जातीवादी कोण? ठाकरे, वागळे की संभाजी ब्रिगेड?

राज ठाकरेच्या १२ जानेवारीच्या सभेचे निर्भीड विश्लेषण!

‘दै.महानायक’चा दि. १३ जानेवारीचा अग्रलेख.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत केलेल्या भाषणाचे भारी कवतिक उपर्‍या आर्यभटांच्या मराठी चॅनल्सवाल्यांनी चालविले आहे. यामध्ये भट-बनियाच्या संकरातून जन्मलेल्या आयबीएन लोकमत नावाच्या वृत्तवाहिनीचे संपादक निखिल वागळे फारच आघाडीवर आहेत. परवा दिवसभर प्रसारीत केलेल्या चर्चेमध्ये निखिल वागळे यांनी आपल्या शेंडी-जानवेधारी भाईबंदांना बोलावून राज ठाकरे कसे महान आहेत, हे पटवून देण्याचा जो अस्सल कायस्थी प्रयत्न केला तो पाहता या वर्षातील सर्वोत्कृष्ट ‘लोणीचोळे’ असा किताब त्यांना मनसेने द्यावयास हवा, असे आम्हाला सुचवावेसे वाटते. या चर्चेत राज ठाकरेंनी लावलेल्या एका महान शोधाचे उदय निरगुडकर नावाच्या ठाकरेक्लोनने आपले जानवे तटतटेस्तव आणि शेंडी फडफडेस्तव कवतिक केले. काय तर म्हणे, महाराष्ट्रात जातीवादाला मुळीच थारा नाही. त्यांच्या राजसाहेबांनी संभाजी ब्रिगेडचा जातीवाद उघडा पाडल्यामुळे महाराष्ट्रात क्रांती होईल आणि संपूर्ण महाराष्ट्र बिहारप्रमाणे एका जानव्यात बांधले जाईल! सर्वांच्या डोक्यावर एकच शेंडी राहील! या चर्चेत भाग घेतलेले अतुल सरपोतदार यांनीही हेच डफडे वाजविले. निरगुडकर, सरपोतदार यांच्या डफतुणतुण्यावर वागळेंनी दर्शकांचा पोल घेऊन 80 टक्के दर्शक राज ठाकरेंच्या म्हणण्याचे समर्थन करतात, असा खास सारस्वती मोर्तब केला. ठाकरेंच्या मुक्ताफळांना तत्वज्ञानी कल्हई मारण्याचा निखिल वागळेंचा हा आटापिटा पाहिल्यानंतर आम्हाला प्रश्न विचारावासा वाटतो की, खरे जातीवादी कोण? राज ठाकरे, निखिल वागळे की संभाजी ब्रिगेड?

महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण संभाजी ब्रिगेडने सुरु केलेले नाही. महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणाचे खरे जनक बाळ गंगाधर टिळक आणि त्यांचे दक्षिणापंथी शेंडीबहाद्दर चेले आहेत. राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले आणि त्यांच्या सत्यशोधक चळवळीतील सहकार्‍यांना टिळक व त्यांच्या कंपूने शुद्र लेखून कायम अपमानीत केले हा इतिहास आहे. टिळक कंपूच्या जातीवादामुळेच महाराष्ट्रात ब्राह्मणेत्तर पक्षाची निर्मिती झाली. ब्राम्हणेत्तर पक्षाच्या नेत्यांना भूलथापा देऊन काँग्रेसमध्ये विलीन होण्यास भाग पाडल्यानंतर त्यांना नेहमीच जातीवादी वागणूक देण्यात आली. निवडणुकीच्या आधारे लोकप्रतिनिधी निवडण्याची पध्दत तेव्हाच्या मुंबई प्रांतात आणि आत्ताच्या महाराष्ट्रात सुरु झाली तेव्हापासून ब्राह्मण आणि सीकेपींचेच वर्चस्व महाराष्ट्राच्या राजकारणात राहिले आहे. 1946 नंतर यशवंतराव चव्हाणांचा उदय महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर झाला. यशवंतराव चव्हाणांसभोवती महाराष्ट्रातील सुशिक्षीत मराठा तरुणांची पलटण उभी झाली. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर पकड ठेवून असलेले शंकरराव देव, मोरारजी देसाई आणि बाळ गंगाधर खेर या ब्राह्मणांचे धाबे दणाणले व त्यांनी मराठ्यांना बेदखल करण्याची मोहीम सुरु केली. यशवंतराव चव्हाणांच्या राजकीय मुत्सद्देगिरीमुळे तसेच प्रत्येक राज्यातील प्रबळ शेतकरी जातीचे हितसंबंध जपण्याच्या नेहरुच्या धोरणामुळे चव्हाणांचा आणि मराठा जातीचा प्रभाव वाढत गेला. 1957 साली मुंबई प्रांताचे मुख्यमंत्रीपद चव्हाणांच्या ताब्यात आले. यामुळे चवताळलेल्या ब्राह्मणांनी अत्रे-डांगे-एस.एम.जोशी यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन उभे करुन पुन्हा ब्राह्मण नेतृत्व प्रस्थापित करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर 1995 मध्ये काँग्रेस पराभूत होईपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद ब्राह्मणांच्या हातात आले नाही. 1995 मध्ये सेना-भाजपाची सत्ता येताच बाळ ठाकरेंनी शिवसेनेच्या उभारणीत सर्वोत्तम योगदान देणार्‍या मराठा, ओबीसी व आगरी-भंडारी नेत्यांना डावलून मनोहर जोशी या ब्राह्मणाला मुख्यमंत्रीपद बहाल केले. बहुसंख्यकांना डावलून कोणतीही विशेष गुणवत्ता नसलेल्या व्यक्तीला सर्वोच्च सत्तापद देणे हा जातीवादी पक्षपात नाही काय? याचे समर्थन दोन्ही सेनावाले कसेही करोत, परंतु ‘जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी!’ या तत्वाला फासलेला हा जातीवादी हरताळ आहे, असे आम्ही समजतो. या जातीवादी संस्कारात लहानाचे मोठे झालेल्या राज ठाकरेंचा संभाजी ब्रिगेडवरील जातीवादाचा आरोप म्हणजे शूद्रांनी वेद रचून ब्राह्मणांवर अन्याय केल्याच्या आरोपासारखा आहे.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री रामचंद्र पाटील यांच्याबाबतही राज ठाकरेंनी उपमर्दकारक वक्तव्य केले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राजकारणाविषयी टिकाटिप्पणी होऊ शकते. परंतु राज ठाकरेंनी ज्या व्यक्तीगत पातळीवर जाऊन चव्हाण-पवार-पाटील यांच्यावर टीका केली आहे त्यामध्ये स्वतःच्या उच्चजातीयत्वाचा दर्प आहे. जातीय उतरंडीत सीकेपी म्हणजेच कायस्थ मराठ्यांना निम्न स्तरावरचे मानतात. त्यातूनच सभ्यतेची मर्यादा ओलांडून शूद्र नेत्यांवर टीका केली जाते. राज्यकर्ते असले तरी ते आपल्यापेक्षा श्रेष्ठ असू शकत नाहीत, ही नेणीव राज ठाकरेंच्या मुखातून ब्राह्मणमहात्म्य आणि शूद्रकनिष्ठतत्व प्रसविते. त्यामुळे दादू कोंडदेव गोचिवडे नावाच्या टुकार ब्राह्मणाला श्रेष्ठ ठरविताना आपण जिजामातेचा आणि शिवरायांचा अपमान करीत आहोत याचेही भान राज ठाकरेंना राहत नाही.

राज ठाकरेंनी औरंगाबाद येथील भाषणात बाबासाहेबांचे गुरु ‘ब्राह्मण’ असल्याचा महान शोध लावला आहे. बाबासाहेबांच्या संपूर्ण लेखनात आणि भाषणांत बुध्द-कबीर-फुले या त्यांच्या तीन गुरुंशिवाय चौथ्या गुरुचा उल्लेख नाही. तरीही एकलव्याचा अंगठा कापून घेणार्‍या द्रोणाचार्याप्रमाणे हा नसलेला चौथा ब्राह्मण गुरु बाबासाहेबांच्या माथी मारुन राज ठाकरे आपले सासरऋण फेडू इच्छितात असे दिसते. ब्राह्मण गुरु असल्याशिवाय कोणत्याही शूद्राला मोठे होता येत नाही, हा ब्राह्मणी जात्याभिमान शूद्र हिंदूंच्या माथी मारुन ब्राह्मण जातीवाद पुष्ट करण्याचा राज ठाकरेंचा हा जातीवादी प्रयत्न आहे. राज ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडला राष्ट्रवादीचे पिल्लू संबोधताना आपण कुणाचे पिल्लू आहोत हे जाहीर केलेले नाही. परंतु, त्यांच्या एकंदरीत राजकारणाची दिशा पाहता हे काँग्रेसने प्रसविलेले पिल्लू आहे, अशी शंका घेण्यास पुरेसा वाव आहे. प्रबळ विरोधकांमध्ये फूट पाडून फुटीरवाद्याला उत्तेजण देणे हे काँग्रेसच्या राजकारणाचे सूत्र आहे. सत्तरच्या दशकात प्रबळ असलेली समाजवादी-कम्युनिस्ट राजकीय चळवळ नेस्तनाबूत करण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेला जन्म दिला, वाढविले. आता हे बाळ फारच डोईजड होईल, असे दिसताच त्याची शकले करुन नवीन बाळ जन्माला घातले. त्याचेच नाव ‘मनसे’ आहे. मनसेच्या पालनपोषणाची जबाबदारी काँग्रेसने घेतलेली असल्यामुळेच मनसेला मनमानी करण्याचे बळ आले आहे.

