पाहिजे.

मनुवाद्यांच्या मनात संस्कृत भाषेबद्दल न्यूनगंड तयार करणे हे बहुजनांचे धोरण असले पाहिजे. मनुवाद्यांचा जीव संस्कृत भाषा आणि वेद यांच्यात आहे. या दोन्ही गोष्टींचे महात्म्य संपवले की मनुवाद्यांचा सांस्कृतिक आणि धार्मिक दहशतवाद संपलाच म्हणून समजा.

संस्कृत शब्द कसे ओळखावेत?

मूळात संस्कृत भाषा ही आमचेच अनेक शब्द उचलून, त्यावर संस्कार करून तयार झाली आहे. त्यामूळे कोणते शब्द आपले आहेत आणि कोणते शब्द संस्कृत आहे हे ओळखणे तसे जरा अवघड आहे, पण पुढील बाबी ध्यानात ठेवल्या तर संस्कृत शब्द ओळखणे फारच सोपे आहे.

१. ज्या शब्दात क्ष, ज्ञ, ष, ऋ, ङ, ञ ही अक्षरे आहेत ते सगळे शब्द संस्कृत आहेत, कारण ही अक्षरे आपल्या मूळ मराठी भाषेत नाहीत तर ती संस्कृत भाषेतून मराठीत आली आहेत.

२. ज्या शब्दात ’र’युक्त जोडाक्षर असते असे सगळे शब्द जास्तकरून संस्कृत भाषेतून मराठीत आले आहेत. ही जोडाक्षरे ‘पोटफोड्या’ र (जसे प्र, क्र, ब्र, त्र, द्र वगैरे), रफार (अर्क, तर्क वगैरे), कृ, गृ, वगैरे

३. इंग्लिश भाषेतील शब्दांना बदली शब्द म्हणून संस्कृत शब्द तयार हा संस्कृतवाद्यांचा आवडता उद्योग असतो. जसे भ्रमणध्वनी, संगणक वगैरे.

मराठी भाषेतील संस्कृत शब्द हाकलण्याची पहिली व सगळ्यात सोपी पायरी म्हणजे वरील भ्रमणध्वनी, संगणक यासारखे बनावट संस्कृत शब्द वापरण्याचे बंद करणे. आपण टेबलला टेबल म्हणतो, सायकलला सायकल म्हणतो, तसेच कॉंम्प्यूटरला कॉंम्प्यूटर आणि मोबाईल फोनला मोबाईल फोनच म्हणावे. उगीच संगणक, भ्रमणध्वनी असले फालतू संस्कृत शब्द वापरू नयेत.

दुसरे म्हणजे मराठी भाषेत रूळलेले हिंदी, कन्नड, अरबी, फारसी, इंग्लिश वगैरे भाषेतील शब्द नेहमीच वापरावेत. संस्कृतवादी लोक आपल्याला या भाषांचा द्वेष करायला शिकवतात. पण आपण हे ध्यानात घ्यायला पाहिजे की या भाषांनी आपल्यावर कधीही अन्याय केला नाही. या भाषा शिकायला आपल्याला कधीही बंदी नव्हती व नाही. याउलट संस्कृत भाषा ही आपल्यावर अन्याय करण्यासाठीच तयार करण्यात आली होती. त्यामुळे संस्कृत भाषेबद्दल आपुलकी बाळगायचे आपल्याला कांहीच कारण नाही. याउलट संस्कृतचे उरले-सुरले महात्म्य संपवण्यात आपले बरेच फायदे आहेत.

पुण्यात नवा जेम्स लेन वावरतोय…

रविवार दि. ४ डिसेंबर २०११ रोजीचा लोकमत पान ६ वरील फ्रेंच पत्रकार गोतीये यांचा “विभूती देव नव्हे देवाचे एक साधन” हा बचावात्मक लेख वाचला. लेखामध्ये गोतीये यांनी ते विचारवंत नसल्याचे लिहिले आहे. तसेच त्यांचा लेख वाचल्यावर ते विचारही करत नसावेत असे जाणवते. त्यांचा संपूर्ण लेख गोंधळलेला वाटतो.

