विठोबा कुणाचा? – डॉ.अशोक राणा

महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेला पंढरपूरचा पांडुरंग हा वारकऱ्यांचा प्राण आहे. संत शिरोमणी नामदेवांनी त्याला विठाई म्हणून संबोधून ते आपल्या जीवीचे जीवन आहे, असं म्हटलं आहे. खरं तर त्यांच्यामुळेच तो भारतभर पसरला व शिखांच्या गुरुग्रंथ साहिबचं अविभाज्य अंग झाला. ज्ञानदेवांनी कानडा विठ्ठलु कर्नाटकु म्हणून त्यांच्या मूळ स्थानाची खूण सांगितली. मग तो केवळ महाराष्ट्राचाच आहे, असं कसं म्हणता … Continue reading: विठोबा कुणाचा? – डॉ.अशोक राणा

हेमाडपंती मंदिरे व इतिहासकारांचा सावळागोंधळ

भारतभर नागर, वासर व द्राविड अशा प्राचीन मंदिरांच्या निर्माणशैली प्रचलित आहेत. परंतु हेमाडपंती या शैलीचा कोणत्याही प्राचीन किंवा मध्ययुगीन ग्रंथांमध्ये उल्लेख आढळत नाही. तरीही प्रख्यात पुरातत्त्वशास्त्रज्ञ व संस्कृत भाषा व साहित्याचे संशोधक डॉ.वा.वि.मिराशी यांनी आपल्या’ संशोधन मुक्तावली‘ या शोधनिबंध संग्रहात मात्र तसा उल्लेख केलेला आहे. १९५७मध्ये प्रकाशित प्रस्तुत ग्रंथामध्ये पृ.१३९ वर ते म्हणतात, ”रामदेवराय यादवाचा … Continue reading: हेमाडपंती मंदिरे व इतिहासकारांचा सावळागोंधळ

शोध हनुमानाचा – डॉ. अशोक राणा

आमच्या अमरावतीच्या घरासमोर काळ्या मारुतीचे मंदिर आहे. माझ्या पत्त्यामध्ये त्याचा पूर्वी उल्लेख असायचा. त्यामुळे काळा मारुती हा काय प्रकार आहे,असे भेटणारे लोक उत्सुकतेने विचारीत असत. मग मंदिराच्या पुजाऱ्याने दिलेली माहिती उत्तरादाखल आम्ही त्यांना सांगत असू. बहुतेक ठिकाणी शेंदूर माखलेला मारुती असतो. लाल-नारिंगी रंगाचा मारुती सर्व परिचित आहे. त्याच्याविषयी स्पष्टीकरण दिले जाते,की जन्मतःच आकाशातील लालबुंद सूर्य … Continue reading: शोध हनुमानाचा – डॉ. अशोक राणा

राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख

(जन्म : २० फेब्रुवारी १९३९ मृत्यु : २९ सप्टेंबर २००३) गेल्या तीन चार दशकांमध्ये महाराष्ट्रातील असे एकही गाव नसेल ज्या गावात शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांचा आवाज घुमल्याशिवाय शिवजयंती साजरी झाली असेल. “ओम नमो श्री जगदंबे, नमन तुज अंबे, करुन प्रारंभे, डफावर थाप तुणतुण्या ताण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिवप्रभुचं गातो गुणगान जी जी जी जी… … Continue reading: राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख

संघाला अभिप्रेत हिंदुत्व – प्रा. अशोक राणा

संघ हा मुळात चातुर्वर्ण्यावर आधारित समाजरचनेचा पुरस्कर्ता आहे. आर्यवंश सिद्धांत हा त्याचा पाया आहे. त्यामुळेच संघाच्या बौद्धिकात या सिद्धांताला अतिशय महत्वाचे स्थान आहे. स्वतःला आर्य म्हणविणारा हिटलर त्यामुळेच संघापुढील आदर्श आहे. संघसंस्थापक डॉ.हेडगेवार यांनी आपल्या अनुयायांमध्ये या विचाराची रोवणी केली आणि त्याला सैद्धांतिक स्वरूप प्राप्त करवून दिले,ते दुसरे संघचालक मा.स.गोळवलकर यांनी. त्यांच्या १९३९मधील ‘वुई ऑर … Continue reading: संघाला अभिप्रेत हिंदुत्व – प्रा. अशोक राणा