विकृतीभूषण

झालेत बहू होतील बहू
यासम बेशरम दुसरा नाही
बिलंदरीही लाजली जनहो
विकृतीभूषणाच्या सन्मानाने!

शाहिरी न रचता शाहीर झाला
जिजाऊ बदनामीपायी देह झिजविला
दहशतवादीही पडलेत फिके
विकृतीभूषणाच्या सन्मानाने!

शिवइतिहासाच्या ब्राम्हणीकरणातून
उध्वस्त केली भारतीय बंधुता
मानवी बॉम्बही शहारले जगी
विकृतीभूषणाच्या सन्मानाने!

काय साधले? साधणार आहेत!
विकृतीभूषणाच्या सन्मानाने!
तरुणाईचे तारुण्य करपले
विकृतीभूषणाच्या सन्मानाने!

महाराष्ट्राची अस्मिता काळवंडली आज
विकृतीभूषणाच्या सन्मानाने!
उपाय शिवजनहो एकच आता
उजळूया महाराष्ट्र लोकभूषणाने….

-पुरुषोत्तम खेडेकर
जिजाऊनगर (पुणे)

खबरदार! भटांच्या चाट्यांनो..

शिवश्री गजानन इंगोले लिखित “खबरदार! भटांच्या चाट्यांनो..” हे पुस्तक १९ फेब्रुवारी २०११ रोजी प्रकाशित झाले. आतापर्यंत या पुस्तकाच्या हजारो प्रती विकल्या गेल्या आहेत. तेव्हा पुढच्या पुस्तकाच्या निमिताने हे पुस्तक पहिल्यांदाच सर्वांसाठी खुले केले आहे. या पुस्तकात ब्राम्हणांचा, ब्राम्हणी प्रवृत्तीचा, भटी षडयंत्राचा, ब्राम्हणी दलालीचा चांगलाच समाचार घेतला आहे. एखाद्या डॉक्टरकडे एखादा रोगी गेला आणि त्याचा रोग जर साधा असेल तर डॉक्टर गोळ्या देतो. परंतु रोग जर गंभीर स्वरूपाचा असेल तर इंजेक्शन द्यावे लागते. प्रसंगी चिरफाड ही करावी लागते, म्हणजेच शस्त्रक्रिया करावी लागते. आपल्या समाजाला ब्राम्हणांचा रोग लागला आहे आणि तो इतका गंभीर आहे की अशा वेळी किरकोळ उपाय करून भागणार नाही तर ब्राम्हणांची चिरफाडच करावी लागेल. या पुस्तकातील विचार काहींना आवडतील तर काहीना झोंबतील तेव्हा तुमची प्रतिक्रिया लेखकाला त्यांच्या वैयक्तिक मोबाईल वर फोन करून कळवा किवा ई-मेल करून कळवा.

मोबाईल नं. 9975 37 4556
ई-मेल: sadhanagajanan(at)gmail.com

पुस्तक इथे वाचा : खबरदार भटांच्या चाट्यांनो! Ebook

शिवचरित्रावरील कलंक वाघ्या कुत्रा!

लाल महालातले कुत्रे हुसकले !
आता नंबर रायगडावरील कुत्र्याचा !!

छत्रपती शिवरायांच्या आणि मराठयांच्या इतिहासात वाघ्या कुत्र्याचा कुठेच उल्लेख नाही. शिवराज्याभिषेकाला विरोध करणार्‍या हरामखोर मानसिकतेच्या लोकांनी शिवरायांच्या आणि एकूणच मराठयांच्या इतिहासाचा पालापाचोळा केला. या हरामखोरांनी जसा इतिहासात आदिलशहाच्या दरबारात हुजरेगिरी करणार्‍या दादूला शिवरायांचा गुरु केले तसे एका वाघ्या कुत्र्याला इतिहासात घुसडले आहे. या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडावर आहे. शिवरायांच्या समाधी इतकी या कुत्र्याची उंची दाखवली आहे. हा कुत्रा शिवकालीन कागदपत्रांत कुठेच नाही. कुठेच उल्लेख नाही. लाल महालातले एक कुत्रे काढून उकिरड्यावर फेकले आता रायगडावरील हे कुत्रे खेचून उकिरड्यावर फेकून दिले पाहिजे..

कोल्हापूर – वाघ्या कुत्र्याची कथा ही दंतकथा आहे. शिवचरित्रात तिला कुठलाही पुरावा नाही. शिव समाधीसमोरील हे स्मारक म्हणजे इतिहासाचा अपमान आहे. कथा, कादंबर्‍या व नाटकांतून रंगवलेल्या वाघ्या कुत्र्याचा इतिहासाशी संबध नाही, अशा प्रतिक्रिया इतिहास संशोधक व संघटनांच्या पदाधिकार्‍यांतून आज व्यक्त झाल्या. शिव समाधीसमोरील हे स्मारक हटविण्यासाठी पुरातत्त्व खात्याने तातडीने हालचाल करावी, अशी मागणी त्यांच्यातून व्यक्त झाली.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे रायगडावर साजर्‍या होणार्‍या शिवराज्याभिषेकाच्या तयारीसाठी तुळजाभवानी मंदिरात काल (ता. 17) बैठक झाली. त्यावेळी वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवावे, ही मागणी करण्यात आली. युवराज संभाजीराजे यांनी त्यासाठी राज्य शासनाने समिती नेमावी, अशी मागणी केली. यासंदर्भात आज इतिहास संशोधक, प्रेमींनी वाघ्या कुत्रा व शिवचरित्राचा कोणताच संबंध नसल्याचीच भूमिका मांडली.

डॉ. जयसिंगराव पवार (ज्येष्ठ इतिहास संशोधक) : वाघ्या कुत्र्याचा कागदपत्रांत कुठेही उल्लेख आढळत नाही. शिवचरित्र व वाघ्या कुत्रा यांचा काहीच संबंध नाही. वाघ्या कुत्रा ही तर एक दंतकथा आहे. त्यामुळे वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला महत्त्व देणे चुकीचे आहे.

प्रमोद मांडे (इतिहास संशोधक) : शिवचरित्राच अभ्यासल्यास छत्रपती शिवराय हे काही कुत्री, मांजरे पाळणारे राजे नव्हते, हे दिसून येईल. कथा, कादंबर्‍या, नाटकांतून वाघ्या कुत्र्याचे पात्र रंगवले आहे. रायगडावर उभारलेले वाघ्याचे स्मारक हे तर विदेशी कुत्र्याचे आहे. ज्याचा शिवचरित्रात कोणताच उल्लेख आढळत नाही. महात्मा फुले यांनीही त्याचा कोठेच उल्लेख केलेला नाही. गैरसमजूतीतून हे स्मारक उभारले गेले आहे.

प्रा. डॉ. रमेश जाधव (इतिहास संशोधक) : नाटककार राम गणेश गडकरी यांच्या “राजसंन्यास’ नाटकात वाघ्या कुत्र्याचे पात्र रंगवले आहे. या कुत्र्याविषयी इतिहासात ठोस पुरावाही सापडत नाही. त्यामुळे गडावरील हे स्मारक ग्राह्य मानणे चुकीचे आहे.

इंद्रजित सावंत (इतिहास संशोधक) : तुकोजी होळकर हे शिवप्रेमी व बहुजनप्रेमी होते. त्यांनी शिवसमाधीकरिता मदत केली; मात्र त्यांना बदनाम करण्याच्या हेतूने वाघ्या कुत्र्याचे स्मारक उभारले गेले आहे. ते हटविण्याची आवश्‍यकता आहे. शिवसमाधीसमोर हे स्मारक उभारण्यापूर्वी त्याठिकाणी दगडी चौथरा होता, असे इतिहासाचा अभ्यास करताना दिसते. त्यामुळे या चौथर्‍याचा शिवछत्रपतींच्या घराण्यातील महत्त्वपूर्ण व्यक्तीचा संबंध असल्याचा निष्कर्ष निघतो.