ते लेखाच्या सुरुवातीलाच सांगतात कि त्यांचे फाउंडेशन शिवाजी महाराजांसाठी नव्हे तर “भवानी-भारतीसाठी” समर्पित आहे. भारतीय इतिहासासाठी ते वास्तूसंग्रहालय उभारत आहेत. “पुरातन काळापासून भारतीयांनी देश हा स्त्रीशक्तीला समर्पित केल्याचे कौतुक वाटते” असे ही ते लेखाच्या मध्यात लिहितात. लेखाच्या शेवटी त्यांनी भारताला पर्यायी शब्द म्हणून “भवानी-भारती, इंडिया” असे शब्द सुचवले आहेत. गोतीयेंच्या वरील तिन्ही मुद्यांवरून असे जाणवते की त्यांना “भवानी-भारती” या पुरातन स्त्री देवतांना केंद्रस्थानी ठेऊन वस्तुसंग्रहालय बनवायचे आहे. तसेच श्री गोतीये हे पुरातन काळातील “भवानी-भारती” या देवतांचा धागा शाक्तधर्मीय शिवरायांपर्यंत आणून ठेवतात. आई भवानी बद्दल सर्व महाराष्ट्रीय तसेच भारतीय जनतेला आपुलकी आणि आदर आहे. भवानी मातेचे महत्व असाधारण आहे. पण गोतीये भवानी मातेचे नाव घेत भारती या वैदिक देवतेचे महत्व वाढवू पाहत आहेत असे दिसते. तसेच भवानी या देवतेचा वैदिक संस्कृतीशी काहीही संबंध नसताना भवानीचे वैदिकीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे.

पुढे जाऊन ते असंबंधपणे आर्य आक्रमक हे परकीय की भारतीय या मुद्याला हात घालतात. ख्रिश्चन मिशनरी आणि मार्क्सवादी इतिहासकारांना दोष देत जाणीवपूर्वक विषयांतर करतात. हे जाणीवपुर्वकचे विषयांतर त्यांच्या प्रेरणा कोण हे दर्शवत आहे. गोतीये “आम्हाला शिवाजी महाराजांना आधुनिक भारताचे राष्ट्रीय हिरो करायचे आहे” असे म्हणत विविध सात भाषा जाणणार्‍या शिवाजी महाराजांना मराठी-अमराठी प्रादेशिक मुद्यामध्ये अडकवू इच्छितात. त्यासाठी अमराठी मिर्झा राजेंना शिवरायांचा शत्रू म्हणून सांगायला विसरत नाहीत. स्वतः फ्रेंच असूनही मराठीचा अभिमान असल्याचे सांगतात. संग्रहालयाची भाषाही मराठी आहे असे लिहितात. अमेरिकेसारखे बलाढय देश आज शिवरायांच्या गनिमी काव्याच्या युद्ध तंत्राचा वापर आणि अभ्यास त्यांच्या लष्करात करत आहेत. अशा जागतिक हिरोला गोतीये मराठी आणि हिंदू धर्म या संकुचित मुद्यांमध्ये अडकवत आहेत. वरून त्यांना राष्ट्रीय हिरो करण्याचा खोटा दिखावा करत आहेत.

पुढे गोतीये “शिवराय हे निधर्मी होते तरीही ते समर्पित हिंदू होते” असे हास्यास्पद विधान करतात. जर शिवराय निधर्मी म्हणजे धर्माला न मानणारे असे होते तर पुन्हा ते कोणा एका धर्माचे समर्पित अनुयायी कसे होतील? गोतीये शिवाजी महाराजांना “देव नव्हे तर देवाचे एक साधन” मानतात त्यासाठी ते विभूती हा शब्द वापरतात. त्यासाठी अरबिंदो बोस यांनी नेपोलियनला विभूती म्हटल्याचा असंबंध दाखलाही देतात. नेपोलीयनला कोणी विभूती, देव अथवा भूत जरी म्हणाले तरी त्याचा शिवरायांना विभूती ठरवण्याशी काय संबंध? अमावस्येच्या अंधार्‍या रात्रीचा आधार घेत मुहूर्त न पाहता लढाया जिंकणारे शिवराय हे अंधश्रद्धेला भिक घालणारे नव्हते. कोणालाही विभूती मानने ही एक अंधश्रद्धा आहे. तसेच ते त्या व्यक्तीचे कर्तृत्व नाकारणारे आहे. त्यांना विभूती म्हणणे त्यांच्या क्रांतीकारक विचारांचा अवमान करणे आहे.

