“सत्यशोधक” लाखाचा मनसबदार…

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू॥ या जगद्गुरू तुकोबारायांच्या अभंगाला सार्थ ठरवण्यासाठी १३ मे २०१० रोजी सत्यशोधक (satyashodhak.wordpress.com) हा ब्लॉग सुरु केला. भगवान महावीर, तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले, राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आद्य क्रांतिकारक उमाजी राजे नाईक, संत रविदास, लोकमाता … Continue reading: “सत्यशोधक” लाखाचा मनसबदार…

कुसुमाग्रज: प्रतिभावंत नव्हे उचल्या!

पतिव्रता ही उपाशी मरते तिला मिळेना सावली। चंचल नार बांधित असे नवे घर एक दरसाली॥ पेशवाईतील प्रख्यात शाहीर अनंत फंदी यांचा हा फटका. अस्सल पतिव्रतांच्या नशिबी नेहमीच उपेक्षा येत असते. चंचल बायका मानाचे बाशिंग मिरवून घेत असतात. समाजातले हे वास्तव मराठी साहित्य क्षेत्रालाही पुरेपूर लागू पडते. परशय्येवर लाजेची फुले उधळणार्‍या अशा अनेक चंचल नारी मराठी … Continue reading: कुसुमाग्रज: प्रतिभावंत नव्हे उचल्या!

समाज क्रांतीचा द्रष्टा – श्री शाहू राजा

१७ जुलै १९६८ रोजी मुंबईत पहिल्यांदाच राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी केली गेली. त्यावेळी महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स यशवंतराव मोहितेंनी केलेले अद्वितीय भाषण. पुढील लिंक वर पहा : समाज क्रांतीचा द्रष्टा: श्री शाहू राजा

होय! सगळे ब्राम्हण वाईट नसतात..

फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीत काम करणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांच्या समता, बंधुता व न्याय या तत्वांचा प्रचार प्रसार करताना या समाजातील प्रत्येक विषमतावादी गोष्टीवर प्रहार करावा लागतोच. आणि पर्यायाने तो इथल्या ब्राम्हणवादी व्यवस्थेवर असतो. तेंव्हा त्यांचे मित्र. स्नेही, त्यांच्या जीवनात आलेल्या एखाद्या ब्राम्हणाचे उदाहरण देऊन त्या कार्यकर्त्याला म्हणतात कि सगळेच ब्राम्हण वाईट नसतात काही चांगले पण असतात. अशा … Continue reading: होय! सगळे ब्राम्हण वाईट नसतात..

श्री संत गाडगेबाबा – प्रबोधनकार ठाकरे

श्री संत गाडगेबाबा चरित्र

गावातील तसेच माणसांच्या मेंदूतील घाण साफ करून त्यांचे प्रबोधन करणारे कर्ते समाजसुधारक कृतीशील राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचा आज स्मृतिदिन. त्यांना विनम्र अभिवादन. महाराष्ट्राचे कट्टर सत्यशोधक प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेले त्यांचे चरित्र. पुस्तक इथे वाचा : श्री संत गाडगेबाबा – प्रबोधनकार ठाकरे