मराठा नेते कोठे आहेत?

ऊस व कापसाला योग्य भाव मिळावा म्हणून आपण सध्या बातम्या पाहत आणि वाचत आहात. महाराष्ट्रभर शेतकर्‍यांच्या घराघरात, ओटयावर, गल्लीत, गावात या उपोषण, आंदोलने करणार्‍या नेत्यांवर चर्चा होत आहे. हे नेते शेतकर्‍यांना आपल्या जवळचे वाटत आहेत. खा. राजू शेट्टी यांनी तर उसाच्या भाववाढीसंदर्भात बारामती येथे आमरण उपोषण करून उसाला भाव मिळवून दिला व मगच उपोषण सोडले. … Continue reading: मराठा नेते कोठे आहेत?

महाराष्ट्र राज ठाकरेंच्या बापाचा नाही!

आजकाल जो उठतो तो महाराष्ट्र बंद पाडण्याच्या वल्गना करतो आणि महाराष्ट्राचा कैवारी असल्याचे भासवतो. यात “मनसे प्रायव्हेट लिमिटेड” चे सर्वेसर्वा कार्टुनिस्ट राज ठाकरेंनी सर्वांवर कडी केली आहे. त्यांनी सरळ सरळ दंगली करण्याची धमकी दिलेली आहे. संजय निरुपम, अबू आझमी सारखे अडगळीत पडलेले लोक काहीतरी बडबडले आणि ह्यांनी दंगली करण्याची धमकीच देऊन टाकली. शिवसेनेचेच संस्कार घेऊन … Continue reading: महाराष्ट्र राज ठाकरेंच्या बापाचा नाही!

शोध मराठया – शोध मराठा.. – पुरुषोत्तम खेडेकर

शोध मराठ्या शोध मराठा लेख

संयुक्त महाराष्ट्राला पन्नास वर्षे पूर्ण झालीत. महाराष्ट्र शासनाने सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केले. त्या निमित्ताने महाराष्ट्र विधानसभेच्या बोडक्या आवारातील बोडक्या वातावरणात मेघडंबरीविरहित छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठित लहानसा पुतळा बसवला. शिवरायांचा हा पुतळा तेथे बसविण्यामागे विधिमंडळाची अधिकृत भूमिका संशयास्पद आहे. मुळातच बोडका पुतळा अयोग्य जागी बसविल्यामुळे शिवरायांची बदनामीच जास्त होते. यातच आता महाराष्ट्र व देशाने शिवरायांना … Continue reading: शोध मराठया – शोध मराठा.. – पुरुषोत्तम खेडेकर

रायगडावरचा वाघ्या – ज्ञानेश महाराव

महाराष्ट्रातील वाघ्या कुत्र्यासंबंधी सद्य परिस्थिती ब्राम्हणांनी जाणून बुजून निर्माण केलेली आहे. यात मराठा बहुजनांमध्ये फुट पाडून भांडणे लावण्याचा प्रयत्न सुरु आहे. कृपया सर्व बहुजनांनी चर्चा करून हा प्रश्न सोडवावा अशी अपेक्षा, यात कुणीही भावनिक होऊ नये. ऐतिहासिक पुरावे लक्षात घेऊन सर्वांनी वाघ्या कुत्रा हटवण्यासाठी पाठींबा द्यावा. कारण यात फक्त शिवरायांचीच बदनामी होत नसून शिवप्रेमी श्रीमंत … Continue reading: रायगडावरचा वाघ्या – ज्ञानेश महाराव

अण्णा हजारे: द फ्रॉड गांधी

सध्या जिकडे तिकडे अण्णा हजारे यांच्या उपोषणाची चर्चा सुरु आहे. अण्णा दुसरे गांधी असल्याचा प्रचार प्रसारमाध्यमे करतायत. अण्णा हजारे हे राळेगण सिद्धी या “गावचे” समाजसेवक, गांधींच्या मार्गावर चालणारे अशी त्यांची ख्याती आहे. सध्या २६-११ नंतर मेणबत्त्या मिरवणारे अण्णांसाठी सुद्धा मेणबत्त्या परजून रस्त्यावर आलेले आहेत. अण्णांची प्रमुख मागणी आहे लोकपाल विधेयक. जे भ्रष्टाचाराविरुद्ध थेट कारवाई साठी … Continue reading: अण्णा हजारे: द फ्रॉड गांधी