सर्वात गंभीर, संवेदनशील आणि संतापजनक मुद्दा म्हणजे गोतीये लिहितात कि “मी फ्रेंच असून… शिवाजी कोणत्या जातीचे होते? त्यांचे गुरु कोण होते? त्यांचे वडील कोण होते? हे मुद्दे माझ्यासाठी गौण आहेत..” या गोतीये महाशयांना शिवराय मराठी असल्याचा अभिमान आहे. ते निधर्मी असूनही यांना ते समर्पित हिंदू वाटतात. शिवरायांचे मराठीपण आणि हिंदू असणे यांना गौण वाटत नाही. पण त्यांची जात कोणती? त्यांचे गुरु कोण? व वडील कोण? हे गौण वाटते! एक वेळ जात आणि गुरूचा मुद्दा सोडूनही द्या पण वडील कोण? हा प्रश्न निर्माण करायची गोतीयेची हिंमत तरी कशी होते? हा प्रश्न होऊच कसा शकतो? शिवरायांच्या जयंती पासून मृत्यूपर्यंत अनेक मुद्दे संवेदनशील झाले असताना. कसलीही वैचारिकता नसणार्‍या, असंबंध, विस्कळीत,गोंधळलेले लिखाण करणार्‍या, शिवचरित्राबाबत काडीचेही गांभीर्य नसणार्‍या गोतीयेला वस्तुसंग्रहालय उभारू देऊ नये.

गोतीयेलाच काय पण भारतात कोठेही शिवरायांबाबत अथवा कोणाही महामानवांबाबत काहीही लोकाभिमुख (प्रचारक) कलाकृती, साहित्य निर्माण होत असेल तर त्यात जाणकारांचा सहभाग असला पाहिजे नाहीतर लोक भावना दुखावल्या जाऊ शकतात. त्यातून संघर्ष आणि अशांतता निर्माण होऊ शकते. मुळात एक सामान्य पत्रकार असणार्‍या गोतीयेकडे १०० कोटी आलेच कोठून? त्यांच्या पाठीशी कोण कोण आहेत? याची चौकशी व्हावी. जेम्स लेनमुळे शिवप्रेमींच्या मनावर झालेली जखम अजून खपली धरत नसताना हा नवा लेन महाराष्ट्रात पुन्हा निर्माण होऊ नये याची महाराष्ट्र सरकारने वेळीच दखल घ्यावी.

-अविनाश जाधव

महाराष्ट्र राज ठाकरेंच्या बापाचा नाही!

आजकाल जो उठतो तो महाराष्ट्र बंद पाडण्याच्या वल्गना करतो आणि महाराष्ट्राचा कैवारी असल्याचे भासवतो. यात “मनसे प्रायव्हेट लिमिटेड” चे सर्वेसर्वा कार्टुनिस्ट राज ठाकरेंनी सर्वांवर कडी केली आहे. त्यांनी सरळ सरळ दंगली करण्याची धमकी दिलेली आहे. संजय निरुपम, अबू आझमी सारख्या अडगळीत पडलेले लोक काहीतरी बडबडले आणि ह्यांनी दंगली करण्याची धमकीच देऊन टाकली.

शिवसेनेचेच संस्कार घेऊन मातोश्रीत वाढलेले आणि म्हातार्‍या काकांच्या पाठीत खंजीर खुपसून स्वत:चे नवीन राजकीय दुकान थाटलेले राज ठाकरे एखाद्या हुकुमशहाच्या थाटात विधाने करत आहेत. राज म्हणतात महाराष्ट्रात दंगली पेटतील, माणसांची कत्तल करून सत्तेचा मोक्ष मिळविण्याचा कानमंत्र त्यांनी गुजरात मध्ये मोदी यांच्याकडून घेतला आहे का? राज बेताल आणि बेफाम सुटले आहेत.

दंगलीची भाषा राज ठाकरेंनी केलीच शिवाय माध्यमांनाही दम दिला.ज्या मातोश्रीच्या थाळीत खाल्ले त्या थाळीत परत एकदा थुंकायलाही त्यांनी कमी केले नाही. उद्धवनेच उत्तर भारतीय नेते मोठे केले असे त्यांनी म्हटलंय. राज ठाकरेंनी खुशाल मातोश्रीवर जाऊन उद्धवचे कपडे काढावेत.