प्रवीण गायकवाड (प्रदेशाध्यक्ष , संभाजी ब्रिगेड) : इतिहासाचे पुनर्लेखन व्हावे, ही आमची मागणी आहे. इतिहासात कोणत्याना ना कोणत्या घटना, प्रसंग घुसडविल्याने इतिहासाचे विकृतीकरण झाले आहे. वाघ्या कुत्र्याचे स्मारक हे त्याचेच एक उदाहरण आहे. येत्या काही दिवसांत शासनाने हे स्मारक हटवावे अन्यथा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना यात लक्ष घालावे लागेल.

वसंत मुळीक (जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ) : शिवसमाधीसमोरील कुत्र्याचे स्मारक हे न उलगडणारे कोडे आहे. त्यामुळे हे स्मारक हटविणे आवश्‍यक आहे.

We will remove Waghya Kutra statue

लाल महालातील शाहिस्तेखान ते दादोजी

दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरणी इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचा दै.देशोन्नती च्या स्पंदन पुरवणीतील लेख.

(दै.देशोन्नती, ३० जानेवारी २०११)

Shahistekhan to Dadoji - Lal Mahal

दादाजीपंती उगीचच बल घालविले!

दादोजी कोंडदेव शहाजी महाराजांच्या नोकरीतील सुभेदार हे वर्णन पूर्णत: खोटे व बनावट असून लेखकाची मखलाशी आहे. ‘दादोजी गोचिवडे’ आणि ‘दादोजी कोंडदेव’ हे वेगवेगळे. दादोजी गोचिवडे हा मलठणचा आहे तर दादोजी कोंडदेव शिवथरचा आहे. दादोजी कोंडदेव Dadajipanti Ugich Bal Ghalvile!विजापूरकरांकडे प्रथम कारकून म्हणून नोकरी करीत होता. इ.स. १६३० मध्ये त्याची हवालदापर्यंत बढती झालेली होती. इ.स. १६३० मध्ये विजापुरी सरदार मुरार जगदेवाने पुणे कसबा वस्ती जाळली. त्याचे दायित्व आदिलशाही हवालदार म्हणून दादोजी कोंडदेवाकडे जाते. इ.स. १६३२ ते १६३६ अखेपर्यंत शहाजीराजांच्या शत्रुपक्षाकडे दादोजी कोंडदेव नोकरी करीत होता. त्याने शिवाजीराजांचा कोकणात उतरण्याचा रस्ता बराच काळ रोखून धरून आदिलशाही खजिना भरण्याचे काम केले होते व त्याची शिक्षा महाराजांनीच त्याला दिली.

७ जानेवारीच्या लोकप्रभात ‘दादाजीपंती सिउबांस शाहणे केले’ हा पांडुरंग बलकवडे यांचा लेख वाचण्यात आला. लेख वाचून वाईट वाटले. आपल्याला पुढे याच विषयाच्या अनुषंगाने काही नवीन माहिती येईल, ती संशोधित केलेली असेल, त्याचा अर्थ लावण्यासाठी खूप खल केला असेल, शक्य आहे तेवढया सर्व बाजूने तपासला असेल, त्या प्रत्येक बाजूवर विचारपूर्वक विचार मांडला असेल, आणि सर्वात महत्त्वाचे हे की, यामध्ये कोणाचीही बाजू न घेता शोध लेख सादर केला असेल, असे वाटले होते. परंतु पूर्ण निराशा झाली. बलकवडे यांनी दिलेली जंत्री पाहिल्यानंतर प्रथमदर्शनीच एक बाब लक्षात येते की, त्यांनी दिलेल्या जंत्रीचे कागद त्यांनी वाचले असावेत. परंतु त्यातील खरे-खोटेपणा त्या कागदपत्रातून निघत असलेला अर्थ, लिहिणारांस अभिप्रेत असणारा अर्थ लावण्याच्या भानगडीत ते पडले नसल्याचे दिसून येते. परंतु याहीपेक्षा महत्त्वाचे असे की, तो कागद बनावट नाही ना? त्यामधील मजकुरात काही फेरफार केला नाही नां? हे तपासण्याची तसदी त्यांनी घेतल्याची दिसून येत नाही.

बलकवड्यांनी जे काही लिहिले आहे त्याकडेच जरा वळू.

१) शहाजी महाराजांनी दादोजी कोंडदेवाची नेमणूक केलेली होती.
– हे पूर्णत: चूक आहे. शहाजी राजांनी दादोजी कोंडदेवाची आपल्या जहागिरीचा कारभार पाहण्यासाठी नेमणूक केलेली नव्हती व नाही. शहाजी महाराजांनी कोंडदेवाची नेमणूक केल्याचा एकही पुरावा नाही, तसा हुकूमनामा, पत्र नाही. दादोजी कोंडदेवाची नेमणूक विजापूरच्या आदिलशाहाने केलेली होती.
इ.स. १६३६ नोव्हे./डिसें. तथा जाने. १६३७ मध्ये रणदुल्लाखानाच्या आश्रयाने सख्य झाल्यामुळे मुर्तुजा निजामशहास खानजमान याचे हवाली करून शिवनेरी, माहुलीसह शेवटचे सहा किल्ले आदिलशाहीकडे सोपवून शहाजीराजे, जिजाऊ, संभाजीराजे, शिवाजीराजे यांचेसह विजापुरास पोहोचले, त्यावेळी दादोजी कोंडदेव हा शिवनेरीवर आदिलशाहीचा चाकर म्हणून पुढचे काम पाहण्यास पोहोचला होता. सन १६३७ मध्येच विजापुरी शिवाजी राजे व सईबाईसाहेब यांच्या विवाह झाल्यानंतर पुणे जहागिरीचा कारभार पाहण्यासाठी त्यांनी शिवाजी राजे व जिजाऊ यांची नेमणूक करून त्यांना इतर कारकुनांसह सन १६३९ मध्ये पुण्यास पाठविले आहे. त्यावेळी दादोजी कोंडदेव विजापूरचा चाकर म्हणून विजापूरकरांसाठी पुणे परगण्याचा कारभार पाहात होता.

२) त्याचा कारभार शहाजी महाराजांच्या नोकरीतील सुभेदार या नात्याने दादोजी कोंडदेव पाहात असे.
-यातील ‘शहाजी महाराजांच्या नोकरीतील सुभेदार’ हे पूर्णत: खोटे व बनावट असून लेखकाची मखलाशी आहे. इतिहास असे सांगतो की, दादोजी कोंडदेवाने कारकून म्हणून आदिलशाहीची नोकरी पत्करली, नंतर तो हवालदार झाला, त्यानंतर सुभेदार होऊन अखेरच्या श्वासापर्यंत त्याने आदिलशाहीची चाकरी केलेली आहे. त्यास सुभेदार करण्याचा अधिकार शहाजी राजांचा नसून आदिलशाहाचा होता. येथे एक बाब स्पष्टपणे लक्षात घेतली पाहिजे की, सन १६३२ ते १६३६ अखेर शहाजीराजे हे निजामशाहाचे पूर्ण अखत्यार होते तर दादोजी कोंडदेव हा आदिलशाहीचा चाकर होता. म्हणजे शहाजीराजे ज्यांच्या विरुद्ध लढा देत होते त्या शत्रुपक्षाचे कारकून दादोजी कोंडदेव होते. अशा शत्रुपक्षातील माणूस शहाजी महाराजांच्या नोकरीतील सुभेदार होता असे म्हणणे हास्यास्पद आहे.

