हजारो वर्षांपूर्वी जगभर मानवसमूह टोळ्यांनी राहत असत. नागरीकरणाच्या वाटचालीत याच टोळ्या एकत्रित आल्या. त्यांचे गणराज्य झाले. त्यातून भाषा व संस्कृतीचा विकास झाला. विखुरलेल्या गणांना एकत्र ठेवण्यासाठी भाषा व संस्कृती हे अस्मितेचे प्रतीक ठरले. रक्ताच्या नात्यापेक्षा ‘भाषा व संस्कृती’ जवळचे ठरले. त्यामुळेच आज जगभर तसेच भारताच्या विविध भागांमध्ये अनेक भाषा व अनेक संस्कृती विकसित झाल्या आहेत.
चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा असे संबोधल्या जाते. दरवर्षी हा दिवस हिंदू नववर्षदिन म्हणून फक्त महाराष्ट्रातच साजरा करण्याची पूर्वापार प्रथा चालत आली आहे. राम वनवासातून अयोध्येत आले म्हणून घरावर गुढी उभारल्या गेली, अशी आख्यायिका यामागे आहे. रामाची कर्मभूमी अयोध्या म्हणून महाराष्ट्रापेक्षा हा सण अयोध्येत साजरा व्हायला हवा. मात्र अयोध्येत गुढीपाडवा साजरा होत नाही. याचाच अर्थ राम
दहशतवाद अनेक नावांनी ओळखला जातो. परंतु आज भारत जेवढा अतिरेकी दहशवादाशी लढत आहे, तेवढाच सांस्कृतिक दहशतवादाशी झुंजतोय. याचे ताजे उदाहरण सांगायचे झाले तर रायगडावर नव्यानेच घडलेला प्रकार म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर असलेल्या वाघ्या (कुत्र्याचा) पुतळा हटविण्याचा. या घटनेमुळे पाहिजे तेवढ्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. हे कृत्य करणा-या संघटनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे ही दाखल करण्यात आले.
आज छत्रपती संभाजीराजांचा बलिदान दिवस !! भूमीत या होऊन गेला एक मराठा -मावळा, आजही काना-कोपरा सह्याद्रीचा कडाडला, पाहून या युगाला, राजे तुम्ही पुन्हा या जन्माला, राजे तुम्ही पुन्हा या जन्माला॥ आमचे लाडके छत्रपती शंभूमहाराज ह्यांना विनम्र अभिवादन !! महाराष्ट्राच्या ह्या निधड्या छातीच्या छाव्याला कोटी कोटी प्रणाम.. अमर जाहले शंभूराजे! दै.देशोन्नती मधील शिवशाहीर जगदीशचंद्र पाटील यांचा