आव्हान… धर्मसत्तेला अन् राजसत्तेला!

दरवर्षी १२ जानेवारीला मराठा सेवा संघातर्फे सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला जातो. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम खेडेकर हे शिवधर्मपीठावरून मार्गदर्शन करतात, यावर्षीच्या मार्गदर्शनाचा दैनिक लोकमतचे पत्रकार राजेश शेगोकार यांनी घेतलेला वेध.

Purushottam Khedekar: Challenge to Religious and Political Powers

जिजाऊ जन्मोत्सव २०१२

मराठा सेवा संघाच्या वतीने साजरा होणारा राजमाता जिजाऊ जन्मोत्सव यावर्षीही थाटामाटात साजरा झाला. देशाच्या तसेच जगाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या जिजाऊ भक्तांनी सिंदखेड राजा परिसर फुलून गेला होता. यावर्षी उच्चांकी २०० पुस्तक स्टॉल्सची नोंदणी झाली होती. जिजाई प्रकाशन तसेच अनेक पुरोगामी प्रकाशनांनी हजेरी लावली होती. त्याचा दै.देशोन्नती, दै.लोकमत व दै.सकाळ या प्रमुख वृत्तपत्रांमधील वृत्तांत.


 

पुण्यात नवा जेम्स लेन वावरतोय…

रविवार दि. ४ डिसेंबर २०११ रोजीचा लोकमत पान ६ वरील फ्रेंच पत्रकार गोतीये यांचा “विभूती देव नव्हे देवाचे एक साधन” हा बचावात्मक लेख वाचला. लेखामध्ये गोतीये यांनी ते विचारवंत नसल्याचे लिहिले आहे. तसेच त्यांचा लेख वाचल्यावर ते विचारही करत नसावेत असे जाणवते. त्यांचा संपूर्ण लेख गोंधळलेला वाटतो.

ते लेखाच्या सुरुवातीलाच सांगतात कि त्यांचे फाउंडेशन शिवाजी महाराजांसाठी नव्हे तर “भवानी-भारतीसाठी” समर्पित आहे. भारतीय इतिहासासाठी ते वास्तूसंग्रहालय उभारत आहेत. “पुरातन काळापासून भारतीयांनी देश हा स्त्रीशक्तीला समर्पित केल्याचे कौतुक वाटते” असे ही ते लेखाच्या मध्यात लिहितात. लेखाच्या शेवटी त्यांनी भारताला पर्यायी शब्द म्हणून “भवानी-भारती, इंडिया” असे शब्द सुचवले आहेत. गोतीयेंच्या वरील तिन्ही मुद्यांवरून असे जाणवते की त्यांना “भवानी-भारती” या पुरातन स्त्री देवतांना केंद्रस्थानी ठेऊन वस्तुसंग्रहालय बनवायचे आहे. तसेच श्री गोतीये हे पुरातन काळातील “भवानी-भारती” या देवतांचा धागा शाक्तधर्मीय शिवरायांपर्यंत आणून ठेवतात. आई भवानी बद्दल सर्व महाराष्ट्रीय तसेच भारतीय जनतेला आपुलकी आणि आदर आहे. भवानी मातेचे महत्व असाधारण आहे. पण गोतीये भवानी मातेचे नाव घेत भारती या वैदिक देवतेचे महत्व वाढवू पाहत आहेत असे दिसते. तसेच भवानी या देवतेचा वैदिक संस्कृतीशी काहीही संबंध नसताना भवानीचे वैदिकीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे.

पुढे जाऊन ते असंबंधपणे आर्य आक्रमक हे परकीय की भारतीय या मुद्याला हात घालतात. ख्रिश्चन मिशनरी आणि मार्क्सवादी इतिहासकारांना दोष देत जाणीवपूर्वक विषयांतर करतात. हे जाणीवपुर्वकचे विषयांतर त्यांच्या प्रेरणा कोण हे दर्शवत आहे. गोतीये “आम्हाला शिवाजी महाराजांना आधुनिक भारताचे राष्ट्रीय हिरो करायचे आहे” असे म्हणत विविध सात भाषा जाणणार्‍या शिवाजी महाराजांना मराठी-अमराठी प्रादेशिक मुद्यामध्ये अडकवू इच्छितात. त्यासाठी अमराठी मिर्झा राजेंना शिवरायांचा शत्रू म्हणून सांगायला विसरत नाहीत. स्वतः फ्रेंच असूनही मराठीचा अभिमान असल्याचे सांगतात. संग्रहालयाची भाषाही मराठी आहे असे लिहितात. अमेरिकेसारखे बलाढय देश आज शिवरायांच्या गनिमी काव्याच्या युद्ध तंत्राचा वापर आणि अभ्यास त्यांच्या लष्करात करत आहेत. अशा जागतिक हिरोला गोतीये मराठी आणि हिंदू धर्म या संकुचित मुद्यांमध्ये अडकवत आहेत. वरून त्यांना राष्ट्रीय हिरो करण्याचा खोटा दिखावा करत आहेत.