३) दादाजी कोंडदेवाचा जुन्यातला जुना उल्लेख इ.स. १६३३ मधील एका पत्रात आला आहे.
– उल्लेखाच्या अनुषंगाने हेही चुकीचे आहे. कोंडदेवाचा उल्लेख सन १६३० मध्येही सापडतो. ता. १८ सप्टेंबर १६३० च्या कौलनाम्यात ‘राजश्री पंत हवालदाराचा कौलु दिल्हा आहे.’ असा उल्लेख सापडतो. यामध्ये सरळ दादोजी कोंडदेव असा उल्लेख नसला तरी ‘पंत’ हा उल्लेख दादोजी कोंडदेवासाठी आहे, हे संपूर्ण पत्र वाचले असता लक्षात येते. तर मग, अनेक पत्रांचा उल्लेख करणार्‍या त्या लेखकाच्या लक्षात हे पत्र आले नाही कां? माझ्या मते ते त्यांच्या लक्षात आले असावे, परंतु त्यांनी ते जाणीवपूर्वक देण्याचे टाळले असावे, कारण काय असावे? आदिलशाही सेनापती मुरार जगदेवाने सन १६३० मध्ये शहाजीराजांच्या जहागिरीच्या प्रांतांवर स्वारी केली होती. याबाबत सहा कलमी शकावलीत ‘ही स्वारी शके १५५२ म्हणजे सन १६३०-३१ मध्ये केलेली होती’ असे दिलेले आहे. या स्वारीबरोबर शाहाजीराजे ३० नोव्हेंबर १६३० मध्ये आजमखान मोगलांस मिळाले. इकडे मुरार जगदेवाने रायारावाने पुणे जाळले. पुण्याचा आदिलशाही हवालदार दादोजी कोंडदेव होता. म्हणजे पुणे जाळण्यामध्ये दादोजी कोंडदेवही होता हे स्पष्ट आहे. तसे नसल्यास आदिलशाही सेनापती पुणे जाळण्यास आला असता आदिलशाही हवालदार घरात लपून बसला असे म्हणायचे का? ही बला टाळण्यासाठी लेखकाने कोंडदेवाचा जुन्यातला जुना उल्लेख सन १६३३ पर्यंत सीमित केला. म्हणजे सन १६३० मधील पुणे जाळण्याचा उल्लेख टाळण्यास सोपे पडावे. दादोजी कोंडदेवाने पुणे जाळल्यामुळेच सन १६३७ मध्ये ‘शांती’ करण्याची गरज त्यास भासली काय? लेखकाने याचा पुनश्च शोध घ्यावा असे सुचवावेसे वाटते.

४) शिवापूर येथील आंबराई, आंबा व अंगरख्याची बाही छाटणे
– लेखकाने यास आख्यायिका संबोधले आहे. तर मग त्यांनी हेही लक्षात घेतले पाहिजे की, आपल्या लेखात आख्यायिका देणार्‍या माणसांस इतिहास संशोधक म्हणता येईल का? इतिहासाच्या नैतिकतेमध्ये कथा, कांदबर्‍या, आख्यायिका, कल्पना, घुसडाघुसडी याला काही स्थान नसते. आख्यायिका सत्य नसते. परंतु कोंडदेवाने आपल्या अंगरख्याची बाही छाटली ही आख्यायिका सुद्धा नाही. ही कोंडदेवाचे उदात्तीकरण करण्यासाठी घुसडलेली बनावट कथा आहे. ती ते लेखक देतात! आणि आपण इतिहास संशोधक नाही हे सिद्ध करतात. इथे तारतम्याचा व शोधक बुद्धीचा अभाव दिसून येतो. आता जरा आंबराई प्रकरणाकडे वळू. शिवाजी महाराज जिजामाता सन १६३९ मध्ये पुण्यास आले. सन १६४०-४१ मध्ये कारभारीय दृष्टीने दादोजी ही व्यक्ती त्यांच्यासमोर आली. कारण जिजामाता व शिवाजी राजांचे कारभारी वेगळे होते. त्यांची नावे इतिहासात स्पष्टपणे सापडतात. कोंडदेवाचा मृत्यू जुलै १६४६ मध्ये झालेला आहे. याचा अर्थ शिवाजी महाराज व दादो कोंडदेवाचा संबंध केवळ साडेपाच वर्षेच आला होता. काहींच्या म्हणण्यानुसार तो चार वर्षेच आला होता. तरीसुद्धा आपण साडेपाच वर्षेच धरली आहेत.

शहाजी राजांनी दादोजी कोंडदेवाची आपल्या जहागिरीचा कारभार पाहण्यासाठी नेमणूक केलेली नव्हती व नाही. शहाजी महाराजांनी कोंडदेवाची नेमणूक केल्याचा एकही पुरावा नाही, तसा हुकूमनामा, पत्र नाही. दादोजी कोंडदेवाची नेमणूक विजापूरच्या आदिलशाहाने केलेली होती.

एखादे वर्ष इकडे-तिकडे झाले तरी ह्या मुद्यासाठी फरक पडणार नाही. आल्याबरोबर जिजामातेने आंबराईचा हुकूम केला असे कोणीही मान्य करणार नाही. पहिली दोन वर्षे तर निश्चितपणे कारभारीय स्थिरतेसाठी गेली असणार हे उघड आहे. आता राहिलेल्या साडेतीन वर्षाच्या सुरुवातीस आंब्याच्या कोया भूमीत लावल्या (पुरल्या) तर त्याकाळानुसार ती झाडे मोठी होण्यासाठी व त्यांना फळे येण्यासाठी ८/१० वर्षे लागत होती. काही संदर्भ असे सापडतात की त्या काळी आंब्यास फळे येण्यास १४/१५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ लागत असे. म्हणून शिवाजी महाराजांनी आंब्यासारखी झाडे तोडण्यास मनाई केली होती. आता साधा विचार करणे आवश्यक आहे की, जर ही बाग कोंडदेवाने लावली असती तर त्या आंब्यास साधारण संभाजी राजांच्या जन्मसालाच्या दरम्यान म्हणजे सन १६५७ च्या दरम्यान अथवा त्यानंतर फळे आली असती, तर त्या वेळेस आंब्याच्या झाडाचे फळ तोडण्यास दादोजी कोंडदेव जिवंत होता काय? समजा, दादोजी कोंडदेवाने आंबा तोडल्याचे खरे धरले तर आंब्याची बाग स्वत: शहाजी राजांनी सन १६३२ च्या दरम्यान लावली होती, असा अर्थ होतो, व ती त्यांनी लावली असल्यामुळेच त्यास ‘शहाबाग’ हे नाव पडले असावे. त्याचप्रमाणे बागेबरोबरच शाहाजी राजांनी स्वत:साठी वाडा बांधला होता. म्हणजेच शिवापूरची आंबराई, तेथील राहण्याचा वाडा हे सर्व काम कोंडदेवाने केलेले नसून ‘शहाजी राजांनी’ केलेले होते हे स्पष्ट आहे. कोंडदेवाच्या उदात्तीकरणासाठी अंगरख्याची बाही कापल्याची लहान मुलांच्या गोष्टीसारखी सांगितलेली कथा-भाकड तथा खोटी आहे हेही स्पष्ट होते.