राज ठाकरे यांची वटवट सहन करण्याएवढा महाराष्ट्र नामर्द आहे का? दंगलीची भाषा करणार्‍या राज ठाकरेना फटके देऊन सरकारने गजाआड करायला हवे. बाळासाहेब ठाकरे यांची वटवट महाराष्ट्राने ४० वर्ष सहन केली. इंदिरा गांधींनी हिसका दाखविल्यानंतर याच बाळासाहेबांनी इंदिराजींचे पाय धरून आणीबाणीचे निर्लज्जपणे समर्थन केले होते. तसा हिसका राजला दाखविण्याची हिम्मत बाबा, दादा आणि आबांच्या सरकारमध्ये आहे काय? निवडणुकीच्या तोंडावर सवंग प्रसिद्धीसाठी बेताल वक्तव्ये करायची निरुपम आणि ठाकरे यांच्यासारख्यांना सवयच आहे.

आणि ह्याच जागी जर अजित पवारांनी जर असे वक्तव्य केले असते तर सगळ्या भटी प्रसारमाध्यमांनी शेंडीला गाठ मारून देशभर बोंबाबोंब केली असती. आणि मराठा राजकारण, दादागिरी अशी विशेषणे लावली असती. आता हे गप्प का आहेत? राज ठाकरे सारखी माणसे शिवरायांचे नाव घेऊन अखिल भारतीय स्तरावर मराठयांची बदनामी करत आहेत. देशपातळीवरील भटांनी महाराष्ट्रातील माणूस म्हणजे तोडफोड करणारा, बाहेरच्यांना मारहाण करणारा अशी प्रतिमा रंगवली आहे. हे मराठयांना बदनाम करण्याचे नियोजित षडयंत्र आहे.

आणि ह्यांना फक्त गरीब बहुजन कष्टकरी, सिंघ, यादव, पासवान अशा आडनावांच्या उत्तर भारतीयांचेच वावडे आहे. ह्यांना मिश्रा, शर्मा, पांडे ही भट मंडळी चालते. राजसाहेब प्रशासनातल्या ८०% जागा भटांनी बळकावल्या आहेत. जवळपास सगळे उच्च अधिकारी उत्तर भारतीय ब्राम्हण आहेत, त्यांच्या विरोधात कधी तुम्ही बोलणार आहात कि नाही? मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होत होता तेंव्हा तुम्ही कुठे होते? तिथला मराठी टक्का कमी होण्याचे कारण तुम्हाला माहित नाही काय? गिरण्या कुणी बंद पाडल्या? त्यांचा हक्काच्या जागा कुणी बळकावल्या हे माहित नाही काय?

आणि हे सगळे सरकारच्या पाठींब्याने सुरु आहे असे वाटत आहे, शिवसेनेला संपवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मनसेला खतपाणी घालत असावेत. आबा, जशी तत्परता तुम्ही संभाजी ब्रिगेडच्या पोरांनी भांडारकरवर कारवाई केली म्हणून केसेस घालण्यात दाखवली तशी आता का नाही दाखवत? गेली २१ वर्षे मराठा समाजासाठी झटणार्‍या व मराठा सेवा संघ सारखी राष्ट्रीय स्तरावरील सामाजिक संघटना चालवणार्‍या पुरुषोत्तम खेडेकरांनी आपल्या समाजाचे नेते समाजाचं काम करत नाही या उद्वेगातून समाजाच्या नेत्यांना कचकावले तर लगेच त्यांच्यावर कारवाई करण्यास पळापळ केली.

पण शिवसेना, मनसे सारखे पक्ष रोज तोडफोडीची भाषा करतात तरी त्यांच्यावर कारवाई का होत नाही? ह्यांची पोरं स्टडीत आणि आमची कस्टडीत हे धंदे बंद झाले पाहिजे. मराठी वाढलीच पाहिजे पण त्यासोबत इतर भाषा पण शिकल्या पाहिजे. ग्लोबल झालं पाहिजे. आपले अनेक मराठा बांधव इतर राज्यात पण राहतात, त्यांचे तिथे चांगले व्यवसाय आहेत. हरियाना, बडोदा, इंदौर, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू इथे मराठा राहतात. जर त्यांना उद्या तिथल्या लोकांनी हाकलून लावले तर त्यात दोष कुणाचा?

ह्यांनी आपल्या मुलांना अशा वादात अडकवून ठेवले आणि बाहेर राज्यातील व देशातील सगळ्या नोकर्‍या बळकावल्या. सगळ्या मराठा-बहुजनांनी अशा देशविघातक शक्तींच्या नादी न लागता आपली प्रगती साधावी. प्रगतीसाठी घर, तालुका, जिल्हा, राज्य, देश सोडण्याची तयारी ठेवा. ह्यातच आपले व आपल्या समाजाचे कल्याण आहे.