पुढे गोतीये “शिवराय हे निधर्मी होते तरीही ते समर्पित हिंदू होते” असे हास्यास्पद विधान करतात. जर शिवराय निधर्मी म्हणजे धर्माला न मानणारे असे होते तर पुन्हा ते कोणा एका धर्माचे समर्पित अनुयायी कसे होतील? गोतीये शिवाजी महाराजांना “देव नव्हे तर देवाचे एक साधन” मानतात त्यासाठी ते विभूती हा शब्द वापरतात. त्यासाठी अरबिंदो बोस यांनी नेपोलियनला विभूती म्हटल्याचा असंबंध दाखलाही देतात. नेपोलीयनला कोणी विभूती, देव अथवा भूत जरी म्हणाले तरी त्याचा शिवरायांना विभूती ठरवण्याशी काय संबंध? अमावस्येच्या अंधार्‍या रात्रीचा आधार घेत मुहूर्त न पाहता लढाया जिंकणारे शिवराय हे अंधश्रद्धेला भिक घालणारे नव्हते. कोणालाही विभूती मानने ही एक अंधश्रद्धा आहे. तसेच ते त्या व्यक्तीचे कर्तृत्व नाकारणारे आहे. त्यांना विभूती म्हणणे त्यांच्या क्रांतीकारक विचारांचा अवमान करणे आहे.

सर्वात गंभीर, संवेदनशील आणि संतापजनक मुद्दा म्हणजे गोतीये लिहितात कि “मी फ्रेंच असून… शिवाजी कोणत्या जातीचे होते? त्यांचे गुरु कोण होते? त्यांचे वडील कोण होते? हे मुद्दे माझ्यासाठी गौण आहेत..” या गोतीये महाशयांना शिवराय मराठी असल्याचा अभिमान आहे. ते निधर्मी असूनही यांना ते समर्पित हिंदू वाटतात. शिवरायांचे मराठीपण आणि हिंदू असणे यांना गौण वाटत नाही. पण त्यांची जात कोणती? त्यांचे गुरु कोण? व वडील कोण? हे गौण वाटते! एक वेळ जात आणि गुरूचा मुद्दा सोडूनही द्या पण वडील कोण? हा प्रश्न निर्माण करायची गोतीयेची हिंमत तरी कशी होते? हा प्रश्न होऊच कसा शकतो? शिवरायांच्या जयंती पासून मृत्यूपर्यंत अनेक मुद्दे संवेदनशील झाले असताना. कसलीही वैचारिकता नसणार्‍या, असंबंध, विस्कळीत,गोंधळलेले लिखाण करणार्‍या, शिवचरित्राबाबत काडीचेही गांभीर्य नसणार्‍या गोतीयेला वस्तुसंग्रहालय उभारू देऊ नये.

गोतीयेलाच काय पण भारतात कोठेही शिवरायांबाबत अथवा कोणाही महामानवांबाबत काहीही लोकाभिमुख (प्रचारक) कलाकृती, साहित्य निर्माण होत असेल तर त्यात जाणकारांचा सहभाग असला पाहिजे नाहीतर लोक भावना दुखावल्या जाऊ शकतात. त्यातून संघर्ष आणि अशांतता निर्माण होऊ शकते. मुळात एक सामान्य पत्रकार असणार्‍या गोतीयेकडे १०० कोटी आलेच कोठून? त्यांच्या पाठीशी कोण कोण आहेत? याची चौकशी व्हावी. जेम्स लेनमुळे शिवप्रेमींच्या मनावर झालेली जखम अजून खपली धरत नसताना हा नवा लेन महाराष्ट्रात पुन्हा निर्माण होऊ नये याची महाराष्ट्र सरकारने वेळीच दखल घ्यावी.

-अविनाश जाधव

मराठा बहुजन महामेळावा – कोल्हापूर

दिनांक १३ फेब्रुवारी २०११ रोजी मराठा बहुजन महामेळावा कोल्हापूर येथे संपन्न झाला त्याचा स्थानिक वृत्तपत्रांमधील वृत्तांत..

या मेळाव्यामध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांनी आपली भूमिका मांडली, काही लोक आरोप करतात कि संभाजी ब्रिगेड हे राष्ट्रवादी चे पिल्लू आहे, त्यावर बोलताना प्रवीण दादा म्हणाले कि राष्ट्रवादी ची स्थापना १९९९ ची आहे तर संभाजी ब्रिगेड १९९० पासून आहे, आम्ही पिल्लू नाही तर बाप आहोत!

Maratha Bahujan Mahamelava Lokmat

Maratha Bahujan Mahamelava Pudhari 1

Maratha Bahujan Mahamelava Pudhari 2

Maratha Bahujan Mahamelava Sakal

इतिहासाचे राजकारण : लोकमत कि ब्राम्हणी मत?

इतिहासाचे राजकारण भाग -१ व भाग-२ या मथळयांखाली लोकमतच्या दि. ९ व १६ जानेवारी रोजी प्रकाशित झालेल्या अग्रलेखांवर मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया आणि अत्यंत परखड भाषेत केलेलं सांप्रतच्या स्थितीचे विवेचन… (दै.लोकमत, ३० जानेवारी)

Itihasache Rajkaran - Lokmat Ki Bramhani Mat? Purushottam Khedekar

जिजाऊ जन्मोत्सव २०११

राजमाता जिजाऊ जन्मोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही थाटामाटात साजरा झाला. मराठा सेवा संघाच्या वतीने गेली वीस वर्षे हा उत्सव मातृतीर्थ सिंदखेडराजा (जिल्हा-बुलडाणा) येथे मोठया प्रमाणावर साजरा केला जातो. लाखो जिजाऊ भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. त्याचे स्थानिक वृत्तपत्रांमधील वार्तांकन.