५) मागे दादाजी कोंडदेव लहानसाच ब्राम्हण झाला. परंतु त्याने जे इनसाफ केले ते औरंगजेब पादशहासही वंद्य जाहले.
– हे उद्गार शाहू महाराजांनी काढल्याचे समकालीन पत्रात नमूद केलले आहे असे त्या लेखकाचे म्हणणे आहे. त्यांनी या पत्रावर पूर्ण विश्वास ठेवल्याचे दिसून येते. हे पत्र त्यांनी नीट तपासणे आवश्यक होते, ते तपासलेले दिसत नाही. या पत्राची तारीख साल त्यांनी दिलेले नाही. समकालीन म्हणजे शाहू महाराज छत्रपती असल्याच्या म्हणजेच इ.स. १७०७ ते १७४९ हा काळ गृहीत धरावा लागतो. शाहू महाराज वयाच्या सातव्या वर्षी औरंगजेबाच्या कैदेत गेले आहेत तर वयाच्या पंचविसाव्या वर्षी म्हणजेच सन १७०७ मध्ये त्यांची सुटका झाली आहे. छ. संभाजी महाराजांच्या काळासारखाच हा काळ औरंगजेबासाठी अत्यंत धामधुमीचा परंतु हलाखीचा होता. मराठयांनी औरंगजेबाची अत्यंत वाईट हालत केली. सैनिकांचा पगार देण्यासाठी औरंगजेबास आपल्या स्वयंपाकातील चांदीची भांडी वितळावी लागली होती. अशा परिस्थितीत औरंगजेब शाहू महाराजांजवळ दादोजी कोंडदेवाची स्तुती करीत बसेल, हे शक्य नाही. दुसरे असे की, औरंगजेबास दादोजी कोंडदेवाची माहिती असणे हेही शक्य नाही. कारण दादोजी कोंडदेवाच्या हयातीत किंवा बादशाहा होण्यासाठी धडपडणार्‍या सालापर्यंत म्हणजेच १६५७ पर्यंत आणि त्यानंतर छ. संभाजी महाराजांच्या काळापर्यंत औरंगजेब पुण्यास आल्याची नोंद नाही, त्यामुळे कोंडदेवाची स्तुती करण्याचा प्रश्नच राहात नाही. यावरून हे पत्र तथा उल्लेख बनावट असल्याचे सिद्ध होत आहे.

इतिहासाच्या नैतिकतेमध्ये कथा, कांदबर्‍या, आख्यायिका, कल्पना, घुसडाघुसडी याला काही स्थान नसते. परंतु कोंडदेवाने आपल्या अंगरख्याची बाही छाटली ही आख्यायिका सुद्धा नाही. ही कोंडदेवाचे उद्दात्तीकरण करण्यासाठी घुसडलेली बनावट कथा आहे.

६) सोन्याचा नांगर
– या लेखात सहा कलमी शकावलीतील सोन्याच्या नांगराचा उल्लेख केला आहे. सोन्याच्या नांगराचे समूहशिल्प याच नोंदीवरून केले आहे. कळीचा मुद्दा असलेले हे कलम आहे. एकार्ध पानाच्या या शकावलीतील नोंदी बर्‍याच नंतरच्या काळात नोंदल्या असल्यामुळे हे विश्वसनीय साधन नाही, याबाबत सर्व अभ्यासक/संशोधकांचे एकमत आहे. मग सोन्याच्या नांगराची ग्राह्यता कशी धरता येईल? सहा कलमी शकावली ही दादोजी कोंडदेवाचे उदात्तीकरण करण्यासाठी लिहिलेली असावी हे सहाव्या कलमातील नोंदीवरून लक्षात येते. याच शकावलीच्या दुसर्‍या कलमात गाढवाचा नांगर धरल्याचा उल्लेख आहे तर सहाव्या कलमात सोन्याच्या नांगराचा उल्लेख आहे, यावरून वरील म्हणण्यास बळकटी येते. विशेष असे की, या दोन्ही नोंदीची ग्राह्यता अजिबात नाही. हे पुण्यातील अभ्यासक/संशोधकांना चांगले माहिती आहे.

७) बखरींमधील उल्लेख
-दादोजी कोंडदेवाचे मोठेपण सांगताना, यातील सुसंगत्व व पूरकत्त्व दाखविण्यासाठी लेखकाने तीन बखरींमधील उल्लेख दिलेले आहेत. १. शिवछत्रपतींची ९१ कलमी बखर, २. शेडगांवकर भोसले बखर, ३. शिवदिग्विजय बखर. सर्व बखरी ह्या सातारच्या छत्रपतींच्या उत्तरकाळात म्हणजेच इ.स. १७६०/७० नंतर लिहिलेल्या आहेत. वरील तीनही बखरींस हे प्रमाण लागते.

‘९१ कलमी बखर’ ही शिवछत्रपतींचा मंत्री दत्ताजी त्रिमल वाकेनिवीस याने लिहिलेली आहे असा प्रवाद होता. परंतु ही बखर दत्ताजी त्रिमल वाकेनिवीसाने लिहिलेली नाही याचे अनेक पुरावे आहेत. ह्या बखरीत शिवाजी महाराजांच्या राज्यारोहणाची तिथी काय दिली आहे ती पहा ‘कलम ८७ – ‘राजाभिषेक – त्याउप्पर वेदमूर्ती गागाभट वाराणसीकर येऊन रायेगडी राजेस्वामीस मुंजीबंधन पट्टाअभिषेक सिंह्यासनारूढ जाले. शके १५९६ आनंदनाम संवछरे चैत्र सुध प्रतीपदा’ शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीप्रमाणे त्यांच्या राज्यारोहणाच्या तिथीचाही घोळ घालण्यात आला आहे. परंतु तो घोळ ज्येष्ठ शु. ११, १२ आणि १३ भोवतीच फिरत होता. ९१ कलमी बखरीच्या नक्कलकाराने यावर ताण केली. त्याने शिवाजी महाराजांचा राज्यारोहण सोहळा वर नमूद केल्याप्रमाणे चैत्रात नेला आणि राज्यारोहणाची तिथी म्हणून शिवाजी महाराजांची मृत्युतिथी ‘चैत्र सुध प्रतीपदा’ देऊन मोकळा झाला. या कर्मास काय म्हणावे? अशी रचना राज्याभिषेकाच्या वेळी हजर असणाऱ्या, पट्टाभिषेकावेळी वायव्यकोनास मंत्री म्हणून चामर घेऊन उभ्या राहिलेल्या माणसाच्या हातून घडेल काय? यावरून ‘९१ कलमी बखर’ ही मंत्री दत्ताजी त्रिमल वाकेनिवीसाने लिहिलेली नसून बनवेगिरीच्या धाग्यातील महाभागाने लिहिलेली आहे, हे वाचकांच्या लक्षात आलेच असेल. अशा ह्या बखरीतील दादोजी कोंडदेवासंबंधीचा उतारा तथा उल्लेख प्रमाण म्हणून मानावा हे योग्य आहे का?

शेडगांवकर भोसले बखर :- लेखकाने ह्या बखरीतील मजकूर असा दिला आहे, ‘शिवाजीराजे ह्यास विद्याभ्यास करणारा सिक्षाधारी (म्हणजे शिक्षक) होता, त्यांणी विद्याभ्यासात सिवाजीराजे ह्यास तयार केले.’ आता ह्या बखरीच्या छापील प्रतीत पृ. १६ वर काय आहे पाहा, ‘तेव्हा त्याचे वडील शाहाजीराजे महाराज वजीर त्याचे वेळचे दादो कोंडदेव कारकून ब्राह्मण हा शिवाजीराजे याजला बाळपणी सिक्षाधारी विद्याभास करणारा तो फार शाहाणा व मोठा शुर होता.’

आपण वरील दोन्ही परिच्छेदाचे अवलोकन केले असता काय दिसते? त्या लेखकाने शब्दांची हेराफेरी करून पुनर्बांधणी केल्याचे दिसून येते. कदाचित आपणास वाचण्यास सोपे पडावे म्हणून हे केले असावे असे म्हणता येऊ शकते. परंतु ते तसे नाही, लेखकाने ह्या परिच्छेदातील बाळपणी हा शब्दच खाऊन टाकला आहे. म्हणजे त्यास ‘शिवाजी महाराजांच्या बाळपणी दादोजी कोंडदेव महाराजांचे शिक्षक नव्हते’ याची पक्की माहिती असणार. आणि पुरावे तसेच सांगत आहेत, म्हणून त्या लेखकाने हा शब्दच गाळून टाकला. आपल्या सर्वाच्या माहितीसाठी हे नमूद करतो की, बाराव्या वर्षांनंतर शिवाजी महाराज जिजामातेसह पुणे परगण्यात आले आहेत. त्यानंतरच म्हणजे वयाच्या १३/१४ व्या वर्षी त्यांचा दादोजीशी संपर्क आलेला आहे. यावरून ते ‘बाळपणी सिक्षाधारी’ होते हे कोठे बसत आहे? बाराव्या वर्षांनंतरच्या वयाला त्या काळी ‘बाळपण’ म्हणत नव्हते.