सांस्कृतिक दहशतवाद मुक्तीदिन…

सांस्कृतिक दहशतवाद मुक्तीदिनाच्या हार्दिक शिवेच्छा!

आज ५ जानेवारी, आजच्या दिवशी २००४ सालात संभाजी ब्रिगेडच्या बहाद्दर ७२ मावळ्यांनी भांडारकर संस्थेवर कारवाई केली होती, आणि ब्राम्हणशाहीला हादरा दिला होता.

त्या सर्व मावळ्यांचे अनंत उपकार आमच्यावर सदैव राहतील.

Freddom from cultural terrorism day 5th January

संभाजी ब्रिगेडचे बहाद्दर बहात्तर मावळे

ShivPratap

सांस्कृतिक दहशतवाद असाच संपवावा लागतो…

छत्रपती शिवाजी राजांचा शिवसंदेश आचरणात आणून त्यांनी बहुजन समाजाला स्वाभिमान काय असतो ते दाखवून दिले आहे. अधिक माहितीसाठी पुढील ब्लॉग बघा:

*संभाजी ब्रिगेड विचारपीठ*

हे कसले शिवप्रेम?

काल दादोजीचा पुतळा हटवला म्हणून शिवसेना आणि भाजप च्या गुंडांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयावर हल्ला केला. यांना शिवाजी महाराजांविषयी असणारे प्रेम बेगडी आहे हे त्यांनी शिवराय आणि जिजाऊ यांच्या प्रतिमा पायदळी तुडवून सिद्ध केले आहे. ह्या अफजलखानाच्या अनौरस औलादींनी जेम्स लेनने पुस्तक लिहिले तेंव्हा मुग गिळून गप्प राहणे पसंत केले. पण एका सामान्य चाकरासाठी तोही ब्राम्हण आहे म्हणून यांनी आदळआपट करणे सुरु केले आहे.

Sambhaji Brigade Office Attacked

यांना खरेच इतके शिवप्रेम आहे तर यांनी जेम्स लेनच्या विरोधात का आवाज उठवला नाही? दादोजी साठी पेटवापेटवी करायची तयारी आहे, तीही एका पुतळ्यासाठी! पण जेंव्हा साक्षात शिवरायांच्या मातेची बदनामी झाली तेंव्हा हे शूरवीर कुठे लपले होते? ह्याच औरंगजेबाच्या बिजांनी आम्हाला जेम्स लेनचा विचाराने प्रतिवाद करायचा सांगितला होता. त्याची विकृती ह्यांना विचार वाटते. आणि दादोजी सख्ख्या बापापेक्षा प्रिय वाटतो. आता हा संघर्ष रक्तरंजित झाल्यास त्यास सर्वस्वी ब्राम्हणच जबाबदार राहतील.

भटांनो कितीही भुंका, समाज आता भिणार नाही!
रक्त सांडले तरी, संभाजी ब्रिगेड मागे हटणार नाही!!
रक्तारक्तात भिनलंय काय? जय जिजाऊ! जय शिवराय!!

अखेर दादू हटवलाच!

ब्राम्हणी इतिहासाचा पाया खचला हो!
दादोजी कोंडदेव ठेचला हो!!

दादोजीचा पुतळा हटवण्यासाठी २००६ पासून अविरत परिश्रम घेणारे मा. दिपक भाऊ मानकर, अरविंद शिंदे यांचे शिव-अभिनंदन! तसेच पुणे मनपा प्रशासन, सर्व नगरसेवक, संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, आणि शिवरायांच्या कार्यावर निष्ठा असणारे असंख्य पुरोगामी मावळे यांचे शतशः आभार!

आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासाच्या भाळी जो पक्षपाती लेखनाचा कलंक लागला होता तो दादोजी हटल्याने पुसून निघाला आहे. दादोजी हे शिवरायांचे गुरु होते हे ब्राम्हण इतिहासकारांनी आतापर्यंत आमच्या डोक्यात ठसवले होते. आणि त्याला कुठलाही पुरावा नव्हता. पण जेम्स लेनने दादोजी गुरु करण्यामागची जी विकृत मानसिकता होती ती उघडकीस आणली आणि आम्ही जेंव्हा स्वतः इतिहास तपासला तेंव्हा दादोजी गुरु नसल्याचे उघड झाले. मग आतापर्यंत ह्या तथाकथित इतिहासकारांनी आमच्यावर चुकीचा इतिहास का थोपला? ह्याला एकच उत्तर आहे वर्चस्ववाद! जगात जे काही चांगले असेल ते आमचे, आणि वाईट असेल ते दुसर्‍यांचे हि अवसानघातकी प्रवृत्ती! तुम्ही कितीही मोठे झालात तरी ब्राम्हण गुरु असल्याशिवाय तुम्ही तसे घडूच शकला नसता हा माज. पण हा माज आता उतरवण्याची वेळ आली आहे.