मनसेच्या अशा मनमानी वागण्याचे समर्थन ब्राह्मणी वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्या सातत्याने करीत आली आहेत. केतकरी-खाडीलकरी वर्तमानपत्रे राज ठाकरेंच्या हगण्या-खोकण्याचे वृत्त पहिल्या पानावर लावून रसभरीत वर्णन करीत असतात. हॉटेल-मॉल्स् यामध्ये केलेल्या तोडफोडीला ‘खळ्ळ-फटाक’ असे शीर्षक देऊन मनसेवाल्यांनी कसा पराक्रम केला आहे, असे ठसविण्याचा आटापिटा केला जातो. वृत्तवाहिन्यांच्या पॅनेलवर चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आलेले बहुसंख्य तथाकथित तज्ञ आणि विश्लेषक त्यांचेच जानवेधारी लाडूखाऊ भाईबंद असतात. हा जातीवाद नाही काय? निखिल वागळे या जातीवादी मुखंडांमध्ये अग्रस्थानी आहेत. राज ठाकरे हे निखिल वागळेंच्या जातीचे असल्यामुळेच राज ठाकरेच्या बेकायदेशीर आणि असंवैधानिक कृतीचे समर्थन वागळे करीत असतात. त्यांच्या पॅनेलमध्ये भाग घेणारे निरगुडकर, सरपोतदार, बाळ इ. तथाकथित तज्ञ आणि विश्लेषक बहुसंख्येने भटब्राह्मणच असतात. महाराष्ट्रात भटब्राह्मणांशिवाय अन्य विचारवंत आणि तज्ञ नाहीत काय? या भटाब्राह्मणांच्या वृत्तपत्रांचे वाचक आणि वागळे, खांडेकर यांच्या दूरचित्रवाहिन्यांचे दर्शक केवळ भटब्राह्मणच आहेत काय? असे जर नसेल आणि वागळेसारखे पत्रकार खरोखरच निःपक्षपाती असतील तर त्यांच्या वृत्तवाहिन्यांवर शूद्र हिंदूंच्या समस्यांविषयी चर्चा होणे आवश्यक आहे. मात्र अशी चर्चा अभावानेच होताना दिसते.

12 जानेवारीला राज ठाकरेंची औरंगाबादला जी सभा झाली त्यापेक्षा चार पटीने मोठा मेळावा जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्ताने सिंदखेडराजा येथे झाला. या मेळाव्यात ब्राह्मण हे हिंदू नाहीत आणि शूद्रांचा हिंदू धर्म व ब्राह्मणांचा वैदिक धर्म पूर्णत वेगळे असल्याचा उद्घोष करण्यात आला. शंकराचार्य स्वतःला वैदिक धर्माचे न म्हणता हिंदू म्हणवून घेत असल्यास आपण चळवळी बंद करु, अशी घोषणा मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी केली. मात्र, लाखो लोक सहभागी झालेल्या या मेळाव्याचे वृत्त मराठी वाहिन्यांवर झळकले नाही. ब्राह्मणी वृत्तपत्रांमध्ये हे वृत्त छापून आले नाही. हा जातीवाद नव्हे तर काय आहे? कर्मधर्मसंयोगाने प्राप्त झालेल्या पदाचा वापर वागळेसारखे पत्रकार जातीय भावनेतून करीत असूनही स्वतःला नामानिराळे ठेवून स्वतःच्या सांस्कृतिक उन्नयनासाठी प्रयत्न करणार्‍यांनाच जातीवादी ठरविणे यालाच टिळक- आगरकरांची पत्रकारीता असे नाव आहे. अशा पत्रकारीतेपासून बहुसंख्य शूद्र हिंदूंनी सावध राहावे, एवढाच सावधानतेचा इशारा आम्ही आमच्या शूद्र बांधवांना देऊ इच्छितो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.