शेतकरी, बंदुका आणि शरद जोशी

महाराष्ट्रातील २० शहरांतून प्रसिद्ध होणार्‍या “दैनिक देशोन्नती” चे संपादक शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांचा शरद जोशींचा मुखवटा फाडणारा लेख! ‘शरद जोशी चंद्राची कोर, बाकी सारे हरामखोर’ अशी भावनात्मक नारेबाजी करून पुढारी, प्रशासन व व्यवस्थेशी पर्यायाने उभ्या जगाशी दुष्मनी कोणे एकेकाळी ज्या शरद जोशींकरिता शेतकर्‍यांनी केली, त्या शरद जोशींनी शेतकर्‍यांच्या प्रश्नांचा, त्यांच्या भावनांचा, त्यांनी दाखविलेल्या विश्वासाचा … Continue reading: शेतकरी, बंदुका आणि शरद जोशी

वारकरी पांडुरंगे। सत्य कळोनी आले॥

समस्त बहुजनांचे अखंड प्रेरणास्थान, महान विद्रोही संत, जगद्गुरू संत तुकाराम महाराज स्मृती दिनानिमित्त त्यांच्या कार्याला वंदन! वारकऱ्यांची माउली, दीनदुबळ्यांची सावली; दया क्षमा शांतीचा, प्रज्ञा, शील करुणेचा संगम म्हणजे तुकोबाराय; पण वेळप्रसंगी अधमाशी अधम असणारे अग्निपुरुष विद्रोही तुकारामही! मुखाने ब्रह्मज्ञान सांगून, अज्ञानी जनलोकांना खोट्या देवांच्या कथा सांगून जनसामान्यांची मान कापणाऱ्या लुटारू-लबाडांचा ढोंगीपणा उघड करणारेही तुकोबारायच! सर्व … Continue reading: वारकरी पांडुरंगे। सत्य कळोनी आले॥

शहाजी राजे: स्वराज्याचे संकल्पक

स्वराज्य संकल्पक शहाजी राजे

स्वराज्याचे संकल्पक, रणविद्याविशारद सैनिक, सेनापती, स्वातंत्र्यप्रेमी, दूरदर्शी राजनीतीज्ज्ञ, इंग्लिशतज्ज्ञ, अविस्मरणीय पराक्रमी, नृपसिंह शहाजीराजे यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या जीवनकार्याचे स्मरण करणे आपले कर्तव्य ठरते. मालोजी भोसले व दीपाबाई (उमाबाई) फलटणचे सरदार नाईक निंबाळकर यांची कन्या या दाम्पत्याच्या पोटी पराक्रमी शहाजींचा जन्म १८ मार्च १५९४ ला झाला. शहाजी व जिजाऊ हे बालकावस्थेत असताना रंगपंचमीच्या दिवशी परस्परांवर गुलाल उधळीत … Continue reading: शहाजी राजे: स्वराज्याचे संकल्पक

अमर जाहले शंभूराजे!

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभुराजे म्हणजे जगातील इतिहासकारांना न सुटलेले कोडं आहे. शंभुराजे या महानायकाने हिंदुस्तानातील हजारो साहित्यिकांना, कादंबरीकारांना, कथाकारांना, नाटककारांना, चित्रपट निर्मात्यांना वेगवेगळ्या प्रकारे खाद्य पुरविले. बुद्धीच्या अनेक ठेकेदारांनी आपापल्या पद्धतीने शंभुराजाचे चरित्र लोकांसमोर मांडले. तेसुद्धा बऱ्याच प्रमाणात विकृत चरित्र शंभुराजांच्या विषयी उणीपुरी दोनशे वर्षे गैरसमजांचे जे पीक आले, त्याला कारणीभूत होती ती मल्हार … Continue reading: अमर जाहले शंभूराजे!

लाल महालातील शाहिस्तेखान ते दादोजी

दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरणी इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचा दै.देशोन्नतीच्या स्पंदन पुरवणीतील लेख. (दै.देशोन्नती, ३० जानेवारी २०११). छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य राजगडावर असताना मुघल सरदार शायिस्तेखानाने पुण्यावर ७ स्वारी केली. लाल महाल ताब्यात घेतला. तेथे वास्तव्य केले, त्यावेळेस पाऊण लाख फौज लाल महालाभोवती होती. मुंगीला देखील आत येता येणार नाही, अशी व्यवस्था खानाने केली होती. … Continue reading: लाल महालातील शाहिस्तेखान ते दादोजी