८) मुहंमद आदिलशाहाचे सन १६४४ चे फर्मान
-बलकवडे यांनी आदिलशाहाच्या अत्यंत महत्त्वाच्या फर्मानाचा उल्लेख केला आहे. दादोजी कोंडदेवाने सन १६४४ मध्ये शहाजी राजांची साथ सोडली नाही हे दाखविण्यासाठी याचा उल्लेख लेखात आला आहे. या फर्मानाबद्दल अनेक प्रश्नचिन्ह आहेत.
१. सन १६४४ मध्ये शहाजी राजे आदिलशाही दरबारातून खरोखरीच निर्वासित झाले होते काय?
२. कोंडदेव या सालात शहाजी राजांचे मुतालिक होते की आदिलशाहाचे सुभेदार होते.
३. शहाजी राजांच्या पारिपत्यासाठी सैन्य न पाठवता कोंडदेवाच्या पारिपत्यासाठी स्वारी पाठविली हे कसे?
४. अन्यत्र याचा उल्लेख कसा आला नाही?
५. हे फर्मान जेध्यांना पाठविले नाही मग त्यांच्या कागदपत्रांत हे फर्मान सापडले हे कसे?
यासारखे अनेक प्रश्न यातून निर्माण होतात, याचा शोध त्या लेखकाने घेतल्याचे दिसून येत नाही. या पत्रात कोंडदेवास ‘शहाजी राजांचा मुतालिक’ असा उल्लेख आल्याचे दिसून येत आहे. हे फर्मान खरे किती खोटे किती हा मुद्दा जरा बाजूला ठेवू. परंतु यावरूनच एक बाब आपल्या निदर्शनास येते, ती म्हणजे, सन १६४४ मध्ये शहाजीराजे विजापुराहून बाहेर गेले होते. ते कोठे गेले होते? ते स्वराज्यात-महाराष्ट्रात आले होते. याबाबत दि. २८ फेब्रुवारी १६४४ मध्ये शहाजी राजांनी कारकून व देशमुख परगणे पुणे यांना महादभट पुरंदरे याबाबत पाठविलेले फर्मान तथा खुर्दखत सापडते. त्यात त्यांनी पुणे प्रांतातील दोन गावांचे इनाम दिल्याचा उल्लेख आहे. याचा अर्थ शहाजी राजे विजापूर दरबारातून निर्वासित झाले नसून ते स्वराज्यातील कारभारासाठी जिजाऊ व शिवाजीराजे यांच्याकडे आले होते, त्याचा हा भक्कम पुरावा आहे. याप्रमाणे शहाजी राजे हे प्रत्येक दोन वर्षांनी स्वराज्यात येत होते. तरीसुद्धा त्याचा शोध घ्यायचा सोडून, ते सन १६६१ पर्यंत आलेच नव्हते असे बनावट विधान आजपर्यंतच्या लेखकांनी केले आहे.

त्या लेखकाने कृ. अ. केळूस्कर, प्रा. डॉ. जयसिंगराव पवार, यांच्यासह दोघा-तिघांची नामावली दिली आहे. ती अत्यंत त्रोटक आहे. त्याच दृष्टिकोनातून आम्ही दादोजी कोंडदेवाचा शोध घेतला तेव्हा कित्येक धक्कादायक बाबी आमच्या पुढे आल्या. त्यातील काही प्रमुख बाबी सर्वाच्या माहितीसाठी देत आहोत, त्या अशा –

१. सर्वात प्रथम येथे एक महत्त्वाची बाब लक्षात घेतली पाहिजे की, ‘दादोजी गोचिवडे’ हा वेगळा आहे आणि ‘दादोजी कोंडदेव’ हा वेगळा आहे. दादोजी गोचिवडे हा मलठणचा आहे तर दादोजी कोंडदेव शिवथरचा आहे. दादोजी गोचिवडे शहाजीराजांकडे ज्या परगण्यांची वंशपरंपरागत पाटीलकी व देशमुखी जहागिरी होती त्या हिंगणी, बेरडी व देऊळगांव या परगण्यांचा कुलकर्णी व कानुंगो होता. तर दादोजी कोंडदेव हा विजापूरकरांकडे प्रथम कारकून म्हणून नोकरी करीत होता. इ.स. १६३० मध्ये त्याची हवालदापर्यंत बढती झालेली होती. शहाजीराजांनी इ.स. १६३२ ते १६३६ अखेपर्यंत जी निजामशाही तथा शहाजीशाही तथा मराठाशाही चालविली होती त्यांच्या शत्रुपक्षाकडे दादोजी कोंडदेव नोकरी करीत होता.

२. इ.स. १६३० मध्ये विजापुरी सरदार/सेनापती मुरार जगदेवाने पुणे कसबा वस्ती जाळली. याचे दायित्व आदिलशाही हवालदार म्हणून दादोजी कोंडदेवाकडे जाते.

३. इ.स. १६३६ च्या अगोदर पुणे परगणा निजामशाहाकडे शहाजीराजांची जहागीर म्हणून होता. तेव्हा त्याचा कारभार शहाजीराजांकडेच होता. त्या वेळेस दादोजी कोंडदेव विजापूरकरांचा चाकर असल्यामुळे त्याचा शहाजीराजांशी तथा शहाजीराजांच्या पुणे परगण्याच्या कारभाराशी काहीही संबंध नव्हता.

४. इ.स. १६३६ च्या अखेरीस तथा इ.स. १६३७ च्या सुरुवातीस शहाजी राजांचा मोगल व विजापूरकरांबरोबर झालेल्या तहानुसार ते विजापूरकरांकडे सामील झाले. त्यानंतर शहाजीराजांच्या ताब्यातील भीमेच्या पलीकडील (दक्षिणेकडील) निजामशाही मुलूख आदिलशाहाच्या ताब्यात आला. त्यावर आदिलशाहाने ठाणी घातली. त्याचाच भाग म्हणून आदिलशाहाने पुण्यास ठाणे घातले. ते ठाणे दादोजी कोंडदेवामार्फत घातले गेले. तोपर्यंत दादोजीचा इ.स. १६३० मध्ये पुणे जाळण्याव्यतिरिक्त पुण्याशी काहीही संबंध नव्हता, तो संबंध त्याने विजापूरकरांसाठी पुण्यात ठाणे घातल्यानंतर आला.

५. तहानुसार आपल्याकडे आलेल्या शहाजीराजांस आदिलशाहाने पुणे प्रांताची सरंजामी देऊन पाठविले कर्नाटकात, विजापूरच्याही दक्षिणेकडे आणि त्याने पुणे प्रांताचा कारभार सोपविला आदिलशाहाचा विश्वासू माणूस दादोजी कोंडदेवाकडे! (पादशाहानामा (IB १५०); Shivaji and his Times, 4th edn. पृ. १८१९; श्रीशिछ-त्र्यं.शं.शे. पृ. ३७१; श्रीशिछ सच – मराचिब प्रकरण २.२; सहा कलमी शकावली,). यावरूनही कोंडदेव कोणासाठी काम करीत होता व त्याची निष्ठा कोणावर होती हे स्पष्ट होते.

