कामगारांचे हितकर्ते राजर्षी शाहू

समाजातील कष्टकरी, कामगार आणि शोषित, पीडित यांच्याविषयी राजर्षी शाहू छत्रपतींना आंतरिक कळकळ होती. या घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी कृतिशील आदर्श घालून दिला. राजर्षी शाहूंच्या जयंतीदिनी त्यांच्या कार्याला दिलेला उजाळा. शाहू छत्रपती स्वतःला अगदी अभिमानाने शेतकरी किंवा मजूर कष्टकरी म्हणवून घेण्यात धन्यता मानताना आढळून येतात. कानपूर येथील अखिल भारतीय क्षत्रियांच्या सामाजिक परिषदेच्या अध्यक्षपदावरून बोलताना १९एप्रिल १९१९रोजी ते … Continue reading: कामगारांचे हितकर्ते राजर्षी शाहू

राजर्षी शाहू महाराज आणि स्त्री शिक्षण

छत्रपती असूनही समाजक्रांतिकारक बनलेले, आपल्या राजदंडाचा वापर जनतेच्या सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी करणारे राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त. आधुनिक महाराष्ट्राच्या विबोधतेचा काळ म्हणून आपण ‘फुले, शाहू, आंबेडकर’ कालखंडाकडे पाहतो. आधुनिक महाराष्ट्राला त्यांच्यासारख्या सुधारकांकडून आणि त्यांच्या विचारांच्या अनुयायांकडून पुरोगामित्वाचा वारसा मिळाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात समाजसुधारकांची मांदियाळीच निर्माण झाली. या मांदियाळीत राजर्षी शाहू महाराजांचे वेगळेपण प्रकर्षाने जाणवते. छत्रपती असूनही … Continue reading: राजर्षी शाहू महाराज आणि स्त्री शिक्षण

समाज क्रांतीचा द्रष्टा – श्री शाहू राजा

१७ जुलै १९६८ रोजी मुंबईत पहिल्यांदाच राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी केली गेली. त्यावेळी महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स यशवंतराव मोहितेंनी केलेले अद्वितीय भाषण. पुढील लिंक वर पहा : समाज क्रांतीचा द्रष्टा: श्री शाहू राजा

दादोजी कोंडदेव: वाद आणि वास्तव

Dadoji Konddev: Arguments and Facts

२००४ साली जेम्स लेन या लेखकाने आपल्या हिंदुस्थानचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अत्यंत घाणेरडे लेखन करून जगभरातील शिवप्रेमी जनतेमध्ये प्रक्षोभ निर्माण केला होता. या जेम्स लेनच्या लेखनामुळे इथल्या शिवभक्तांमध्ये निर्माण झालेला प्रक्षोभ अजून म्हणावा तितका शांत झालेला नाही. या लेनच्या लिखाणामुळे महाराष्ट्रात शिवकालापूर्वीपासून अधूनमधून उचल खाणाऱ्या ब्राह्मण-ब्राह्मणेतर या तथाकथित नावाने ओळखल्या जाणाऱ्या वादाने पुन्हा … Continue reading: दादोजी कोंडदेव: वाद आणि वास्तव