ह्या निर्णयाच्या विरोधात सेना, भाजप, आणि मनसे यांनी आवाज उठवला आहे, यातूनच त्यांचे बेगडी शिवप्रेम दिसून आले. ठाकरे बंधूंना शिवराय आपली खाजगी मालमत्ता असल्याचा भास व्हायला लागला आहे. ज्यांनी आपल्या निष्ठा एखाद्या विष्ठेगत ब्राम्हणांच्या पायावर टाकल्या आहेत त्यांनी अशी आंदोलने करणे हास्यास्पद आहे. ज्या बहुलकरला शिवसैनिकांनी जेम्स लेनला मदत केली म्हणून काळे फासले होते त्याची राज ठाकरे यांनी माफी मागितली होती. शिवसैनिकांचे शिवप्रेम अस्सल आहे यात शंका नाही, पण ज्या घरातल्या तीन पिढया शिवरायांच्या नावावर जगल्या त्यांचे खरे स्वरूप जनतेला कळाले आहे! अहो ठाकरे, कमीत कमी प्रबोधनकारांची पुस्तके तरी तुम्ही वाचावी. आणि आमच्या तीन पिढयांच्या रक्तावर तुमच्या सेना उभ्या आहेत याचे भान ठेवा!

Bahulkar Blackened By Shivsainik

शिवसैनिकांनी शिवद्रोही बहुलकरला काळे फासले...

Raj Thakre Apologizing Bahulkar

राज ठाकरे यांनी शिवद्रोही बहुलकरची माफी मागितली...

 
 
 
 
 
 
 
 
 
काल स्टार माझा वरती तो बोबडा भरतकुमार राऊत म्हणतो, शिवरायांना आम्ही सेंटर स्टेजला आणले. तुम्ही? अरे तुमची लायकी काय, तुम्ही शिवरायांना सेंटर स्टेजला आणणार? आणि ह्यांनी यातून हे सिद्ध केले आहे कि यांना यांच्या बापापेक्षा दादोजी जवळचा वाटतो. जेंव्हा लेनने पुस्तक लिहिले तेंव्हा क्षुल्लक गोष्टीवरून महाराष्ट्र पेटवनार्‍या सगळ्या सेना घरात का बसल्या होत्या? तेंव्हा कुणाची निष्ठा (कि विष्ठा?) तुम्हाला गप्प करत होती? लेनला मदत करणार्‍यांचा साधा निषेध तरी तुम्ही केलात का? राज ठाकरे म्हणतात इतिहास जातीच्या चष्म्यातून बघणार का? अरे तुम्हाला इतिहास कशाशी खातात हे माहित आहे का? जरा तुमच्या आजोबांनी काय लिहिलंय ते वाचा.

आणि सगळ्या प्रसारमाध्यमांनी आपली जानवी जपत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ला टार्गेट करायला सुरुवात केली आहे. पण लक्षात ठेवा तुम्ही या प्रकरणाला कितीही राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातील जनता त्याला भुलणार नाही. काँग्रेस ने काय पापे केली आहेत याचा हिशेब जनता त्यांच्याकडून घेईलच. पण त्याला राजकीय वळण देऊ नका. आणि सर्व प्रसारमाध्यमांनी परत एकदा मराठा समाजाला धोपटायला सुरुवात केली आहे आणि इतर बहुजनांना वेगळे करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. पण आम्ही तो प्रयत्न हाणून पाडू. त्यामुळे तुम्ही कितीही आदळआपट केली तरी इतिहास बदलणार नाही. आणि शेवटी सत्याचाच विजय होणार!

तिसर्‍या शक्तीचा उदय!

दि २४ ऑक्टोंबरचा संभाजी ब्रिगेड चा संघर्ष मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला, त्याचे दै.मूलनिवासी नायक मधील वार्तांकन…

Sambhaji Brigade

Sambhaji Brigade

 

शिवरायांच्या बदनामीचे मुस्लिमांनाही दुःख आहे पण भटांना नाही!

Sambhaji Brigade

अधिक माहितीसाठी बघा:

1. दै.मूलनिवासी नायक

2. दादोजी कोंडदेव