७. शहाजीराजे, जिजामाता, शिवाजीराजे व त्यांचे मोठे बंधू संभाजीराजे हे एकत्रितरीत्या प्रथम विजापुरास व तेथून पुढे बंगरूळास पोहोचले. तेथे शिवाजीराजांचे राहिलेले शिक्षण सुरू झाले. त्याचदरम्यान इकडे पुणे प्रांतात असलेल्या दादोजी कोंडदेवाने बंगरूळास शाहाजीराजांच्या भेटीस जाण्याच्या निमित्ताने विजापूरची वाट धरली, तिकडे जाताना त्याने जो महसूल गोळा केला होता तो आपल्याबरोबर घेऊन तो विजापूरच्या सुलतानाकडे गेला. तो विजापूरच्या खजिन्यात जमा करून शहाजीराजांची परवानगी वा भेटही न घेता; परंतु आदिलशाहाची परवानगी घेऊन दादोजी कोंडदेव पुण्यास परतला. (शेडगांवकर भोसले बखर, छापील पृ. १८)

८. ज्या वेळेस दादोजी कोंडदेवाने शहाजीराजांच्या पुणे जहागिरीचा महसूल गोळा करून विजापूरच्या खजिन्यात भरून शहाजीराजांना न भेटता तो परस्पर परतला त्याच वेळी चाणाक्ष शहाजीराजांच्या लक्षात त्याच्या निष्ठेची बाब आली. जर आपण आपला कारभार स्वत: पाहिला नाही तर आपल्या जहागिरीचे उत्पन्न आपणांस मिळू शकणार नाही हे त्यांनी ओळखले. आणि पुण्याच्या जहागिरीचा कारभार पाहण्यासाठी त्यांनी जिजाऊंची व शिवाजी राजांची कारभारी मंडळासह नेमणूक केली व पूर्ण तजवीज करून पाठवणी केली. शहाजीराजांनी जिजाऊंना व शिवाजीराजांना पुणे प्रांतास का पाठविले त्याचे हे प्रमुख कारण आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

९. दादोजी कोंडदेवाची विजापूरकरांवरील निष्ठा व त्याने केलेली कामगिरी यामुळे आदिलशाहाने त्याला कोंढाण्याचा सुभेदार करून खास अधिकारी म्हणून नेमले होते. (Shivaji The Great, Vol I; P. ११, १८, ५५, ४३२ c.f. also Nos. ४३६, ४५६) (५७, ५०७, ५१३; श्रीशिछ-त्र्यंशंशे, पृ. ३७१; शिपसासं क्र. ४३२, ४३६) त्यामुळे जिजामाता व शिवाजीराजे यांनी स्वराज्याच्या उद्योगाचे काम दादोजी कोंडदेवाच्या परभारे स्वतंत्रपणे चालविले होते. स्वराज्याच्या उद्योगाचा कोणताही सुगावा तथा संबंध त्यांनी दादोजीस लागू दिला नाही. (शेडगावकर भोसले बखर, छापील पृ. ३५, ६७)

दादोजी कोंडदेवाने बंगरूळास शहाजीराजांच्या भेटीस जाण्याच्या निमित्ताने विजापूरची वाट धरली, जाताना त्याने जो महसूल गोळा केला होता तो विजापूरच्या खजिन्यात जमा करून शहाजीराजांची परवानगी वा भेटही न घेता; तो पुण्यास परतला.

शिवाजीराजांचे कुळ बुडण्याची भाषा करणार्‍या व्यक्तीची निष्ठा शहाजीराजे व जिजामातेवर असू शकते काय?

१०. मावळातील वतनदार स्वतंत्र वागत असत. शिवाजीराजांनी त्यांना आपल्या काबूत आणण्याचा उपक्रम केला. त्यांना सहाय्य करून त्यांची मने आपल्याकडे वळवून घेतली. ते वतनदार विजापूरकरांना जुमानीनासे झाले. यांपैकीच कृष्णाजी नाईक बांदल हे मावळातील एक वतनदार होते. ते आदिलशाही सुलतानांना मुळीच जुमानीत नव्हते, ‘दायिते देत नव्हते.’ दादोजी कोंडदेवास हे सहन झाले नाही, त्याने बांदलांवर हल्ला केला; परंतु यात कृष्णाजी बांदलांनी दादोजी कोंडदेवाचा पराभव केला. विजापूरच्या सुलतानासाठी आपला चोखपणा दाखविण्यास गेलेल्या कोंडदेवास बांदलांनी खरपूस चोप दिला.

११. राजांनी अति मेहनतीने, मोठी त्वरा करोन राजगड किल्ला बांधावयास काम चालविले. हे वतर्मान विजापूरचे पादशाहास जाहीर झाले. हे विजापूरचे सुलतानास कळले कसे? हे गुलदस्त्यातच आहे; परंतु विजापूरचा या भागातील सुभेदार म्हणून याचे दायित्व दादोजीकडे जाते. दादोजीने तसे केले नसते तर विजापूरकरांनी त्याची खरडपट्टी काढणारी आज्ञापत्रे पाठविली असती, परंतु असे घडले नाही.

१२. शिवाजीराजे स्वसत्तेने वागू लागले, विजापूरच्या पादशहाचे किल्ले व मुलूख काबीज करीत चालले, तेव्हा शिवाजीराजांना आवरण्यासाठी दादोजी कोंडदेव त्यांचा निषेध करून विरोध करू लागला; परंतु शिवाजीराजांनी आपला प्रयत्न थांबविला नाही. दादोजी शिवाजीराजांना शिवथर घळीच्या बाजूने जावळीत तथा कोकणात उतरू देईनासा झाला. दादोजीच्या विरोधामुळे शिवाजीराजांना कोकणात उतरता येईना. याचे पर्यवसान कोंडदेवावरील स्वारीत झाले. अखेर या स्वराज्यविरोधकास- पुंड दादोजी कोंडदेवास कैद करून, त्याचे डोळे काढून कायमचा बंदोबस्त केला गेला (चि.ब. पृ. ५,७) व शिवाजीराजांनी जावळीत उतरण्याचा रस्ता मोकळा केला.

१३. दादोजी कोंडदेवाच्या विजापूरकरांवरील निष्ठेमुळे आदिलशाहाने त्याला कोंढाणा किल्ला व इतर महालांचा सुभेदार व खास अधिकारी नेमले होते, तो कोंढाणा किल्ला दादोजीने आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्यात दिला नव्हता, तो त्याच्या मृत्यूनंतर शिवाजीराजांनी ताब्यात घेऊन स्वराज्यात सामील करून घेतला.

या सर्व विवेचनावरून व पुराव्यावरून दादोजी कोंडदेवाची निष्ठा कोणावर होती हे सांगण्याची आवश्यकता आहे का? जसा मुरार जगदेव तसाच दादोजी कोंडदेव! दोघेही आदिलशाही सरदार/सुभेदार. फरक इतकाच की, मुरार जगदेवाने रणांगणावर मर्दुमकी गाजविली आहे किंवा तशी धावपळ केली आहे. तर दादोजी कोंडदेवाने शिवाजीराजांचा कोकणात उतरण्याचा रस्ता बराच काळ रोखून धरून आदिलशाही खजिना भरण्याचे काम केले आहे आणि त्याचे त्यांना काय फळ मिळाले? इ.स. १६३५/३६ मध्ये मुरार जगदेवाला कैद करून आदिलशाहाच्या हुकमाने त्याची जीभ नरड्यापासून काढून गाढवावर बसवून शहरातून धिंड काढली गेली आणि त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे केले गेले (बु-उ-स, पृ. ३३०, ३३१) तर दादो कोंडदेव ह्या स्वराज्यविरोधकास शिवाजी राजांनी इ.स. १६४६ मध्ये कैद करून त्याचे डोळे काढविले. (चि.ब. पृ. ५,७). यामुळे तो मृत्यू पावला.

