जेम्स लेन म्हणतो, “भांडारकर संस्था हे भारतातील माझे ज्ञानप्राप्तीचे घर आहे. संस्थेचे ग्रंथपाल वा.ल.मंजुळ यांनी त्याला शिवचरित्र लिहायला सांगितले.” संस्थेचे मानद सचिव श्रीकांत बहुलकर हे जेम्स लेनच्या “द एपिक ऑफ शिवाजी” या पुस्तकाचे सहलेखक आहेत. १४ जानेवारी २००४ रोजी जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदी घातलेली असताना सुध्दा जुन २००३ ते ६ मे २००७ पर्यंतच्या काळात भांडारकरच्या
भारतातील तमाम मराठा-बहुजन महापुरुषांना सोडून केवळ ब्राम्हणांना जातीच्या आधारावर भारतरत्न देण्याच्या सरकारच्या कृतीवर संभाजी ब्रिगेडचे अकोला जिल्हा प्रवक्ता शिवश्री अमोल मिटकरी यांनी ओढलेला असूड! माफ करा महापुरुषांनो आम्हाला! तुम्ही इतिहासातच बरे वाटता! तुमचे नाव घ्यायला स्टेजवर टाळ्या मिळाव्यात, म्हणून आम्हाला तेवढयापुरता अभिमान वाटतो. भगतसिंग, शिवाजी महाराज, संभाजीराजे वा…. वा…अंगात क्षणभर वांझोटा उत्साह संचारतो. फुले,शाहू, आंबेडकर
‘विषमता व शोषण’ ईश्वरनिर्मित धर्म आहे. त्याचे अचूक पालन कसे करावे, याबाबत विविध धर्माज्ञांचा संच प्राचीन काळात मनुस्मृती होता. मनुस्मृती नावाचा वैदिक धर्मियांचा कायद्यांचा धर्मग्रंथ होता. जगभरातील अभ्यासकांनी त्यावर भाष्य केलेले आहे. पुढच्या काळात मनुस्मृतीचे नागरी व गुन्हेगारी कायदे सरसकट हिंदू धर्मियांनाही लागू झाले. २६ जानेवारी १९५० रोजी भारताने राज्यघटनेचा स्वीकार केला. त्या दिवसापासून मनुस्मृतीचा
दहशतवाद अनेक नावांनी ओळखला जातो. परंतु आज भारत जेवढा अतिरेकी दहशवादाशी लढत आहे, तेवढाच सांस्कृतिक दहशतवादाशी झुंजतोय. याचे ताजे उदाहरण सांगायचे झाले तर रायगडावर नव्यानेच घडलेला प्रकार म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर असलेल्या वाघ्या (कुत्र्याचा) पुतळा हटविण्याचा. या घटनेमुळे पाहिजे तेवढ्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. हे कृत्य करणा-या संघटनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे ही दाखल करण्यात आले.