-अ‍ॅड. अनंत दारवटकर
anant_adv@yahoo.co.in

[ संदर्भ : शिपसासं. क्र. ३१२; बु-उ-स पृ. २९८; शिचप्र. पृ. ७०-७१; बादशाहानामा, क्षीराशिछ-गभामे पृ. ५८३; शिचप्र. पृ. ७०-७१, ६. शिपसासं. क्र. ३१२; शिपसासं. क्र. ५१३; शेडगांवकर भोसले बखर, पृ. ३४, ३५, ६७; अछश्रीसंम – अविदा, पृ. २०४; सभासद बखर, ९१ क. ब. वगैरे; अछश्रीसंम – अविदा, पृ. २१२; शिपसासं क्र. ४३२; शिपसासं क्र. ७२२; शिचप्र. पृ. ७०-७१; अछश्रीसंम खं. १ ला. -अविदा पृ. १९, ४८, ५०, ५२, ६३, ७२, १५१, १५६, १५७, १८०, १८१, १९७, ३२५, ३६४, ३६६, ३६८, ३७०, ३७२, ३७४, ५३३, ५३४, ५३५, ५४५; श्रीशिछसच-मराचि६, पृ. २२०; ९१ कलमी बखर, पृ. १०; शिपसासं क्र/. ४९३; (हा विषय सखोलपणे समजून घेणेसाठी ‘अद्वितीय छ. श्रीसंभाजी महाराज खंड १ : १५४ ते १५६, १७९ ते १९८, १९९ ते २१८, २५९, २६०; खंड २ : पृ. ६०८, ६०९, ६१२, ६१३, ६१९ ते ६२३; खंड ३ रा : पृ. १०७५ ते १०८७) ]

सोलापुरातून दादू हटवला…

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांनी केलेल्या आव्हानामुळे सोलापुरातील दादू कोंडदेव कुलकर्ण्याचे शिल्प अखेर हटवण्यात आले आहे. त्याचा दै.मूलनिवासी नायक मधील वृत्तांत…

Dado Konddev statue removed from Solapur bank

हे कसले शिवप्रेम?

काल दादोजीचा पुतळा हटवला म्हणून शिवसेना आणि भाजप च्या गुंडांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयावर हल्ला केला. यांना शिवाजी महाराजांविषयी असणारे प्रेम बेगडी आहे हे त्यांनी शिवराय आणि जिजाऊ यांच्या प्रतिमा पायदळी तुडवून सिद्ध केले आहे. ह्या अफजलखानाच्या अनौरस औलादींनी जेम्स लेनने पुस्तक लिहिले तेंव्हा मुग गिळून गप्प राहणे पसंत केले. पण एका सामान्य चाकरासाठी तोही ब्राम्हण आहे म्हणून यांनी आदळआपट करणे सुरु केले आहे.

Sambhaji Brigade Office Attacked

यांना खरेच इतके शिवप्रेम आहे तर यांनी जेम्स लेनच्या विरोधात का आवाज उठवला नाही? दादोजी साठी पेटवापेटवी करायची तयारी आहे, तीही एका पुतळ्यासाठी! पण जेंव्हा साक्षात शिवरायांच्या मातेची बदनामी झाली तेंव्हा हे शूरवीर कुठे लपले होते? ह्याच औरंगजेबाच्या बिजांनी आम्हाला जेम्स लेनचा विचाराने प्रतिवाद करायचा सांगितला होता. त्याची विकृती ह्यांना विचार वाटते. आणि दादोजी सख्ख्या बापापेक्षा प्रिय वाटतो. आता हा संघर्ष रक्तरंजित झाल्यास त्यास सर्वस्वी ब्राम्हणच जबाबदार राहतील.

भटांनो कितीही भुंका, समाज आता भिणार नाही!
रक्त सांडले तरी, संभाजी ब्रिगेड मागे हटणार नाही!!
रक्तारक्तात भिनलंय काय? जय जिजाऊ! जय शिवराय!!

अखेर दादू हटवलाच!

ब्राम्हणी इतिहासाचा पाया खचला हो!
दादोजी कोंडदेव ठेचला हो!!

दादोजीचा पुतळा हटवण्यासाठी २००६ पासून अविरत परिश्रम घेणारे मा. दिपक भाऊ मानकर, अरविंद शिंदे यांचे शिव-अभिनंदन! तसेच पुणे मनपा प्रशासन, सर्व नगरसेवक, संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, आणि शिवरायांच्या कार्यावर निष्ठा असणारे असंख्य पुरोगामी मावळे यांचे शतशः आभार!

आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासाच्या भाळी जो पक्षपाती लेखनाचा कलंक लागला होता तो दादोजी हटल्याने पुसून निघाला आहे. दादोजी हे शिवरायांचे गुरु होते हे ब्राम्हण इतिहासकारांनी आतापर्यंत आमच्या डोक्यात ठसवले होते. आणि त्याला कुठलाही पुरावा नव्हता. पण जेम्स लेनने दादोजी गुरु करण्यामागची जी विकृत मानसिकता होती ती उघडकीस आणली आणि आम्ही जेंव्हा स्वतः इतिहास तपासला तेंव्हा दादोजी गुरु नसल्याचे उघड झाले. मग आतापर्यंत ह्या तथाकथित इतिहासकारांनी आमच्यावर चुकीचा इतिहास का थोपला? ह्याला एकच उत्तर आहे वर्चस्ववाद! जगात जे काही चांगले असेल ते आमचे, आणि वाईट असेल ते दुसर्‍यांचे हि अवसानघातकी प्रवृत्ती! तुम्ही कितीही मोठे झालात तरी ब्राम्हण गुरु असल्याशिवाय तुम्ही तसे घडूच शकला नसता हा माज. पण हा माज आता उतरवण्याची वेळ आली आहे.

ह्या निर्णयाच्या विरोधात सेना, भाजप, आणि मनसे यांनी आवाज उठवला आहे, यातूनच त्यांचे बेगडी शिवप्रेम दिसून आले. ठाकरे बंधूंना शिवराय आपली खाजगी मालमत्ता असल्याचा भास व्हायला लागला आहे. ज्यांनी आपल्या निष्ठा एखाद्या विष्ठेगत ब्राम्हणांच्या पायावर टाकल्या आहेत त्यांनी अशी आंदोलने करणे हास्यास्पद आहे. ज्या बहुलकरला शिवसैनिकांनी जेम्स लेनला मदत केली म्हणून काळे फासले होते त्याची राज ठाकरे यांनी माफी मागितली होती. शिवसैनिकांचे शिवप्रेम अस्सल आहे यात शंका नाही, पण ज्या घरातल्या तीन पिढया शिवरायांच्या नावावर जगल्या त्यांचे खरे स्वरूप जनतेला कळाले आहे! अहो ठाकरे, कमीत कमी प्रबोधनकारांची पुस्तके तरी तुम्ही वाचावी. आणि आमच्या तीन पिढयांच्या रक्तावर तुमच्या सेना उभ्या आहेत याचे भान ठेवा!

Bahulkar Blackened By Shivsainik

शिवसैनिकांनी शिवद्रोही बहुलकरला काळे फासले...

Raj Thakre Apologizing Bahulkar

राज ठाकरे यांनी शिवद्रोही बहुलकरची माफी मागितली...

 
 
 
 
 
 
 
 
 
काल स्टार माझा वरती तो बोबडा भरतकुमार राऊत म्हणतो, शिवरायांना आम्ही सेंटर स्टेजला आणले. तुम्ही? अरे तुमची लायकी काय, तुम्ही शिवरायांना सेंटर स्टेजला आणणार? आणि ह्यांनी यातून हे सिद्ध केले आहे कि यांना यांच्या बापापेक्षा दादोजी जवळचा वाटतो. जेंव्हा लेनने पुस्तक लिहिले तेंव्हा क्षुल्लक गोष्टीवरून महाराष्ट्र पेटवनार्‍या सगळ्या सेना घरात का बसल्या होत्या? तेंव्हा कुणाची निष्ठा (कि विष्ठा?) तुम्हाला गप्प करत होती? लेनला मदत करणार्‍यांचा साधा निषेध तरी तुम्ही केलात का? राज ठाकरे म्हणतात इतिहास जातीच्या चष्म्यातून बघणार का? अरे तुम्हाला इतिहास कशाशी खातात हे माहित आहे का? जरा तुमच्या आजोबांनी काय लिहिलंय ते वाचा.

आणि सगळ्या प्रसारमाध्यमांनी आपली जानवी जपत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ला टार्गेट करायला सुरुवात केली आहे. पण लक्षात ठेवा तुम्ही या प्रकरणाला कितीही राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातील जनता त्याला भुलणार नाही. काँग्रेस ने काय पापे केली आहेत याचा हिशेब जनता त्यांच्याकडून घेईलच. पण त्याला राजकीय वळण देऊ नका. आणि सर्व प्रसारमाध्यमांनी परत एकदा मराठा समाजाला धोपटायला सुरुवात केली आहे आणि इतर बहुजनांना वेगळे करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. पण आम्ही तो प्रयत्न हाणून पाडू. त्यामुळे तुम्ही कितीही आदळआपट केली तरी इतिहास बदलणार नाही. आणि शेवटी सत्याचाच विजय होणार!

तिसर्‍या शक्तीचा उदय!

दि २४ ऑक्टोंबरचा संभाजी ब्रिगेड चा संघर्ष मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला, त्याचे दै.मूलनिवासी नायक मधील वार्तांकन…

Sambhaji Brigade

Sambhaji Brigade

 

शिवरायांच्या बदनामीचे मुस्लिमांनाही दुःख आहे पण भटांना नाही!

Sambhaji Brigade

अधिक माहितीसाठी बघा:

1. दै.मूलनिवासी नायक

2. दादोजी कोंडदेव

विदेशी पुस्तक, देशी मस्तक – भाग २

जदुनाथ सरकार हा इतिहासकार खरं तर एकप्रकारे शिवाजी महाराजांचा विरोधकच होता. पण त्यानेही शिवरायांच्या स्वराज्य उभारणी कार्याचं कौतुक केलं आहे. इतिहासकार शेजवलकर लिहितात, ”मराठेशाहीची स्थापना हि सर्वस्वी शिवाजीकडून झाली, असे न मानता शहाजीकडून तिची प्राणप्रतिष्ठापना झाली, असे समजण्यास इतिहासाचा भरपूर आधार आहे. शहाजीने बंगळुरास राहून विजापूरच्या नावाखाली जे स्वराज्य स्थापले, तेच खरोखरी मराठेशाहीचे बीजारोपण होते. शहाजी राजांच्या या स्वप्नाची पूर्ती व्हावी, याचसाठी जिजाबाईंनी बाल शिवाजीवर संस्कार केला. हा संस्कार करताना गुलामगिरीची सावलीही मुलावर पडू नये, यासाठी जिजाबाई निग्रहाने शहाजी राजांपासून दूर राहिल्या. त्यांच्या मनात जर शहाजीराजे हलक्या कुळातले असल्याचा साल असता, तर दोघांच लग्नही झालं नसतं आणि त्यांनी शहाजीचं स्वराज्याचं स्वप्न शिवरायांच्या मनात उतरवलं नसतं. त्याकाळी लग्नं बालवयात होत असे.

जिजाबाईंचा विवाह वडिलांनी आणि घरातल्या जाणत्यांनी ठरवला होता. त्यांनी त्यावेळच्या रीतीनुसार शहाजीराजांचं कुळ-मूळ तपासूनच त्यांच्याशी जिजाबाईंचा विवाह नक्की केला असणार. तथापि, ज्यांच्या डोक्यात कुळाचे खूळ आहे, अशा सनातनी किड्यांच्या वळवळीतूनच शहाजी आणि जिजाबाईंमधील नीच-उच्च कुलाची निपज झाली असणार आणि जेम्स लेनच्या डोक्यात ती भरली असणार. जिजाबाईंच चारशे वर्षांपूर्वी नवर्‍यापासून दूर राहणं. त्याचं स्वराज्य निर्मितीच्या स्वप्नांची पूर्ती झाल्याच पाहणं, हे बहुजन समाजातील स्त्री एकाकीपणे अशी काही कर्तबगारी दाखवू शकते, याकडे आजही प्रश्नार्थक नजरेने पाहणार्‍यांना छळू शकतं. हा दोष पाहणार्‍यांचा नसून वैचारिक सोवळ्याचा आहे. या सोवळ्यात जेम्स लेन फसलाय.

त्यामुळेच शिवरायांची कुचेष्टा नोंदवण्यासाठी त्यांनी जो महाराष्ट्रीयन असा उल्लेख केलाय ते महाराष्ट्रीय लोक म्हणजे पेशवाईतल्या पापावर पांघरूण घालण्यासाठी शिवरायांच्या अस्सल मराठेशाहीला अफजुलखानी आवेशात डंख मारणारे अट्टल कोब्रा नाग आहेत, असं समजायला हरकत नाही. कारण या पुस्तकाच्या संदर्भसुचीत प्रबोधनकार ठाकरे, श्रीपाद डांगे, डॉ.आंबेडकर, गोविंद पानसरे यांच्या शिवराय आणि शिवराज्य या संबधीची माहिती देणार्‍या पुस्तकांचा समावेश नाही. चार महिन्यापूर्वी जेम्स लेनच पुस्तक प्रसिद्ध झालं. ७ सप्टेंबर २००३ च्या दैनिक सामनाच्या रविवारच्या पुरवणीत या पुस्तकाचं कौतुक करणारं अनंत देशपांडे यांचं परीक्षण आहे. सामना हे शिवसेनेचं मुखपत्र आणि शिवराय हे शिवसेनेचं प्रेरणास्थान आहे. तसे शिवराय मराठीजनांच्या अस्मितेचा विषय आहेत. महाराष्ट्राचे ते आराध्य दैवत आहेत. या दैवताची जेम्स लेन याने पेशवाई किड्यांच्या नादाला लागून काय धूळधाण उडविली, याची माहिती राज्यकर्त्यांना असणे शक्य नाही, हे समजू शकतो. पण या बदकर्माची कल्पना परीक्षण लिहिणार्‍यास नसावी, हे पटण्यासारखं नाही.

ह्यात संपादकाच्या मोकळेपणाचा फायदा उठवला गेला असेल तर कपटनीती यशस्वी झाली, असंच म्हणावं लागेल. दरम्यानच्या काळात या पुस्तकाच्या विरोधात कुजबुज सुरु झाली. त्या गेल्या आठवडयात वर्तमानपत्रातून वाचा फुटली. त्याचबरोबर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस ने ताबडतोब क्षमायाचना करून सदर पुस्तकाची आवृत्तीच रद्द करीत असल्याचं जाहीर केलं आणि वितरण थांबवलं. परंतु तोपर्यंत जगभर वितरीत झालेल्या या पुस्तकाच्या हजारो प्रती विकल्या गेल्या आहेत. त्या पुढच्या काळात संदर्भासाठी वापरल्या जाणार, हे स्पष्ट आहे. अनंत देशपांडेनीही सामनातील परीक्षणात एक चांगला संदर्भ ग्रंथ म्हणूनही या पुस्तकाचा उपयोग होऊ शकतो, असं म्हटलं आहे. शिवरायांच्या संबंधित एखादं प्रकरण निघालं कि, त्यावरून देणार्‍या संस्थेने अथवा त्याला मार्गदर्शन करणार्‍या व्यक्तींपैकी कुणीही शिवरायांना कलंकित करणार्‍या पुस्तकाचा जाहीर निषेध केलेला नाही. मूळ गुन्हेगार परदेशात असल्यामुळे त्याला जोडयाने बडवता येत नाही.  त्यामुळे त्याला साथ देणार्‍यांना निगरगट्टपणे मजा अनुभवता येतेय.

साभार:
ज्ञानेश महाराव,
(गर्जे शिवरायांची तलवार)